Abhalmaya | Celebrating 23 Years | Classics | Ep 05 |
HTML-код
- Опубликовано: 8 дек 2022
- #abhalmaya #zeemarathi #sukanyamone #manojjoshi #sanjaymone
या भागाविषयी :
'आभाळमाया' ही खाजगी उपग्रह वाहिनीवर सुरु झालेली पहिली मराठी दैनंदिन मालिका... चौकटीच्या बाहेर पडून एक वेगळी गोष्ट मांडू पाहणारे कथानक आणि त्याला श्रवणीय शीर्षक गीताची जोड इथपासून सुरु झालेला या मालिकेचा प्रवास थक्क करणारा आहे. याच बरोबरीने उत्तम दिग्दर्शन, कलाकारांचा उत्तम अभिनय ही सुद्धा या मालिकेची बलस्थानं म्हणायला हवीत. या मालिकेला प्रसारित होऊन नुकतीच २३ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने आम्ही या मालिकेतील मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांशी गप्पा मारल्या. गप्पांदरम्यान काही जुने प्रसंग आठवून कधी एकच हशा पिकला तर कधी जुन्या आठवणी काढताना अलगद पापण्यांच्या कडा ओलावल्या. या 'हार्ट टू हार्ट' गप्पांचा भाग आम्ही आपल्या भेटीस आणला आहे. हा भाग नक्की पाहा आणि आपला अभिप्राय comment box मध्ये नोंदवायला विसरू नका. हा भाग आवडला तर आपल्या लोकांसोबत नक्की शेअर करा.
सहभाग :
वैजयंती आपटे (निर्माती)
अच्युत वझे (कथा - निर्माता)
सुकन्या मोने (अभिनेत्री)
मुग्धा गोडबोले (अभिनेत्री)
संजय मोने (अभिनेता)
मनोज जोशी (अभिनेता)
सूत्रसंचालक : प्रसाद भारदे
संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे
प्रस्तुती सौजन्य : अवधूत अशोक हेंबाडे (क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.) @avadhuthembade8677
विशेष आभार : सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर
आर्ट आणि स्पेस स्टायलिंग : तन्वी पाटील
आर्ट असिस्टंट : रवींद्र साळवे
छायाचित्रण : चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, हिमांशू नारकर
कॅमेरा आणि साहित्य : एच. एस. मिडिया अँड फिल्मस
लाईट्स अँड ग्रिप्स : जे. ए. सिनेलाईट्स
रंगभूषा : प्रकाश जवळकर, ओमकार चंद
केशभूषा : सुप्रिया तांबे
संकलन : सुमंत वैद्य
पार्श्वगायन : नेहा सिन्हा
ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर : रेवती पोंक्षे
गॅफर : प्रवीण भुजबळ, नंदू खंदारे, सिताराम काटकर
बेस्ट बॉईज : अलीम, अफझल
लोकेशन अपकिप : निलेश, सुशील, विनोद
लोकेशन इनचार्ज : आमिर काप, प्रवीण भुजबळ
स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था : मुंबादेवी, लोअर परळ
प्रकाश उपहारगृह, दादर
फूड ऑल
मेनलॅन्ड चायना , पॅलेडियम, लोअर परळ
थिओब्रोमा
लोकेशन सौजन्य : क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि. (Qench Studioz Private Limited)
प्रस्तुती : द क्राफ्ट आणि क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.
___________________________________
खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
१. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 1...
२. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Clas...
३. जुळून येती रेशीमगाठी (भाग १) - • Julun Yeti Reshimgathi...
४. प्रपंच - • Prapanch | Celebrating...
५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari |...
६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipr...
७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Tribut...
८. वादळवाट - • Vadalvaat | Celebratin...
९. अवंतिका (भाग १) - • Avantika | Celebrating...
१०. अग्निहोत्र - • Agnihotra | Celebratin...
___________________________________________________
आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२
सूचना :
आभाळमाया या मालिकेच्या शीर्षक गीताचे सर्व हक्क झी मराठी वाहिनीकडे अबाधित आहेत.
