माझ्या घरची दिवाळी | Diwali Festival in Kokan | Marathi Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • Diwali celebration. Explaining all rituals at my home in kokan.
    #diwali #diwalicelebration #kokan #kokanvlog #marathivlog

Комментарии • 787

  • @sanjyotpatil7881
    @sanjyotpatil7881 8 месяцев назад +55

    खूप गुणी मुलगी. अशा मुली पाहील्या की कोण म्हणेल नवीन पिढी संस्कारी नाही 🥰

  • @फक्त्तमराठी
    @फक्त्तमराठी 9 месяцев назад +149

    दिवाळी च्या शुभेच्छा. व्हिडिओ मस्त. गावातली जशी शांतता तसंच तुझं शांत बोलणं ऐकत रहावस वाटत. कुठेही कसलाही बडेजाव नाही. आशय सुद्धा उत्तम पणे दाखवतेस. अशीच डाऊन टू अर्थ रहा. मग पुढे यश आहेच. ही तर सुरुवात आहे

    • @SwanandiSardesai
      @SwanandiSardesai  9 месяцев назад +7

      Thank you 😊

    • @vinayparab8708
      @vinayparab8708 9 месяцев назад

      ​@@avinashnarwade430😂😂😂😂

    • @फक्त्तमराठी
      @फक्त्तमराठी 9 месяцев назад +2

      तुझा दृष्टिकोन बदल. हल्ली मराठी मुलींवर भय्ये लाईन मारतात आणि मराठी माणसचं बघत बसतात जाऊन बघ कोकण गर्ल व्हिडिओ

    • @prathmeshmestry8310
      @prathmeshmestry8310 9 месяцев назад

      ​@@avinashnarwade430😂

    • @prathmeshmestry8310
      @prathmeshmestry8310 9 месяцев назад

      ​@@फक्त्तमराठी तुमच्या कॉमेंटशी मी सहमत आहे.

  • @suyoggogate9270
    @suyoggogate9270 9 месяцев назад +59

    स्वानंदी म्हणजेच दिवाळी, कारण तू भारतीय आणि मराठी संस्कृतीचे मूर्तिमंत उदाहरण आहेस ! You are too good 👍

  • @shaileshjoshi3383
    @shaileshjoshi3383 9 месяцев назад +62

    ताई तुमचा अभिमान वाटतो की इतक्या सुंदर आणि हुशार असून तुम्ही घरगुती कामातही वाकबगार आहात. आपली संस्कृती संवर्धनाबद्दल खूप खूप आभार
    दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
    🎉🙏🙏

    • @SwanandiSardesai
      @SwanandiSardesai  9 месяцев назад +2

      Thank you 🙏🏼

    • @prathameshbiradar2002
      @prathameshbiradar2002 9 месяцев назад

      @@SwanandiSardesai Hi Swanandi which was your recent birthday ?? PLEASE REPLY ME🤩😳

    • @AaryaShindeVlogs
      @AaryaShindeVlogs 8 месяцев назад

      Tuza abhiman vat to❤️👍 great

    • @vinodkhadake389
      @vinodkhadake389 6 месяцев назад

      ​@@SwanandiSardesaiकोकण मध्ये कोणतं गाव

  • @yogeshjadhv7843
    @yogeshjadhv7843 7 месяцев назад +24

    आजच्या या काळामध्ये आपल्या या सनातन धर्माला तुमच्या सारख्या सुसंस्कारित मुला मुलींची गरज आहे.
    तुम्हाला पाहून खुप आनंद झाला.😊🚩

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 9 месяцев назад +30

    करावे तेवढे कौतुक कमीच आहे तुझ्या नावातच आनंद आहे.... स्वतः आनंदी राहून दुसऱ्यांना ही आनंद देतेस 🌹❤️ दीपावली च्या शुभेच्छा 🎉

  • @Anonymous2114
    @Anonymous2114 9 месяцев назад +26

    Koni evda Sata janma ch punya karun thevla Jyla tuza sarkhi... Bahin, maushi, aatya, aai, baiko, aaji, maitrin milel....
    Your parents and environment really raised you so well....
    Konkan khrach Maharashtra cha swarg ahe.. ❤️

  • @anilbhaimanse
    @anilbhaimanse 9 месяцев назад +18

    आपल्या पालकांनी स्वानंदी नाव सार्थक ठेवलेले आहे.... आपलं आणि कोकणी रानमाणूस च्या videos बघून कोकणा चा आस्वाद घेत असतो... खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा... निरागस व्यक्तिमत्व.... 🎉

  • @suhastadkod3304
    @suhastadkod3304 9 месяцев назад +21

    खरी पारंपरिक दिवाळी ची ओळख ! धन्यवाद आणि मनापासून कौतुक ! देव तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना सुखी ठेवो.❤

  • @arvindshedge8534
    @arvindshedge8534 9 месяцев назад +15

    स्वानंदी तुझ्यामुळे कोकणातील प्रदुषण मुक्त दिवाळी अनुभवताना मनोमन रडलो. विध्यात्याने आम्हाला‍ का वंचित केले?असो तू तुझे कुटुंब सुखी आहात. दिवाळीचा विषय घेवून तू ह्या व्हिडिओ व्दारे आम्हाला सुखावलस, धन्यवाद!

