मालवणी गोड चवीची मटकीची उसळ | Malvani Sweet Matki Usal | Matki Usal recipe in Marathi
HTML-код
- Опубликовано: 11 дек 2024
- मालवणी गोड चवीची मटकीची उसळ | Malvani Sweet Matki Usal | Matki Usal recipe in Marathi
रेसिपी
साहित्य -
मोड काढलेली मटकी - २०० ग्रॅम
मोठा कांदा बारीक चिरून - १
टोमॅटो बारीक चिरून - १
तेल - ३-४ मोठे चमचे
पाणी - अर्धा कप
मीठ चवीनुसार
हिंग - पाव छोटा चमचा
हळद - पाव छोटा चमचा
हिरव्या मिरच्या - ३-४
आले - १ इंच
मोहरी - पाव छोटा चमचा
कृती -
१. सर्वप्रथम एक कढई माध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवावी.
२. कढई गरम झाल्यानंतर त्यात ३-४ चमचे तेल घालावे.
३. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी व तडतडू द्यावी.
४. त्यानंतर त्यात बारीक चिरलेले आले आणि मिरच्या घालून त्यांचा वास सुटेपर्यंत परतावे.
५. आता १ मोठा कांडा बारीक चिरलेलाल घालावा व गुलाबी रंगावर परतावा.
६. आता त्यात १ बारीक चिरलेला टोमॅटो घालावा व १०-१५ स्कंद परतावा , त्याला नरम होऊ देऊ नये.
७. त्यानंतर लगेच त्यात हिंग व चवीपुरते मीठ घालून परतून घ्यावे.
८. लगेच हळद घालून व्यस्थित ढवळून घ्यावे
९. आता त्यात मोड आलेली मटकी घालावी व व्यवस्थित मिक्स करून घ्यावी.
१०. अर्धा कप पाणी घालून कढईवर झाकण ठेवावे व ८-१० मिनिटे वाफेवर शिजू द्यावे.
११. झाकण काढल्यानंतर मटकी व्यवस्थित शिजली कि त्यात ओले किसलेले खॊबरे व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे.
१२. लगेच गॅस बंद करावा आणि झाकण ठेवून बंद करून ठेवावे.
१३. गोडसर चवीची मालवणी पद्धतीची मटकीची उसळ खाण्यासाठी तयार.
पातोळ्या -
• पातोळे - कोकण नागपंचमी...
खोबऱ्याची कापा -
• खोबऱ्याची कापा - नारळी...
मालवणी गावरान भेंड्याचा सार -
• मालवणी गावरान भेंड्याच...
मालवणी गावरान भेंडीची भाजी -
• मालवणी गावरान भेंडीची ...
Follow Our Socials -
RUclips - / kunalbandekarsfoodjourney
Facebook - / kunalbandekarsfoodjourney
Instagram - / kunalbandekarsfoodjourney
Twitter - / kunalsfoodblog
Pinterest - / kunalsfoodjourney
Website - kunalsfoodjour...
#shorts #ytshorts #youtubeshorts #kunalbandeksfoodjourney #cooking #food
#kunalbandekarsfoodblog #malvan #malvanifood #matkichiusal #matkichibhaji #matki #matakichiusal #mataki #malvanimatakiusal
#malvanicurry #malvanimasala #kokanicuisine #malvanicuisine #bandekarmasala #bandekarfoodproductsandspices #malvanifoodblogger #malvanifoodlover #marathifood #traditionalfood #malvanitraditionalfood #kokanifoodblogger #healthyfood #iamchef #malvanivillagelife #malvanivillage
मालवणी जेवणात टोमॅटो घालत नाही. पुर्वी मालवणी लोकाना टोमॅटो माहीत नव्ह्ता सुक्या भाज्यांना टोमॅटोची गरज नाही भरपुर कादां खोबरे थोडे गुळ
होय, बरोबर आहे तुमचं. मालवणी जेवणात टोमॅटो नाही वापरला जायचा. पण काळाच्या ओघात काही पदार्थ भारतीय जेवणात समाविष्ट होत गेले, सध्या आपल्या बऱ्याच खाद्यपदार्थात कांदा, बटाटा आणि मिरची हे वापरलीच जाते जी कि मूळ भारतीय नाहीत पण आपण ते वापरतो. पण मालवणी पद्धतीच टोमॅटोचं सार खूप फेमस आहे.
या कमेंट साठी धन्यवाद, माझा पण प्रयत्न सुरु आहे कि जुन्या काळात जेवण कस बनवलं जायचं त्याचा शोध घ्यायचा आणि ते सर्वाना शेअर कराव.