गीत : आभाळमाया (झी मराठी)
मूळ संगीतकार : अशोक पत्की
मूळ गीतकार : मंगेश कुळकर्णी
मूळ पार्श्वगायन : देवकी पंडित
Reprise version गायन : नेहा सिन्हा
#zeemarathiserial #oldisgold #mugdhagodbole #vinayapte #mandardevasthali #achyutvaze #vaijayantiapte #umeshkamat #ankushchaudhari #harshadakhanvilkar #sanjayjadhav #priyabapat #swarangimarathe #samiragujar #paritelang #akanksha #anushka #chngi #sudhajoshi #sharadjoshi #mumbai #pune #nashik #ashokpatki #devakipandit #mangeshkulkarni #abhalmayatitlesong #titlesong #abhalmaya #aabhalmay - Развлечения
आभाळमाया मालिकेतील कलाकारांशी मारलेल्या गप्पांचा हा भाग सर्व प्रेक्षकांना आवडला असेल अशी आम्ही आशा करतो. आपल्या प्रतिक्रीया comment box मध्ये लिहायला विसरू नका.
दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या कलाकारांना बोलवा.
Pn ajun baki kalakar असते tr ajun majja आली asti
तुमच्या सुचनेचा आम्ही नक्कीच विचार करू MRP!
अधिकाधिक कलाकार आणि तंत्रज्ञांना या गप्पांमध्ये सामिल करण्याचा आमचा प्रयत्न असतो. मात्र एका मर्यादेपलीकडे आम्ही अधिक लोकांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला तर कोणालाच आपले अनुभव योग्य न्याय देत मांडता येणार नाहीत असा विचार त्यामागे आहे अनुराधा थोरात जी ....
'वादळवाट' मालिकेच्या कलाकारांना ही बोलवा ना plzzz... बघायच आहे त्या सर्वाना आणि ऐकायचं आहे त्यांच्या कडून त्या मालिकेचे अनुभव 😍😍😘😘....
आभाळमाया, टिपरे काय सांगू डोळ्यात पाणी येतं. सुंदर दिवस सुंदर माणसं सुंदर जग होत. आता सगळं दूषित झालाय..😢
सगळंच सुंदर !!!!!
वा अप्रतिम सगळ्यांना बघून खूपच आनंद झाला ....इतक्या वर्षांनी सुध्दा सगळे खूप भारी आहेत ....आभाळमाया च शिर्षकगीत आज ही आमच्या कडे सकाळी रोज आम्ही ऐकतो रोज ना चुकता ....पूर्वीच्या मालिका आणि कलाकार अत्यंत दर्जेदार होते ....आता मात्र ते सगळं नाही ...दर्जाहीन कार्यक्रम इतके झालेत की अस वाटत चॅनेल ला हे सगळं कसं नाही कळत .. त्याच त्याच कथा आणि तेच तेच बाष्कळ विनोद आणि त्यावर खोटं आणि जोरजोरात नाटकी हसण वीट आला आहे या सगळ्याचा प्रेक्षक म्हणून.....बंद करा कोणितरी हे सगळं
राधिकाजी, आपल्या खऱ्या भावना आमच्यापर्यंत पोचवलात त्याबद्दल धन्यवाद ! येत्या शनिवारी सकाळी 10 वाजता नव्या एपिसोडसह भेटूया The Kcraft च्या RUclips चॅनेलवर...
बरं झाल.. कुणीतरी हे लक्ष्यात आणुन दिल की सिंदुर मराठी प्रथा नाही..
'अगदी मनातलं' तुम्ही अगदी आमच्या मनातली प्रतिक्रीया नोंदवलीत. धन्यवाद !!!
पुरुषांनी लावा की
मराठी प्रथा नसली तरी "हिंदू धर्माची" प्रथा आहे, आणि हिंदू म्हणून जगा तरचं आपला धर्म वाचेल! मूर्ख कुठले, जय श्रीराम 📿
कृपया द क्राफ्टचा हा प्लॅटफॉर्म धर्म, जात - पात , राजकारण याच्यातून होणाऱ्या चिखलफेकीपासून कृपया लांब ठेवावा ही सर्वांना विनंती.