    • @user-ii2no1uj9w
      @user-ii2no1uj9w 9 месяцев назад +5

      Vidhatya ne nahi city's chya mohmayachya havyasane pratyekala duravale aahe..

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 14 дней назад

    किल्ला मस्तच झाला आहे स्वानंदी , 👌👌👌👌 . शूरा मी वंदिले , पूर्ण ऐकायला आवडेल . रांगोळी खूप सुंदर ग , 👌👌 . तू खरंच ,सर्व गुण संपन्न आहेस , अगदी मनापासून खूप खूप कौतुक तुझे , तुझ्यावर उत्तम संस्कार केलेल्या , तुझ्या आई वडिलांचे , आज्जी , यांचे . आपल्या सगळ्या चाली रीती , संस्कार , यांना किती सुंदर जपते आहेस , तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून 🌹🌹🌹🌹

  • @anilzantye1994
    @anilzantye1994 9 месяцев назад +6

    स्वानंदी म्हणजे स्वतः आनंदी राहून दुसऱ्याला आनंद देणारी अशी तू, तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा❤🌹🌹 शुभ दीपावली 🌹🌹🌹 बनविलेला आकाशकंदील,गडकिल्ले,फराळ खूपच छान ❤देव तुझे बरे करू❤

  • @Sanjay_Panchal_
    @Sanjay_Panchal_ 9 месяцев назад +6

    खूप छान सादरीकरण आणि विशेषतः आपण केलेल्या घरातल्या प्रत्येक कामाचे व्हिडिओ टाकायला ही हिम्मत लागते. कोकणात अशा कितीतरी मुले-मुली आहेत ज्यांना आपण गाई म्हैशी सांभाळतो, तसेच शेणाने अंगण सारवतो हे लोकांना सांगायला ही लाज वाटते. असेच छान छान व्हिडिओ बनवत राहा.😊

  • @prashantdeshpande8177
    @prashantdeshpande8177 9 месяцев назад +8

    हिंदू संस्कृती , महाराष्ट्र त्यातही कोकणातील परंपरा यांचे यथार्थ दर्शन. गावातील पहाटेचे वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट , गायी गुरांचा वावर सगळेच मोहून टाकणारे. कलात्मकता लाजबाब. किल्ले वेरवली भारी केलाय 😊 कोकणात फिरायला खूप आवडते, फिरतोही. Would love visiting your place too !! Best Luck 🤞

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale3269 9 месяцев назад +5

    खुपच खरीखुरी अत्यंत साधी पण आपल्या ओल्या मायेच्या मातीमधली पारंपारिक दिवाळी... तू तेवढ्याच प्रसन्न मनाने आम्हाला दाखवली... धन्यवाद... कधीतरी अशी दिवाळी अनुभवायला नक्कीच आवडेल... सर्व शब्दांच्या पलीकडले... निव्वळ अप्रतिम अनुभुती...❤

  • @sudhirurankar2607
    @sudhirurankar2607 9 месяцев назад +3

    स्वतः आनंदी राहुन दुसऱ्याच मन आणि क्षण आनंदी होण्यासाठी प्रयत्न करीत रहाणारी ती म्हणजे स्वानंदी तू स्वतः, दिवाळी निमित्त बनवलेल्या सुंदर व्हिडिओ मुळे मन अगदी ताजेतवाने होऊन गेले आहे, तुला आणि कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔🪔🪔🎆

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 Месяц назад +1

    स्वानंदी तू स्वतः आनंदी आहेस आणि आम्हालाही आनंदी ठेवलेस यात तिळमात्र शंका नाही.मी अलिकडेच तुझे video बघायला सुरुवात केली आणि प्रत्येक व्हिडिओ बघताना अधिकाधिक सुंदर ते आवडत आहेत. खूप छान वाटत गावाला गेल्याचा फिल येतो. तुझी दिवाळी बघताना मी स्वतः आनंद तर घेतलाच पण असं वाटल मी तिथे आहे. माझं वय 72 ahe पण तुझ्या आतापर्यंत पाहिलेल्या video मध्ये डाव उजव करताच येणार नाही. धन्यवाद तुला आणि तुझ्या आईबाबा, दिपू परिवार काकू या सर्वांना. अनेक अनेक आशिर्वाद तुला तुझ्या या कार्यात.❤

  • @rohanmeher1485
    @rohanmeher1485 5 месяцев назад +3

    व्हिडिओ ला बॅकग्राऊंड मध्ये संगीताचा आलाप जो देता ना ...त्यामुळे vlog ला अगदी दूरदर्शनचा किंवा एखाद्या प्रोेशनल डॉक्युमेटरीचा फील येतो...❤❤❤.. खूपच सुंदर...आणि खूप साऱ्या शुभेच्छा... तुम्हाला ❤❤❤🙌

