आनंदाचे गाणे
HTML-код
- Опубликовано: 2 янв 2025
- आनंदाचे गाणे
चला चला गाऊ चला आनंदाचे गाणे
आनंदाचे गाणे गाऊ आनंदाचे गाणे ||धृ||
फुलपाखरांचे पंख घेऊनी
उडू बागडू धुंद होऊनी
वाऱ्यासंगे नाचू चला छेडू या तराणे ||१||
फुलाफुलांचे रंग घेऊ या
झाडे जशी उंच तसे उंच होऊ या
हिरवे हिरवे रान सारे ,हिरवी हिरवी पाने ||२||
आभाळात काहीतरी नवे पाहू या
नवे नवे पाहताना नवे शोधू या
गीत नवे शब्द नवे गाऊ या नव्याने ||३||
आभाळात काहीतरी नवे पाहू या
नवे नवे पाहताना नवे शोधू या
गीत नवे शब्द नवे गाऊ या नव्याने ||४|