अगदी बरोबर
Sanjay Mone deserves a podcast of his own
Parag ji, true…. His sense of humour and command over the language is commendable. We agree with you.
@@thekcraft sanjay mone siramule mehephilila char chand lagtat..love his sense of humour.
Indeed Archana ji!! We all love him!
अप्रतिम झाला कार्यक्रम. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला . फक्त एक दुरुस्ती करावीशी वाटते. मराठीतली पहिली दैनंदिन मालिका आभाळमाया नसून दामिनी होती जी 1997 साली आली. आभाळमाया 1999 साली आली. आभाळमाया ही खाजगी मराठी वाहिनीवरील पहिली दैनंदिन मालिका होती.
आपले निरीक्षण योग्य आहे. मात्र गप्पांमध्ये असा उल्लेख केला आहे की, आभाळमाया ही खाजगी वाहिनीवरील पहिली दैनंदिन मालिका होती. असो, प्रशांतजी.... तुम्हाला हा भाग आवडला असेल अशी आशा करतो.
🎉बरोबर आहे, दामिनी दररोज संध्याकाळी ४.३० ला प्रसारित होत असे🎉
खरंय....
अतिशय सुरेख गप्पा.... ऐकताना सुद्धा डोळ्यात पाणी आले....सर्व एपिसोड डोळ्या समोर येत होते... टायटल साँग उत्कृष्ट..... सर्वच कलाकार उत्कृष्ट
मनीषाजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्धल मनापासून आभार ! गेल्या दिड महिन्यात आम्ही प्रसारित केलेले एपिसोड्स ही तुम्ही चॅनेलवर पाहू शकता. नक्की पाहा आणि अभिप्राय कळवा. चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.
🌅🙏🌹आभाळमाया या दर्जेदार मालिकेच्या झकास गप्पांची मेजवानी...आजच्या तरुण पिढीला एवढं चांगलं मराठी ऐकायला मिळतयं त्यासाठी क्लासिक क्राफ्टचे मनापासून आभार ....
कल्पनाजी, आपली ही शब्दरूपी कौतुकाची थाप आम्हाला उत्तम काम करण्यासाठी प्रेरणा देत राहील. धन्यवाद ! आमचे इतर ही भाग पाहून त्यावर नक्की प्रतिक्रीया द्याल.
तुम्हास सर्व कलाकारांना भेटून,ऐकून खूप समाधान वाटलं.
आभाळमाया सिरीयल म्हणजे Gem of the serials !❤
शीर्षकगीत सुरू झालं कि माझे डोळे अजूनही झरू लागतात.माझा मोठा मुलगा त्यावेळी इंजिनियर होऊन टेल्कोत Indica वर काम करायचा. दुपारी२ वाजता शीर्षकगीत सुरू झालं कि मी बस साठी जाणाऱ्या मुलाला बाल्कनीतून हात करत पहात असायची.६ महिन्यांनी तो परदेशी शिकायला गेला. पण या प्रसंगाने व शीर्षकगीताने आम्ही कायमचे जोडले गेलो. आजही हे शीर्षकगीत ऐकले कि हे सर्व प्रसंग आठवून डोळ्यात पाणी आले नाही असे कधीच होत नाही.
सुलभाजी...आपली आठवण वाचून आम्हाला ही भावुक व्हायला झाले आहे.
We cannot forget this serial, we consider it as part of life. We have watch all episodes n no of times. Vinay APTE GREAT PERSONALITY OF MANY SERIALS AND FAVOURITE OF ALL MARATHI STARS.
Thank you Ranjeet ji…! Keep watching this space for more such interesting conversations….Stay tuned!!!!
अतिशय स्तुत्य उपक्रम...आणि कार्यक्रम तर उत्तमच झाला....खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी.