    • @srm2595
      @srm2595 4 месяца назад

      My exact thoughts. मला तर सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकरांची फिल्म बघतेय असं वाटलं. And that’s a compliment ❤

  • @sarojsawant7823
    @sarojsawant7823 9 месяцев назад +3

    स्वानंदी ..तुम्हां सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.. कोकणातील दिवाळी छान व शांत शांत ..तू तुझं गुणगुणणं सुंदर...अशा प्रकारच्या साध्या, समाधानी जीवनशैलीतच खरं सुख आहे.. हे धकाधकीच्या व धावपळीचे जीवन जगणाऱ्या पीढीला लवकरात लवकर उमगो...व आम्हीही असाच चुरमुरया कागदाचा कंदिल दिवाळीत तयार करून लावतो.

  • @nayanakore4461
    @nayanakore4461 3 месяца назад +5

    सर्वगुण संपन्न म्हणजे काय याचे साक्षात उदाहरण आहे स तू स्वानंदी .खुप खुप आशिर्वाद. सरस्वती चा वरदहस्त आहे तुझ्या डोक्यावर.खुप छान.

  • @gururaj800
    @gururaj800 9 месяцев назад +18

    What a lovely peaceful calm cool collected contentful life you are living.
    To me this is life
    Stay blessed always ❤❤

  • @INVINCIBLE_88
    @INVINCIBLE_88 9 месяцев назад +2

    खरचं खुप सुंदर अप्रतिम आपण जसे मोठे होत जातो तसे आपण लहानपणीची निरागसता हरवून जातो तीच निरागसता तु जपतेस ते पाहून खुप सुदंर वाटलं छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेतला पाहिजे
    आभारी आहे हा vlog बनिवल्याबद्दल❤ 🙏🙏❤❤❤

  • @rajankharade3723
    @rajankharade3723 2 месяца назад

    ह्या वयात एवढे समर्पण, संस्कृती, धर्म, कोकण च्या जीवनाचे संपूर्ण मुतिवंत उधाहरण खरंच, अद्वितीय संस्कार म्हणजे स्वानंदी खरंच ✨, श्री स्वामी समर्थ तुझे नेहमी रक्षण करो,तूझ्या आई वडिलांना देवाचा मोठा प्रसाद म्हणजे तू खरंच 👍👍

  • @vishwanathsawant9827
    @vishwanathsawant9827 9 месяцев назад +2

    स्वानंदी ...तुला व तुझ्या कुटुंबीयांना दीपावलीच्या खूप खुप शुभेच्छा.....You are really simply great. मला तुझ्याकडे पाहून फार अभिमान वाटतो की अजून हि आपली तरुण पिढी आपल्या मूळ मातीला जोडलेली आहे. तुझ्या संस्कारांना आणि तुझ्या आई वडिलांना कोटी कोटी प्रणाम .
    तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉

  • @chandrashekharkulkarni-bc9qf
    @chandrashekharkulkarni-bc9qf 9 месяцев назад +3

    इतकं सर्वगुण संपन्न कुणी असु शकते यावर विश्वासच नाही बसत. तुम्हाला देवाने सर्वगुण संपन्न बनवलंय.

  • @hariom857
    @hariom857 8 месяцев назад +8

    you are providing all new meaning to rural life and contentment. in last several years general media and perception have reduced the villages to a place of all sad things and backwardness - but you are like fresh air, breathing new hope - bringing out the hidden gems of awesome cultures, beautiful customs, food and what not. keep rocking, your blog is much needed break from mad rush and admiration to urbanization. just wow.

  • @pravinsannake1779
    @pravinsannake1779 9 месяцев назад +1

    तुमचा, मनाला भावणारा साधेपणा.. बहु आयमी आपले छंद पण त्याच बरोबर कोणताही गोष्टीतील सहजता जपणारे आपले व्यक्तिमत्त्व खूप उंचीवर नक्कीच जाणार, निसर्गाचे वरदान आपणास लाभ ले आहे...नक्कीच.. 🙏

  • @manaseesarawate5991
    @manaseesarawate5991 7 месяцев назад +9

    दिखाऊ, बेगडी आधुनिकीकरणाच्या नावाखाली सध्या जी तरुण मुलं मूळ संस्कृती पासून दूर जात आहेत त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारं तुझं वागणं आणि बोलणं आहे. साडी नेसून किती सहज काम करतेस ! शेणात हात किती आनंदाने घालतेस , शेण ताजं आहे म्हणताना तुझ्या चेहर्‍यावर जी प्रसन्नता दिसली ना ती खूप छान !

