नवरात्रीच्या नवव्या दिवशी पूजन करायचं सिद्धिदात्री देवीचं… |Navratri | Merak Events

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2023
  • बंध नात्यांचे...
    रंग ऋणानुबंधाचे...
    नवरात्रीच्या नवव्या दिवशी पूजन करायचं सिद्धिदात्री देवीचं…
    ब्रम्हा, विष्णु, महेश या त्रिदेवांची निर्मिती सिद्धिदात्री देवीने केली. या तिघांनी तपश्चर्या केली. तेव्हा प्रसन्न होऊन दुर्गा देवीने त्यांना दर्शन दिलं ते सिद्धिदात्री रुपात...
    ही देवी आपल्याला सिद्धी देते पण त्याचा वापर कसा करायचा हे गुरू शिकवतो. एखाद्या गोष्टीतलं तत्व जो उलगडून सांगतो आणि त्या सगळ्याकडे पाहण्याची सुंदर दृष्टी देतो तो गुरू.
    स्त्रिया जास्तीत जास्त वेळ स्वयंपाकघरात असतात, तिथे त्यांची आई, सासू , तर कधी अगदी कामवाली बाई सुद्धा या गुरूच्या भूमिकेत असतात. . केवळ आम्ही असं करत आलो आहोत म्हणून किंवा शास्त्र असतं ते, असं न म्हणता त्यातलं खरं शास्त्र, विज्ञान काय आहे हे जो सांगतो, तो त्यातला गुरू...
    गुरू प्रमाणेच सर्वसमावेशकता हे वैशिठ्य मोरपंखी रंगाचं… हिरव्या रंगामुळे सर्जनशीलता, तर निळ्या रंगाचं विशालपण ह्या दोन्ही गोष्टींचा त्यात छान संगम पाहायला मिळतो.
    मोरपंखी रंग म्हंटला की स्मृतिपटलावर मुरलीधर सुद्धा दिसू लागतो. खरंतर एक मोरपीस श्री कृष्णाच्या मुकुटात असतं पण या रंगाचं नातंच जुळून गेलं श्रीकृष्णाशी.. मोराच्या पिसाऱ्याचा रंग किती नेत्र सुखद असतो.
    ऐश्वर्य दाखवणारा हा रंग! एक घरंदाजपण, एक प्रकारचा ठेहेराव दाखवणारा हा रंग..! ती "गुरू" आणि ती "शिष्या" या नात्याला स्त्रीपणाचा जसा एक वेगळा आयाम आहे अगदी तसाचं..
    आजची देवी जशी सिद्धिदात्री तशीच गुरू ही असते …सिद्धिदात्री… अशा सर्व स्त्रियांच्या ठायी असणाऱ्या गुरुत्वाला मनापासून वंदन !
    नववं नातं : गुरू - शिष्या
    गुरू : सोनाली मंदार कर्णिक
    शिष्या : इरा रेले
    प्रियंका मंत्री
    अनुष्का फाटक
    संकल्पना / संयोजन :
    मेराक इव्हेंट्स
    मंजिरी हेटे, प्रसाद महाडकर, प्रिया साटेलकर
    लेखन : धनश्री लेले
    व्हॉईस ओव्हर : कुणाल रेगे
    डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
    छायाचित्र : योगेश रावराणे
    रंगभूषा : आसावरी गोखले ,पॅशन - अंधेरी, पूर्व
    दागिने : श्रीकांत बाबुराव हरचेकर ज्युवेलर्स ,विलेपार्ले -पुर्व
    डिझाईन : निर्मिती ग्राफिक्स
    फुलांची सजावट : श्याम पांडुरंग भगत,दादर
    रील डिझाईन : राजेंद्र कदम
    #NavlaiNavratrichi ....
    #MerakEvents
    #EventsByMerak #SmrutiGandhaMarathi
    #JeevanGaniEvents
    #NavratriSpecial #Navratri2023
    #Navratri #Marathi #MarathiStatus

Комментарии •