अमोलजी, आपल्याला हा भाग आवडला हे वाचून खूप आनंद वाटला. आमचे मागील महिन्याभरातील एपिसोड्स ही पाहा आणि त्याबद्दलचा ही अभिप्राय नक्की द्या. पुन्हा एकदा धन्यवाद !!!
आठवणीतली serial 😍😍😘😘.... आभाळमाया 😘😘👌🏻👌🏻.... Memories get back 😊😊😊👌🏻👌🏻😘😘
पल्लवीजी...अगदी खरंय.....
आमचे इतरही एपिसोड्स तुम्ही पाहिले असतील अशी आम्ही आशा करतो.
या सुंदर मुलाखतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा ती मालिका मनचक्क्षु समोर तरळून गेली🤗
सुधाजी, या गप्पांच्या निमित्ताने सर्व आठवणी तुमच्या डोळ्यासमोरून तरळून गेल्या हे वाचून आनंद वाटला.
Kharach, ahe
खूपच सुंदर कार्यक्रम.. आपले मनःपूर्वक धन्यवाद
तेजस, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून धन्यवाद !!! नवे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.
Unttam program... ya program sathi gaylele gane .. atishay sundar... surel... sankalpana Mast... waiting for more
वर्षाजी, आपल्या शब्दातून आपण आमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलीत असेच आम्हाला वाटत आहे. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. अधिकाधिक लोकांबरोबर या आणि इतर एपिसोड्सची लिंक नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या शनिवारी नव्या एपिसोडसह....
khup chhan episode with Abhalmaya team
शितलजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद !!!
Khooopp chan shabda aapure aahet 👌👌👍
पूर्णिमाजी, कौतुकाबद्दल आभार !!!!
शीर्षक गीत ऐकून सुद्धा डोळ्यातून चटकन पाणी येते..... खुप आठवणी आहेत
Nostalgia !!!
अतिशय आवडती सिरियल...thanks
शोभाजी, आपण आठवणीने हा एपिसोड पाहिलात आणि अभिप्राय दिलात त्याबद्दल आपले मनापासून आभार !!! आमचे इतरही एपिसोड्स The Kcraft च्या RUclips चॅनेलवर उपलब्ध आहेत. ते ही नक्की पाहा आणि त्यावर आपली प्रतिक्रीया नक्की द्या
माझ्या लहानपणी आम्ही ही मालिका सहकुटुंब बसून आवडीने बघायचो...आजही ह्या मालिकेचे शीर्षक गीत आमच्या हृदयात घट्ट आहे..
गायत्रीजी, आमच्याही हृदयात या मालिकेचे अढळ स्थान आहे. तुम्ही आमचे मागील काही एपिसोड पाहिले असतील अशी आशा करतो. त्याबद्दलचा आपला अभिप्राय जरूर नोंदवा.
सुंदर झाला हा भाग. बऱ्याच गोष्टी आठवल्या. कशी आठची ती वेळ गाठायची असायची. त्याआधी गृहपाठ संपवणे गरजेचे असायचे. तेव्हा शाळेत होते पण तो सुधा आणि शरद चा ५२ वा भाग अजून आठवतोय आणि कितीतरी दिवस तो भाग विसरता विसरत नव्हता. अजून एक भाग करता आला असता. आवडलं असतं ह्या सर्वांना अजून ऐकायला.
दिशाजी, तुम्हाला गप्पांचा हा भाग आवडला हे वाचून आनंद वाटला. आज सकाळी 10 वाजता आम्ही गप्पांचा आणखी एक एपिसोड घेऊन येत आहोत...एका नव्या मालिकेच्या टीमसोबत....टीम 'लोकमान्य'सोबत.... नक्की बघा !
Too good to see them ❤️
We at the kcraft, feel proud and honoured to welcome them all. Thanks Swarada for your kind words.
छान चर्चा झाली ,सर्वांनी आपआपली मनोगत दिलखुलासपणे व्यक्त केली
सुजाताजी, आपल्याला हा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला. आम्ही गेल्या एक महिन्यात प्रदर्शित केलेले इतरही भाग तुम्ही नक्की पाहा आणि आपली प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. या एपिसोडची लिंक अधिकाधिक लोकांबरोबर शेअर करा.
