🌺 चंपाषष्ठी उत्सव २०२४ 🌺
HTML-код
- Опубликовано: 14 дек 2024
- 🌺श्री स्वामी समर्थ 🌺
🙏🐎चंपाषष्ठी 🐕उत्सव🟡🌼
🌺श्री स्वामी समर्थ व श्री साई दत्त सेवा ट्रस्ट माजिवडा, ठाणे. 🌺
येथे शनिवार दि. ७ डिसेंबर रोजी चंपाषष्ठी निमित्त उपाध्यक्ष :- श्री.राजदिप म्हात्रे व.सौ.लिना राजदिप म्हात्रे या दांपत्याच्या हस्ते खंडोबाचा गोंधळ करण्यात आला.वांग्याचे भरीत- भाकरी, पुरणपोळी व जिलेबीचा नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले.
अनेक भाविकांचे कुलदैवत असल्याने खुप लांबुन म्हणजे अर्धा ते एक तासाचा गाडीवरचा प्रवास करुन देखील भक्त आलेले होते.
मंदिरात खुप गर्दी झाली होती.सोन्याच्या जेजुरी सारखे खंडोबामय, स्वामीमय वातावरणात भाविकांनी गोंधळाचा आनंद घेतला.
कुलदैवता चा (कुलधर्म कुलाचार)तळी- आरती पुजा निट शांत पणे करता आली याचा आनंद/ समाधान भाविकांच्या चेह-यावर दिसत होते.
🌺येळकोट येळकोट जय मल्हार!!! 🌼 सदानंदाचा येळकोट!!! 🌼