अंगारकी संकष्टी चतुर्थी माहिती व पूजा कशी करावी ? अंगारकी चतुर्थी व्रत उपवास | Ganesh Chaturthi 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 июн 2024
  • Angarki Sankashti Chaturthi 2024 - अंगारकी संकष्टी चतुर्थी माहिती व पूजा कशी करावी ? अंगारकी चतुर्थी व्रत उपवास | Ganesh Chaturthi 2024
    प्रत्येक महिन्यात दोनवेळा चतुर्थी योग असतात. दोन्ही चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित आहेत. शुक्ल पक्षावर पडणार्‍या चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला ‘संकष्टी चतुर्थी’ म्हणतात. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी उद्या म्हणजेच 2 मार्च रोजी आहे. जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला ‘अंगारकी चतुर्थी’
    व्रताची कथा
    एकदा माता पार्वती आणि भगवान शिव नदीजवळ बसले होते, तेव्हा अचानक माता पार्वतींनी चौपद खेळण्याची इच्छा व्यक्त केली. पण समस्या अशी होती की, खेळामध्ये निर्णय घेणार्‍याची भूमिका बजावण्यासाठी दुसरा कोणीही व्यक्ती नव्हता. हा प्रश्न सोडवण्यासाठी शिव आणि पार्वती यांनी मिळून मातीची मूर्ती बनविली आणि त्याला जीवदान दिले.
    दोघांनीही मातीपासून बनवलेल्या या मुलाला हा खेळ पाहण्याचा आदेश दिला. तसेच, कोण जिंकला आणि कोण हरला, हे ठरवण्याचा आदेश दिला. हा खेळ सुरू झाला, ज्यामध्ये माता पार्वतीने भगवान शिव यांना वारंवार पराभूत करून विजय मिळवला. हा खेळ सुरूच राहिला, पण एकदा मुलाने चुकून माता पार्वतीला हरल्या, असे म्हटले.
    मुलाच्या या चुकीमुळे माता पार्वतीला खूप राग आला, म्हणून तिने रागाने त्या मुलाला शाप दिला आणि तो लंगडा झाला. आपल्या चुकीबद्दल मुलाने मातेकडे खूप दिलगिरी व्यक्त केली. मग माता पर्वती म्हणाली की, आता शाप परत घेऊ शकत नाही, परंतु मी एक उपाय सांगू शकते ज्यामुळे तू शाप मुक्त होशील. माता म्हणाली की, काही मुली संकष्टीदेवाशी या ठिकाणी पूजेसाठी येतात, तुम्ही त्यांना उपवासाची पद्धत विचारा आणि ते व्रत प्रामाणिक मनाने करा.
    व्रत करण्याची पद्धत जाणून घेत, मुलाने आदरपूर्वक आणि नियमांनुसार हे व्रत केले. भगवान गणेशाने त्यांच्या खऱ्या उपासनेवर प्रसन्न होऊन, त्यांची इच्छा विचारली. मुलाने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. गणेशाने त्या मुलाची मागणी पूर्ण केली आणि त्याला शिवलोकी धाडले. परंतु, जेव्हा तो तेथे पोहोचला, तेव्हा त्याला फक्त भगवान शिव दिसले.
    माता पार्वती भगवान शिवांवर रागावली आणि कैलास सोडून गेली होती. शिवाने जेव्हा त्या मुलाला विचारले की, आपण इकडे कसे आलात? तेव्हा त्याने त्यांना सांगितले की, गणेशाची पूजा करुन मला हे वरदान मिळाले आहे. हे जाणून घेतल्यानंतर भगवान शिवनेही पार्वतीची समजूत काढण्यासाठी हे व्रत केले, त्यानंतर माता पार्वती भगवान शिवावर प्रसन्न झाल्या आणि कैलासवर परत आल्या. अशाप्रकारे ‘संकष्टी चतुर्थी’ व्रत पाळणाऱ्याच्या सर्व मनोकामना गणपती पूर्ण करतात.
    Song Credits:
    Album:
    Song Name:
    Singer:
    Lyrics:
    Music:
    Producer: Fountain Music Company
    Production: Rohit Kathuria
    Don't forget to Subscribe to stay updated on new Marathi Plays.
    goo.gl/23dHwK
    Visit "Marathi Bhakti Sangeet" & Please Subscribe to this channel - bit.ly/2shI20D
    Also do comment and share the video with your loved ones.
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 4

  • @piyunarwade3682
    @piyunarwade3682 21 день назад +2

    🙏🙏

  • @archanapatil7720
    @archanapatil7720 20 дней назад +1

    अप्रतिम व्हिडिओ👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @MarathiGaurav
      @MarathiGaurav  20 дней назад

      गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @Santoshkhemnar9029
    @Santoshkhemnar9029 Месяц назад

    चंद्रोद्यापूर्वी ही उपवास सोडला तरीही चालतना मी, आमच्या गुरूंना विचारलं होतं तेव्हा ते बोलले असं काही नाही