Ati Sundar ❤❤ kay shirshak gana aahe. ❤❤
सर्व प्रेक्षकांच्या मनात हे शीर्षक गीत कोरलं गेलं आहे.
Beautiful.. जुने serials far apratim असायच्या
निश्चितच....जुनं ते सोनं
Nice song, beautiful voice, good program arranged n experiences shared very beautifully 👌👌👌😍😍😍
Thank you Purva for your encouraging words. Keep watching our content and do subscribe our channel.
Thank you so much 🙏🏻
Khup khup chhaan.
प्रतिमाजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून धन्यवाद !!! चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमचे इतरही एपिसोड्स नक्की पाहा.
Very beautiful recreation of the original title song...congratulations to Neha & entire team...I couldn't believe it out that's a recreation...so perfect...great voice
Thank you Priya ji for your compliment !!!!
Eagerly waiting for प्रपंच team!!
21 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता आम्ही येतोय प्रपंच मालिकेचा 'क्लासिक्स' या सेगमेंटमधील नवा गप्पांचा एपिसोड घेऊन....
मस्तच! 👌🏼👌🏼👍🏼👍🏼👍🏼
धन्यवाद 🙏🏻
खूपच आवडला
शीलाजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून आभार !!!
Hya gappa khoop aawadalya. Aabhalmaya sarvanchya Dil me Kareeb aahe.
चित्राजी, आपल्याला हा भाग आवडला हे वाचून खूप आनंद वाटला. धन्यवाद !!
Khup sundar karykram hota juny athvani parat athvly
रोहितजी, कौतुकाबद्दल आभार !!!
खूप सुंदर मुलाखत..
कौतुकाबद्दल आभार !!!
Khup chaan khup divsani pahile pan ya prog che std kamal ahe
गीताजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार !!
Manoj sir je बोलले ते अगदी खरं आहे...
हेमाजी, होय... केवळ मनोजजीच नाही तर सगळेच जण अगदी मनापासून बोलत होते.
Enjoyed every word from this discussion. Thanks to all of you
Pradeep ji thank you for the compliment !!!
खूप छान रंगला हा भाग. किती आत्मीयतेने बोलले सगळे. या episode नंतर आभाळमाया चे भाग ५२ आणि ५३ बघणारे खूप जण असतील ज्यातली एक मी पण असेन . दामिनी , महाश्वेता या series पण classics मधे समाविष्ट करून घ्याव्यात
तन्मयीजी प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !!!
खूप छान. पुन्हा एकदा मालिका पहायला हवी. All the best.
धन्यवाद मंजुषाजी! आपल्याला हा भाग आवडला हे वाचून आनंद वाटला.
Abhlmaya serial khup chan hoti mala mast interivew ghetala khup chan vatle ❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद नयनाजी !!
Khap sunder Sanjay mane the best from Hyderabad
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!
Abhaal maya is an emotion🥰👍
For us too….
The episode was great ..hats off to the Kcraft team ...best wishes 💐💐
Hi Neha, your contribution as a playback singer plays an important role in our journey. We owe you for that.
उत्कृष्ट उपक्रम, छान वाटतं ह्या सगळ्या आवडत्या कलाकारांना बघून आणि ऐकून
स्वरदाजी, आपल्या कौतुकाने आम्ही भरून पावलो आहोत. गेल्या एक महिन्यात आम्ही असे अनेक एपिसोड्स या चॅनेलवरून प्रदर्शित केले आहेत. ते एपिसोड्ससुद्धा नक्की पाहा आणि त्यावरही आपला अभिप्राय नक्की द्या.
@@thekcraft हो नक्की पहाणार
👍🏼🙏🏻
खूप छान गप्पातून अभाळमाया पुंन्हा अनुभवली
अनघाजी, आपल्याला हा भाग आवडला हे वाचून आनंद वाटला. चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. भेटत राहू दर शनिवारी सकाळी 10 वाजता नव्या एपिसोडसह....