  • @user-yv9ww9ls1y
    @user-yv9ww9ls1y 2 месяца назад +3

    Phar mehnati mulgiee aaheas..tu Ani sanskari paan aaheas..live simple Life 👌👍

  • @user-ee3tw2nm8q
    @user-ee3tw2nm8q 9 месяцев назад +1

    स्वानंदी दिपावली च्या खूप खूप शुभेच्छा. तु दीपावली किती नैसर्गिकरीत्या साजरी केलीस त्या बद्दल प्रसन्न हि झालो आणि हेवा हि वाटला. कारण ह्या तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा तुझी नाळ निसर्गाशी कीती घट्ट जोडली गेलेली आहे हे दिसते. तुझी निसर्गातील घटकांबरोबर असलेली सहजता आणि तुझे गुणगणने या मुळे मी फार भारावून गेलो आहे. मी आज ५५ वर्षाचा आहे परंतु तुझ्या या व्हिडिओ मुळे ३५-४० वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळाला त्याबद्दल धन्यवाद तसेच तुला सुसंस्कारित केल्या बद्दल तुझ्या आईबाबांना हि खूप खूप धन्यवाद.

  • @sahebraopatil8283
    @sahebraopatil8283 4 месяца назад +11

    चिरंजीव स्वानंदी, आमच्या काळात म्हणजे 1965 ते 1975 पर्यंत च्या काळात मी शाळेत असताना आकाश दिवा बाजारात मिळतच नसायचा, म्हणजे आमच्या लातूर - मराठवाडय़ात, तेव्हा आम्ही आकाश दिवा घरीच बनवायचे. साहेबराव पाटील, लातूर.

  • @unmeshsadhale2878
    @unmeshsadhale2878 9 месяцев назад +5

    Very beautiful Swanandi ! Your location, your house and you too.! Young girls like you are keeping Hindu traditions alive in remote villages in Maharashtra. So nice !!!

  • @t3script791
    @t3script791 9 месяцев назад +1

    नेहमी प्रमाणे अत्यंत सुरेख रित्या खरी दिवाळी पाहता आली. दिवाळीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. असेच छान vdo बघायला आवडेल.

  • @ujwalapande7407
    @ujwalapande7407 5 часов назад

    सरदेसाईँचा वाडा व छ.शँभूराजेँचा काय संबंध आहे कळेल कायं...❤

  • @user-gs9tp4tw4z
    @user-gs9tp4tw4z Месяц назад

    स्वानंदी तु सर्व गुणसंपन्न तर आहेसच पण तू उत्तम माणूस आहेस तू उत्तम ग्रृहिणी होशीलह्यात शंका नाही तुझ्या कडून शिकण्या सारख खुप आहे !तुला खुप शुभेच्छा !तुझेव्हीडियो छानच असतात ,बघायला छान वाटत ❤

  • @nandkishoradivarekar2929
    @nandkishoradivarekar2929 9 месяцев назад +1

    खुपच छान स्वानंदी... नावाप्रमाणेच प्रत्तेक कामात आनंदी असते.. हेच तुझं आम्हाला खुप कौतुक वाटतं... प्रत्तेक कामात हुशार... संस्कृती जपतेस... हेच तुझ मोठेपण..❤
    गो धन पण मस्तंच.. मला खुप भावले... दीपावली च्या खूप खूप शुभेच्छा स्वानंदी .. प्रत्येक व्हिडिओ मस्तंच असतो..तो पण गावच्या घरचा.. आणि आजू बाजूचा परिसर खूपच छान आहे...❤
    शुभ दीपावली स्वानंदी 🎉❤

  • @pravinnimbalkar5626
    @pravinnimbalkar5626 5 месяцев назад

    सुसंस्कृत, सालस, सौंदर्य, समाधान, स्वानंद, समरसता, सौजन्य या सर्व विशेषणांच दृश्य रुप म्हणजे स्वानंदी

  • @dhananjayralegankar3220
    @dhananjayralegankar3220 9 месяцев назад +2

    बाळा तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
    तू खूप मोठी हो, तुला माझा आशिर्वाद.
    जय जय श्री. स्वामी समर्थ.

  • @AT-qx6db
    @AT-qx6db 6 месяцев назад

    खूप दिवसांनी अस्खलित, शुद्ध आणि ओघवतं मराठी ऐकायला मिळालं. सुखद. धन्यवाद.
    बाकी ग्रामीण कोकण आणि traditions बघणं आल्हाददायक 🙏🙏🙏

  • @kalpanajoshi2341
    @kalpanajoshi2341 3 месяца назад

    स्वानंद भरभरुन घेणारी व देणारी गोड स्वानंदी.धन्य तुझे माता-पिता. Love you beta. ❤🎉😃🙏

  • @Geeta-wi1hf
    @Geeta-wi1hf 7 месяцев назад +1

    Madhe madhe je gun gunte te aagdi man prasann krun takt me konacha hi vlog aasa aavdine nahi bghitla pn tuzhe vlog aavdine bghte❤❤ kiti shant aahes tuzh boln hi kiti god aani shant aahe aasch bolat raha aamhala aekayala khupch aavdel❤❤

  • @vinayakpatil7229
    @vinayakpatil7229 9 месяцев назад +5

    अजून एकदा 100 पैकी 100 marks..भारीच आहे vlog👌🙂 तुमच्या चेहऱ्यावरच हसू असच उत्तरोत्तर बहरत राहो अशा शुभेच्छा 🙂 शुभ दीपावली 🌼🌸🌼

  • @user-qt4qs4cq7v
    @user-qt4qs4cq7v 9 месяцев назад +7

    The more I watch you the more I fall in love with you, village life and off course our Kokan..😍❤️❤️❤️

  • @harshachavan4424
    @harshachavan4424 3 месяца назад

    खुप छान तुझं वावरण , तुझं बोलणं..अजुन एक कोकणी रानमाणुस (कन्या) घडताना दिसतोय....प्रेरणा मिळतेय पंचमहाभुतांसमवेत राहण्याची..

