Dry Ration Kit in COVID-19 Wave two

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 июл 2021
  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता व गांभीर्य अधिकच हानीकारक ठरली या बद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. यात सुद्धा पुनः टाळेबंदी (लॉकडाऊन), ही प्रमुख उपाय योजना राबविण्यात आले हे ही आपण जाणता. पण यामुळे लाखों कुटुंबावर पुनः उपासमार ओढवली. मजूर, छोटे व्यावसाईक, निराधार वृद्ध, बांधकाम कामगार, अश्या अनेकांना जगण्याची भ्रांत निर्माण झाली. पहिल्या कोरोना लाटेत मानवलोक मार्फत १३ हजार पेक्षा अधिक रेशन किट वाटप करण्यात आल्या होत्या.
    दुसऱ्या लाटेत मानवलोक मार्फत १४ कोविड केअर सेंटर उभारण्यात आले ज्यामुळे विकेंद्रीतरित्या पेशंटना उपचार करता आले आणि असीमटेमॅटिक पेशंट लवकर बरे होऊ शकले. या व्यतिरिक्त अनेक उपक्रम राबवून सुद्धा आता पर्यंत ३०००+ कुटुंबांना रेशन किट वाटप करण्यात आल्या आहेत. यातून किमान १५ दिवसांचे अन्न या कुटुंबांना पुरेल इतके धान्य, डाळी, साखर, तेल, साबण, मसाले इत्यादी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
    मानवलोक संकटाच्या काळात आपल्या लोकांना "सामान्य माणसांना" आवश्यक शक्यती सर्व मदत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

Комментарии •