We were so..so..so... blessed to grow up watching such a rich content..
Pity and really worried about upcoming generation for the content they are getting to watch now a days
Anagha ji your thoughts are straight from your heart and we respect them. 🙏🏻
One of the best serials of all time
Agreed with you my BOY !!!
Abhalmay best episode 👌👏❤
Thank you Prutha ji !
Khup chan hoti malika.,..parat suru kara navyane
तुमच्यावतीने आम्ही वाहिनीला नक्की विनंती करू.
Masta...
प्रतिक्रीयेबद्दल मनापासून आभार !!!!
One of the most Talented & Beautiful Actors in the Industry, Feel Very Proud on Marathi Film Industry 🙏❤️❤️
We too Manish ji!
खूप छान आठवणी
हो, मराठी प्रेक्षकांच्या मनात हा एपिसोड पाहून नक्की आठवणी दाटून आल्या असतील.
सुंदर बांधलेली मुलाखत. जुन्या आठवणी चाळवल्या गेल्या. ऐकायला मजा आली धन्यवाद
संजयजी, आपल्याला हा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला. धन्यवाद
अतिशय सुंदर मालिका
निताजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!!
मनःपूर्वक धन्यवाद संजय जी याचं संपूर्ण श्रेय अमोघ पोंक्षे यांचं आहे, अत्यंत मेहनत घेऊन ते याची निर्मिती करत आहेत आणि विशेष म्हणजे आमची संपूर्ण टीम यांचा हातभार, आणि आपल्या सारख्या जाणत्या प्रेक्षकांचं भरभरून प्रेम, धन्यवाद पुन्हा एकदा.😊
खूप छान गप्पा रंगल्या.मालिका सुंदर होतीच .कलाकार भरभरून बोलले.मराठी कलाकारांबध्दल आदर आहे तो आणखी वाढला.
मनीषाजी, आपल्याला हा गप्पांचा एपिसोड आवडला हे वाचून खूप आनंद वाटला. आपले प्रेम असेच राहू दे. पुढच्या शनिवारी भेटूया सकाळी 10 वाजता एका नवीन एपिसोडसह...
Sanjay Mone ,down to earth and a very rare person .
Call him again.
अगदी खरंय ! माझिया प्रियाला प्रीत कळेना मालिकेच्या round table गप्पांच्या निमित्ताने आम्ही त्यांना आमंत्रित केले होते. तो भागही तुम्हाला RUclips वर आता पाहता येईल.
Awesome initiative and content by this channel. Made me so nostalgic.. alpha TV produced some of the best marathi teleseries in the early 2000s.. If feasible, can u please do a reunion of Shri Gangadhar tipre serial actors..
Hello Radhika, thank you for sharing your thoughts and complimenting our initiative. We are looking for your support in terms of sharing our content to the masses.
…And yes sharing a ‘Breaking News’ with you…. ‘Gangadhar Tipare’s ‘ round table chat will be happening soon!!!
Stay tuned….
श्वेतांबरा मालिकेनंतर मला आवडलेली खाजगी वाहिनीवरील पहिलीचसर्वोत्तम मालिका. मी १९९० ला १० वी ले होतो पण संध्याकाळी खाजगी ट्यूशन वरून आल्यावर हे शीर्षक गीत ऐकतच मी जेवायला बसायचो
'आभाळमाया'शी संबंधित तुमची आठवण वाचून खूप छान वाटलं. ज्यांनी ही मालिका पाहिली आहे त्यांच्या प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी या मालिकेशी जोडल्या गेलेल्या आहेत. या भागाची लिंक अधिकाधिक लोकांबरोबर नक्की शेअर कराल.
Favourite serial ❤
Yes. Indeed !
फारच छान एपिसोड 👌👌प्रतिमा कुलकर्णींच्या " झोका" मालिकेवर अशीच चर्चा बघायला आवडेल. त्या टीमची वाट बघतोय
आरतीजी, नक्की करू ! तुम्ही आभाळमायाप्रमाणेच प्रपंच मालिकेचा गप्पांचा एपिसोडही बघितला असेल अशी आम्ही आशा करतो.
