द अल्केमिस्ट बुक रिव्ह्यू | The Alchemist Book Review |
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- द अल्केमिस्ट ही मराठीमधील अनुवादित केलेली सुप्रसिद्ध अशी कादंबरी मराठी मनांवरती आज देखील अधिराज्य गाजवत आहे या कादंबरीमध्ये एका मेंढपाळाची कथा आहे स्पेनमधील त्याच्या जन्मभूमीपासून इजिप्तच्या वाळवंटापर्यंतचा त्याचा हा प्रवास आपल्या मनाचा तळ ढवळून काढतो खजिन्याच्या शोधात निघालेला हा तरुण त्याला भेटणारे विविध प्रकारचे लोक ,राजा किमयागार आणि मनाला मोहित करणारी स्त्री व या वाळवंटाशी त्याची असलेली आणि जोडली गेलेली नाळ या सर्व गोष्टींचा या कादंबरीमध्ये खूप सुंदर पद्धतीने भाष्य केलं आहे मानवतेच्या गाभ्याला स्पर्श करणारी ही कथा अतिशय प्रेरणादायी आहे, आत्मिक अनुभूती काय असते व आपल्या स्व अनुभवावरती माणूस हा बऱ्याच गोष्टी शिकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष करत पुढे जात आपलं स्वप्न आणि ध्येय साकार करतो अशी ही सुंदर कथा सर्वांनी एकदा तरी वाचावे आणि आपल्या स्वतःचा शोध घ्यावा हीच विनंती
विकास निकम