पंचतंत्र
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- 'माझ्या वंशाला पोरगा होऊ दे,' असा नवस, माळावरच्या जहाल म्हसोबाला बोलून शिद्राम लिंगल्याने एक लहान बोकड गावात सोडलं, त्याला आता सहा वर्ष झाली होती, शिद्रामची बायकू अजून पोरगा', 'पोरगा' घोकतच होती. दरम्यान, अष्टौप्रहर मोकळ हिंडून आणि मन मानेल ते खाऊन बोकड भलतंच माजलं होतं.
त्याचा मूळचा रंग आता मळकट पिवळा झाला होता. हनुवटीवर टिचभर दाढी लोवत होती. मानेवर आणि फऱ्यावर राठ केस उभे राहिले होते. एखाद्या जंगी पहेलवानासारखा हा बोकड गावच्या पेठेतून चालू लागला की, नाक दाबून बाजूला व्हावं लागावं असा वास सुटे.
आपल्या माजावर आलेल्या शेळ्या गरजू लोक ह्या बोकडाकडून काढून घेत, एवढाच
त्याचा उपयोग. बाकी तिन्ही त्रिकाळ बोकड मोकळा असे. बाजारपेठेतील दुकानाच्या
एखाद्या फळीवर तो पेंगत बसलेला दिसे.
खाण्यापिण्याची त्याची कधी आबाळ होत नसे. रोज सकाळी भाजी मंडई असे, तिच्यात शिरून तो कुठेही मुस्कट घाली आणि कधी हिरवी मेथी, कधी कोथिंबीर, कधी करडई अशा तोंडात येतील तेवढ्या जुड्या घेऊन पळे. मागून शिव्या, धपाटे, धोंडे अंगावर पडत: त्याचे ह्याला काही नसे. त्याची तर चैनच होई. भरपूर खायला मिळे. अधून-मधून लोकांची परडी, गावाशेजारचे मळे होतेच. देवाच्या बोकडाने कुठेही घुसावे आणि काहीही खावे.
आता एवढे सुखी आयुष्य असताना गाव सोडून बाहेर भटकण्याची काही जरुरी होती का?
व्यंकटेश माडगुळकर लिखित एका बोकडाची गोष्ट
Yout Queries:
#Kathakathan
Abhivachan
Vinodi katha
Bhay katha
Malvani
Storytelling
मस्त झाली कथा. खराखुरा बोकड डोळ्यासमोर आला.
Wow, खूप खूप धन्यवाद अल्का मॅम💐
अप्रतीम सादरीकरण ज्ञाना, निलेश. पूर्ण ऐकल्यशिवय थांबू शकत नाही.
अभिनंदन !!!
अण्णासाहेब ,थँक्स सो मच सर...💐माडगूळकरांची वाटसरू पण भन्नाट आहे,हो ना?
व्वा,निलेश,ज्ञानेश
आवाज फार छान लागलेत
मस्त सादरीकरण👌👍💐💐
खूप खूप धन्यवाद अंजली मॅम🙏🥰❤️
वाह अप्रतिम.. आवाज... 👌👌👌
खूप खूप धन्यवाद ज्योत्स्ना जी🙏
मस्तच👌👌👌
खूप खूप धन्यवाद सर💐
Nilesh sir 💯😍👌
थँक्स सो मच 🥰🙏
😀😀🙏✌️ गौतम ..!!
आवाज खूपच छान, ऐकत राहावं असं सादरीकरण ,ऑल दि बेस्ट
खूप छान सादरीकरण केलं सर
छान... सादरीकरण 🎉
खूप छान सादरीकरण 👌 परिणामकारक नाट्यपूर्ण अभिवाचन! Perfect timing 👍
😊🙏
Hello sir tumcha avaj ani sanga yachi paddhat khupch chan ahe 😊
Krupya tumhi bhaykatha hi sadar karave hi vinnanti 🙏🏼
मस्त👍👍
खूप छान कथा
☝️👌👌
😊🙏
खुप छान सादरीकरण
धन्यवाद लीना मॅडम🥰❤️
Gosta chan hoti pan sewat khup ghan hota.dev pratha kadhi band hoyil mahiti nahi