खरंच अजून ही ती serial टेलिकास्ट व्हायला हवी
सुप्रियाजी, अनेक जण हीच इच्छा आजही व्यक्त करतात यातच मालिकेचे यश दडलेले आहे.
ऐका मराठी अवॉर्ड शो मध्येय आभाळमया चे जेव्हा शीर्षक गीत लागले होते तेव्हा सुकन्या ताई खुप रडल्या होत्या...
खरंच शीर्षक गीतमध्येय खुप च आपलेपणा वाटायचा....
अशोक जी पत्कीनी दिलेलं अजरामर संगीत आणि देवकी ताई पंडित यांचा सुरेख आवाज या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक होऊन एक छान गाण्याची निर्मिती झाली.
अगदी खरंय अभिजीतजी !!!!
Me ajunhi roj aabhalmaya che title song aikte.......my all time favourite serial
Sanjay ji, it’s great to hear that you still enjoy the title song of Abhalmaya. We hope you enjoyed this episode as well.
Nice memories
👍🏼🙏🏻
Ajunahi Aabhalmaya che gane aikle ki ashru anavar hotat. 🙏👏👏👏
वैशालीजी, आभाळमाया च्या शीर्षक गीताबद्दल आमच्या ह्याच भावना आहेत.
A woman like me that time I was a teenage girl. This serial has such a impact on me period. ❤
Great memory, indeed !
I was college student that time . My favorite serial.
@LeenaShirodkar ♥️
आभाळमायाचे सर्व एपिसोड आम्ही पाहिले होते .. खूप सुंदर मालिका ... आभाळमायाप़माणेच वादळवाट या मालिकेतील कलाकारांसोबत असा हार्ट टू हार्ट गप्पा कार्यक्रम व्हावा अशी अपेक्षा ....
कौतुकाबद्दल आभार ! वादळवाट मालिकेचा असा गप्पांचा एपिसोड आम्ही याआधीच प्रसारित केला आहे. त्याची लिंक येथे देत आहे. ruclips.net/video/4M_W1t2y63U/видео.html
मोने सर बरोबर बोलले या सिरीयल चे लेखन डायलॉग्स खूप brilliant ली लिहिले आहेत.
अगदी खरंय !!!!
Khup sundar episode…👌🏼
‘Prapancha’ cha hi ek episode karava hi vinanti 🙏🏼
शाची, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून आभार !! आपल्या विनंतीचा आम्ही नक्की सकारात्मकपणे विचार करू
मला वाटते प्रपंच ही झी मराठी वरील सर्वोत्तम मालिका होती
आम्ही प्रपंच मालिकेचा असाच गप्पांचा एपिसोड केलेला आहे. त्याची लिंक खाली देत आहे.
ruclips.net/video/09WVbZof57M/видео.html
खुप आवडती सिरयल अजून हे गाण खूप वेळेस ऐकतो परत सिरयल सुरू करा खूप आवडीने बघतील
धन्यवाद प्रतिक्रीया दिल्याबद्दल
Khup sundar yasarkhi serial punha hone nahi
संज्योतजी, अगदी खरंय....
Achyut Vaze hyana mi tyanchi mulgi Chef Chinu Vaze chya videos madhe baghitla aahe.. Te Abhalmaya shi sambandhit aahet atta kalala😊
किती छान !
Started with the serial this week. 🙌🏽
Wow ! Great Tanmay !!!
Very well executed interview, questions were very well planned and must admire the anchor who gave necessary space to the guests to express themselves, looking for more such content from this channel. All the best.
Thank you so much for the compliment.
Thank you so much for your wonderful compliment.
आभाळमाया..... सुंदर स्वप्न च जणू
अगदी खरंय धनंजयजी...सोनेरी दिवस होते ते....
👍👍👍 khup sundar.
Please celebrate serials like ek lagnachi dusri,teesri gosht & many such REAL good serials too... even on SAB TV , serial “mrs Tendulkar” was one such ..if u can get them together
Rajeshwari, thank you so much for the compliment. We are working on your suggestions.
