क्षेत्रभेट सहल 2022, खाजगी प्राथमिक विद्या मंदिर, पिंपळगाव (हरेश्वर)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • दि 17 डिसेंबर 2022 शनिवार रोजी सालाबादाप्रमाणे आपल्या खाजगी प्राथमिक विद्या मंदिर पिंपळगाव (हरे) शाळेची "क्षेत्रभेट सहल" विद्यार्थ्यांना परिसराची ओळख व्हावी व निसर्गाशी मैत्री व्हावी म्हणून, श्री हरीहरेश्वर मंदिर व परिसर येथे आयोजित करण्यात आली होती....!!
    यावेळी विद्यार्थ्यांना परिसराची व पशु, पक्षी यांची तसेच परिसरातील झाडे-झुडपे, वेली, फळबागा, आंतरपीक, रब्बी पिके, सिंचनाच्या पध्दती, गॅस एजन्सी, बहुळा नदी, डुब्ब्याचे धरण, K T वेअर यांची ओळख करून देण्यात आली...!!
    तसेच श्री हरीहरेश्वर मंदिराच्या इतिहासाची सविस्तर माहिती देण्यात आली...!!
    त्यानंतर विद्यार्थ्यांनी मंदिराच्या परिसरातच वनभोजनाचाही आस्वाद घेतला तसेच गाणी गोष्टी यांचाही आनंद घेतला...!!
    अशा प्रकारे क्षेत्रभेट सहल अगदी आनंदात व उत्साहात पार पडली...!!
    यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री शशिकांत महालपुरे सर, सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते...!!
    😊😎😇✌🏼✌🏼🙏🙏😍😍

Комментарии •