  • @amit.6629
    @amit.6629 9 месяцев назад +1

    तुला आणि तुझ्या कुटुंबातील सर्वाना प्रभानवल्ली मधील पत्की कुटुंबाकडून सर्वांकडून दिवाळीच्या लाख लाख सुभेच्छा

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 9 месяцев назад

    ताई तुला दिपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
    तुझ्या व्हिडिओ मध्ये अजूनही कोकणातील आपल्या रूढी परंपरा तू जपल्या आहेस.हे पाहून मनाला खूप आनंद झाला.
    छान

  • @shreecreativearts5132
    @shreecreativearts5132 9 месяцев назад +1

    पारंपारिक दिवाळी कशी साजरी केली जाते, जी खरी दिवाळी आहे, असा सुंदर व्हिडिओ शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही दगड, माती आणि शेणखताने बांधलेला किल्ला खरोखरच अप्रतिम होता. विविध पुतळे आणि सजावट परिपूर्ण होती. तुमचे सादरीकरण आणि तुमचा साधेपणा मनमोहक आहे. तू खरच इतकी साधी आहेस का? तुमच्या सर्व कलागुणांना जोपासल्याबद्दल तुमच्या पालकांना सलाम. शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @dattarajbhogale344
    @dattarajbhogale344 9 месяцев назад +7

    U r preserving Konkani culture, so we all Konkani feel proud of u , Swanandi. Keep it up & best of luck for your upcoming life. Have Happy Diwali to u & to your family . God bless u .

  • @CrazySangamneriCouple
    @CrazySangamneriCouple 8 месяцев назад

    स्वानंदी, नेमकं कोणत्या शब्दाने तुझं कौतुक करावं हेच सुचेना.. तू किती शालीन, साधी, सुसंस्कृत, सुमधुर आणि सदाचारी आहेस हे प्रत्येक कृतीत स्पष्ट दिसतंय.. 🤗 कायम अशीच रहा..
    तुला पुढील प्रवासास अनेक शुभेच्छा ☺️🙏

  • @dattaramsalunke5467
    @dattaramsalunke5467 4 месяца назад +1

    ताई तुम्ही खूप छान बोलता, ऐकताना छान वाटते तूमचे व्हिडिओ पहाताना खूप मजा येते

  • @shrikantparkhi8163
    @shrikantparkhi8163 9 месяцев назад +1

    पारंपारिक पणे सण साजरे करण्याची संस्कृती कुठे काळाच्या आधुनिक गोष्टीत हरवत आहे.आणि आपण ती जपत आहात ही गौरवाची गोष्ट आहे. धन्यवाद् !

  • @mukunds65
    @mukunds65 9 месяцев назад

    लहानपण देगा देवा! बालपण सर्रकन तरळून गेले...कंदील, किल्ला याहीपेक्षा त्यातील निरागसता आणि निसर्गाशी जपलेली नाळ जास्त भावली...खूप छान!

  • @PravinAmbardekar
    @PravinAmbardekar 9 месяцев назад

    तुमच्यामुळे लहानपणीच्या किल्ला, फटाके, नवीन कपडे, आकाशकंदील, इत्यादि, आठवणी जागृत झाल्या. तुम्हा सर्व कुटुंबीयांना दिवाळच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @user-of3rs9nv5e
    @user-of3rs9nv5e 9 месяцев назад +1

    स्वानंदी नावाप्रमाणेच खूप आनंदी आहेस ,तुझ्याकड़े खूपच सृजनशीलता आहे.....
    Video खूपच सुंदर आहेत
    निसर्ग तर अफलातून....
    From - Baramati
    🎉🎉🎉🎉

  • @user-uq3wm5gf4g
    @user-uq3wm5gf4g День назад

    Very nice. Swanandiji you are so nice. So loving. You are doing all our traditions from bottom of your heart. God bless you. ❤

  • @SmitaJhoshi
    @SmitaJhoshi 23 дня назад +1

    स्वानंदी कसली भारी आहे स तू?तुझा किल्ला रांगोळीफराळ सर्वच भन्नाट!

  • @milindlingayat8831
    @milindlingayat8831 9 месяцев назад

    दिपावली निमित्त खुपखुप शुभेच्छा .आपली भारतीय संस्कृतीची महती सर्वापर्यत कळवलीत . तुम्हाला खुपखुप धन्यवाद. तसेच आकाशकदिल व किल्ला सुंदर बनवलात .दिवाळीफराळ तुमच्यासारखा ऊत्तम आहे. किल्लाबनवतानाच गुणगुणनपण छान निरागस होत.❤❤❤❤❤

  • @shridharparadkar5149
    @shridharparadkar5149 9 месяцев назад +1

    शुभ दिपावली ! आजकालच्या दिवसात आपली ही संस्कृती, परंपरा जपणारी दिवाळी फार आवडली.

  • @amit.6629
    @amit.6629 9 месяцев назад

    तुझे सगळेच विडिओ तुझ्या नावाप्रमाणेच अतिशय हसमुख सुंदर अतिशय विषय समर्पक हाताळून खूपच सुंदर आणि प्रत्येक व्हिडिओस न तोडता बघत बसावे असेच असतात . निसर्गाने तुला सुंदर आवाज प्रत्येक विषय अगदी छानपैकी मांडणी अतिशय साध्या पद्धतीने व्यक्त करणे ही परमेश्वराची खूपच मोठी देणगी आहे तुला. तुझी नाळ अजून जन्म भूमीला घट्ट पकडून आहे तुला तुझ्या पुढच्या आणि आत्ता पर्यंत च्या सर्व ब्लॉग ना मनपूर्वक शुभेच्छा माझे आजोबा हे ही प्रभानवल्ली तील जन्म असून त्या च्या जवळील भूमी ची तू असून खूपच सुरेख अस तू प्रेझेन्टेशन करतेस कोकणाच्या भूमीचा सणवार तेथील शेती काजूउद्योग सारख्या विषयांवर व्हिडीओज बनवले पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.👍👍💐💐🎉

  • @Khavchat
    @Khavchat 9 месяцев назад +1

    किल्ला, आकाशकंदील मस्त!! घरच्या घरी आपल्या हातांनी बनवलेल्या गोष्टींची मजा औरच असते.
    शुभदिपावली!!
    🙏🪔🚩🪔

  • @ResidentIndia-yr8do
    @ResidentIndia-yr8do 9 месяцев назад

    अशी सुंदर दिपावली, बघून आनंद झाला, माझी तुझी आपली संस्कृती, चित्रफिती च्या मध्मातून, बघटल्यावर शब्दा नाहीत माझ्याकडे, सुंदर अती सुंदर

  • @NitSat29
    @NitSat29 9 месяцев назад +10

    God has gifted you with immense talent and simplicity- a rare combination in current generation. The ingenuity of the content ,and ability to present it as it is, make it a real pleasure. Keep up the good work. Don’t make videos if you feel the content is not worth it. As it is, there are lot of Konkani RUclipsrs , showing rubbish. Keep yourself away from them. Hope you take my unsolicited advice in good spirits. Best wishes .

  • @prasaadpatil7210
    @prasaadpatil7210 9 месяцев назад +2

    आपल्या सगळ्या ची नाळ आपल्या मातीशी कायम राहुदे...छान वाक्य!

  • @sureshkulkarni6194
    @sureshkulkarni6194 4 месяца назад

    Tuzhe aai vadil kiti bhagyawan aahet tuzhyasarkhi sarvgun samppan mulgi janmala aali, tuzha awajpan kiti chhan aahe, karave tevadhe kavuk kamich aahe. 👌👌👍.

  • @user-go2mr2uz3b
    @user-go2mr2uz3b 9 месяцев назад +4

    Very envious of your simple, rustic and yet very true to traditional life once I used to have as s school going kid. However, with the time all this turned into a concrete jungle in Mumbai suburb. Heartfelt thanks for taking down the memory lane of Deepawali celebration. God bless you.

  • @Indian-fo8wl
    @Indian-fo8wl 9 месяцев назад +5

    Great pleasure to see you again & again....

  • @pralhadpawar3092
    @pralhadpawar3092 6 месяцев назад

    सुंदर, सुशिक्षित, सुसंस्कृत असा त्रिवेणी संगम म्हणजे "स्वानं दि"
    प्रत्येक घरात अशी लेक जन्माला यावी.

  • @chetakshende-je7ow
    @chetakshende-je7ow 6 месяцев назад

    बालपण, माती, संस्कृती आणि इतिहासाचा अमूल्य वारसा अप्रतिम vlog.

  • @pallavbondre4056
    @pallavbondre4056 9 месяцев назад

    खूप छान विडिओ आणि तुझे शब्दांकन, तुमचे हे दिवाळी साजरीकरण खरेच खूप मनाला भावले, कंदील झक्कास..रांगोळी😊, फराळ चकली भन्नाट, किल्ला तर मस्तच..शेणमातीने त्याचे भक्कमीकरन खरेच दिल खुश हो गया.. त्याचे बारीकबारीक detailing सुरेख, वसुबारस गोमातेची आणि तिच्या वासराची पूजा गाई गुरांचे महत्व किती महत्वाचे आहे..मंडी आणि तिचे वासरू ग्यानू-बटर नावं सुरेल..यमदीप ऐकले होते, पण पाहिले पहिल्यांदाच..कारीट आम्ही पण फोडतो, टिळा लावतो..👍👍 फराळ प्रथम ग्रामदेवतेला 👍👌👍 आणि मध्ये मध्ये तुझे गुणगुणणे वातावरण प्रसन्न वाटले..

  • @arunmore4205
    @arunmore4205 9 месяцев назад +2

    Great 👍 Swanandi you are really great.
    दिपावलीच्या तुला अन् तुझ्या परिवाराला शुभेच्छा

  • @PranaavJadhav
    @PranaavJadhav 5 месяцев назад

    स्वानंदी, काल दुपारी मी एक पेपर लिहित होतो, आणि अमेरिकेच्या एका लायब्ररीत बसून तुझे वीडियो पाहत होतो. शांतता राखणे नियमांनुसार गरजेचे होते त्यामुळे हेडफोन लावून तुझे २-३ वीडियो पाहिले. दिवाळीचा वीडियो पाहताना मन अक्षरशः भरुन आले आणि डोळ्यातून अश्रू . किती छान सुंदर मांडणी आहे तुझी, परत येण्याची ओढ लावलीस. आपली मातीतील माणसे किती सुंदर आहेत, मामा आजोबांचा घर बघून तर खूप भारी फीलिंग आले. तुझा शतशाह आभार स्वानंदी. असेच natural साउंड चा वापर करून वीडियो बनवत रहा. तुझ्या वीडियोने एखादा सातासमुद्र पार माणूस सुखावू शकतो. खूप सारे प्रेम आणि लाख लाख शुबेच्छा. ❤❤

  • @sourabhpadhye4506
    @sourabhpadhye4506 9 месяцев назад +1

    स्वानंदी तुला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा ....व्हिडिओ नेहमीप्रमाणे खूप छान...प्रत्येक दिवसाची माहिती छान सांगितलीस...किल्ला बघायला येईन😊

  • @sharadgavande5871
    @sharadgavande5871 8 месяцев назад

    किती छान व्हिडिओ,तुझ बोलणं वागणं आणि सात्विकता नम्रता, तुझ्यासारखी लेक आसावी असं प्रत्येकाला वाटेल

  • @chintamanimehendale2863
    @chintamanimehendale2863 Месяц назад

    Simple आणि सुंदर दिसत आहेस त्या sky blue साडी मधे 👌🏻

  • @moondreemz1
    @moondreemz1 9 месяцев назад +3

    याला जीवन ऐसे नांव 😊
    निसर्गाशी सुसंगत..
    निसर्गासोबत..निसर्गाला सोबती बनवून रोजचा दिनक्रम आखणे!
    किती सुंदर!! किती छान!!!
    कधी एके काळी हा अनुभव काही काळासाठी घेता आला होता..याची आठवण झाली आज ☺️🌿
    दीपावलीच्या शुभेच्छा!🪔

  • @vinayakmali3084
    @vinayakmali3084 9 месяцев назад +3

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉

  • @vinodiya19
    @vinodiya19 9 месяцев назад

    आकाशकंदील, किल्ला, रांगोळी, फराळ, गाय वासरू पूजा, आणी ते पण छानपैकी गुणगुणत.. मागे कोकण रेल्वे चा एक छोटा आवाज. अजून काय पाहिजे.. शांत शांत. धनवान स्वानंदी ताई.. श्रीमंती मनाची, शांततेची,.. कॅमेरा मागे असणार्‍या आई किंवा अजून कोणी व्यक्ती ला मनापासून धन्यवाद व नमस्कार सांगा.

  • @narayani3
    @narayani3 6 месяцев назад

    Best part for me is तुझ प्रत्येक व्हिडिओ मधलं गुनगुनण, आणि पक्ष्यांची किलबिल इतर बॅकग्राऊंड म्युझिक पेक्षा हे फार युनिक आहे तुझे प्रत्येक व्हिडिओ खूप छान मनाला सुख शांती देतात तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश देवो हीच देवा चरणी प्रार्थना

  • @YuvrajPatil-eq1se
    @YuvrajPatil-eq1se 9 месяцев назад +1

    Tuja achar vichar yatun sanskruti deste wa sawanadi tu grit ahys 👏🌹🌹🌹

  • @satishkakade1270
    @satishkakade1270 9 месяцев назад

    कोंकण संस्कृतीच खुपचं छान दर्शन घडवलं त्याबद्दल धन्यवाद. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @anilgudekar4311
    @anilgudekar4311 9 месяцев назад

    अतिशय सुंदर व्हिडिओ. लहानपणीच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तुमचा प्रसन्न चेहरा आणि हसण फारच सुंदर वाटते.

  • @govindgaikwad4393
    @govindgaikwad4393 7 месяцев назад +1

    फारच सुंदर किल्ला आणि दिवाळी फराळ 🎉😊👌👍

  • @aaamp21
    @aaamp21 9 месяцев назад

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. खरंच तुझं कौतुक करावं तितकं कमीच आहे. आजच्या काळात आपल्या संस्कृती परंपरा यांची माहिती असणारी आणि सर्व गोष्टी एवढया आत्मीयतेने करणारी आजच्या पिढीतील मुलगी म्हणजे अगदी दुर्मिळ च. तुझ शांत बोलणं आणि साधेपणा यामुळे ब्लॉग संपूच नये असा वाटत. तुला खूप शुभेच्छा

  • @vaidehipandit2548
    @vaidehipandit2548 7 месяцев назад +1

    Mi just tuze channel subscribe kela Ani itaka chan vatala tuze vlog bhagun...kup sunder swanadi nava pramane swata chya anandat asates...kup sunder atmosphere aahe tuza gaon cha...mama chya ghar chi athavan zali...tuza gharichi tour kar na ekda...kup avadel bhagyala...गाई na khup❤❤❤❤

  • @shirishkhandekar9052
    @shirishkhandekar9052 9 месяцев назад

    स्वानंदी खूप छान दिवाळी साजरी केलीस,अगदी माझ्या मनातील 😊 सर्व बघून खुप आनंद व समाधान वाटले 🙏

  • @prathameshbagkar3878
    @prathameshbagkar3878 2 месяца назад

    Tuja bola khup sundhar ahe boltes na theva nusta ikata rhavasa vata Ani jevda tuja bolna sundhar ahe na tevdich tu dishyala pan sundhar ahes khuppp ❤

  • @ashokwalke2077
    @ashokwalke2077 8 месяцев назад

    खुप खूप शुभेच्छा, आणि सर्व काही खुपच छान अग्दी खुप मनापासुन धन्यवाद,

  • @ashishkande9082
    @ashishkande9082 9 месяцев назад

    ताई तुझ्यात सरस्वती देवीचा वास आहे.. सर्व गुण संपन्न

  • @sachinghadi14
    @sachinghadi14 9 месяцев назад +2

    दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा.

  • @user-mx8pb3em4n
    @user-mx8pb3em4n 2 месяца назад

    गावाकडची दिवाळी खूपच छान तुझा किल्ला तर खूप सुंदर पण तुझ्या सारखी बहू गुणी लेक आपल्या पोटी जन्माला यायला पण भाग्य लागत म्हणून तुझी आई खूप भग्याची आहे 🙏❤

  • @MAITREE-by5wt
    @MAITREE-by5wt 9 месяцев назад

    किती सुंदर कंदील, किती छान किल्ला, किती गोड विचार व किती गोड presentation असे वाटत होते हे संपू नये असेच चालत राहावे.

  • @nitinsurve5104
    @nitinsurve5104 9 месяцев назад

    खुप छान video आहे... तुमचे व्हीडिओ खूप छान आहेत... आणि आपल्या कोकणातील संस्कृती दाखवल्याबद्दल धन्यवाद... तुम्ही ज्या पद्धतीने गोठ्यात जाऊन काम करतात आणि सारवता बघुन छान वाटतं... शुभ दिपावली... 🙏🙏

  • @pradeepmorajkar3947
    @pradeepmorajkar3947 9 месяцев назад +1

    तूझा किल्ला छान, तू गुणगुणलेलं शूरा मी वंदीले त्याहुन छान. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 9 месяцев назад +2

    शुभ दीपावली 🪔🪔🪔🪔🪔 ताई खूप छान माहिती दिली आहे 👍👍👍👍👍

  • @ganeshnarvekar3876
    @ganeshnarvekar3876 9 месяцев назад

    अप्रतिम छान, फारच छान, खऱ्या अर्थाने संस्कृती जपते आहेस, जगते आहेस , तुला मनापासून शुभेच्छा, शुभ दिपावली💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🎉🙏🏻🙏🏻

  • @sumitasamant1051
    @sumitasamant1051 9 месяцев назад +1

    My memories awoke when I was a primary school student. We all the friends used to make Aakash Kandil then. Best video ever seen. Happy Diwali ,Madam.

  • @neelbarsode6796
    @neelbarsode6796 9 месяцев назад +2

    Humming songs in between the narratives add spice to the story, makes it more beautiful

  • @arunmayekar8017
    @arunmayekar8017 9 месяцев назад +1

    Kandil chan zhala ani Kila sudha mast Diwali chya shubechya

  • @kiranfoundation7800
    @kiranfoundation7800 9 месяцев назад +3

    Bravo....Wow.... Loved the Akash Kandil .... Amazing....This is pure celebration of Diwali.... At our grannies house even we used to do all such things and it was greatest Diwali we had ever celebrated.... Applying cow dung on floor was rituals of all our brothers and neighbours....Blessed to see great culture live from thou..... Keep going... Salute....God Bless!

  • @nareshekbote3887
    @nareshekbote3887 9 месяцев назад +8

    Love your videos...how simplicity is so so wonderful and how badly we miss this