विनय आपटे म्हणजे खरी आवाजाची कार्यशाळा !
हे खरंय !!!!
विनय आपटे सर ग्रेट माणूस होते
Indeed !!!!
सुंदर serial..सर्व कलाकारांना पाहून फार छान वाटले, बाकीचे कलाकार सुद्धा आले तर आवडेल..
तुम्हाला गप्पांचा हा भाग आवडला हे वाचून आनंद वाटला. जुन्या मालिकांच्या कलाकारांसोबत असे अनेक भाग आम्ही चित्रित केले आहेत. ते ही नक्की बघा. अधिकाधिक कलाकारांना बोलवायचा आम्ही प्रयत्न करत असतो पण वेळ, जागा यांची मर्यादा तसेच कलाकारांची उपलब्धता अशा अनेक मुद्यांचा आम्हाला विचार करावा लागतो. तुम्ही समजून घ्याल अशी आम्ही आशा आहे.
तुम्हाला गप्पांचा हा भाग आवडला हे वाचून आनंद वाटला. जुन्या मालिकांच्या कलाकारांसोबत असे अनेक भाग आम्ही चित्रित केले आहेत. ते ही नक्की बघा. अधिकाधिक कलाकारांना बोलवायचा आम्ही प्रयत्न करत असतो पण वेळ, जागा यांची मर्यादा तसेच कलाकारांची उपलब्धता अशा अनेक मुद्यांचा आम्हाला विचार करावा लागतो. तुम्ही समजून घ्याल अशी आम्ही आशा आहे.
Sundar karykram junya aathvani jagya jhaalya
वृषालीजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून आभार !! आपण आमचे मागील एक महिन्यातील इतर एपिसोड्स सुद्धा पाहिले असतील अशी आम्ही आशा करतो.
🙏👌
🙏🏻
Title song is my most favourite song till this day
Ours favourite too !!!!
🙏👏👏👏👏👏👏👏
👍🏼🙏🏻
Khup chan zala bhag, chingi hi mazya shalet hoti😂😂
Aamhi teva vargat aabhalmaya che title song gaycho favalya velet kiva koni singer asel tr tila avrjun bai sangychya ga mhanun, mala far kahi athvat nahi hya malike baddel karan teva me khup lahan hote pan itke lahan asun hi samjat hote ki khup craze aahe hya malike chi, bhasha agadi sunder sudda marathi ji aaj kal kontyach malike madhye nahi bolli jaat, even hya gappan madhye pan kiti chan bolat aahet sagale, sanjay mone khul majeshir ahe chan boltat
Te 'Shivaji' nahiye 'Chatrapati Shivaji Maharaj' aahet😊
मृदुलाजी, किती सुंदर आठवण सांगितलीत. खूप छान वाटलं.
विनय आपटे.. whatta legend he was ❤️🙏🏻
True! We hope you liked this episode. Go and check out our other episodes as well.
संजय मोने म्हणाले ते अगदी पटलं लेखन खूप महत्वाचं असतं...आणि ते पण एक लेखिका बाजूला बसलेली असताना...आणि त्यांनी ते पण स्पष्ट केलं की त्या वेळी हल्ली जशी चॅनेलची ढवळाढवळ असते तशी नव्हती
अनेक जण याविषयी तक्रार करतायत हे खरंय !!!
छान सिरीयल
वीणाजी, तुम्हाला गप्पांचा भागही आवडला असेल अशी आशा करतो.
पार्श्वगायन कमाल👌👌
कौतुकाबद्दल आभार !!!
It used to be a part of our childhood...pure love was the title track..❤❤❤
We hope you liked this candid chat episode as well.
🙏🙏🙏
आम्ही अशाच अनेक जुन्या मराठी मालिका आणि चित्रपटांची #roundtables केली आहेत. ती सुद्धा नक्की पाहा.
@@thekcraft
हो. नुकताच 'टिपरे'च्या कलाकारांबरोबरचा कार्यक्रम पाहिला. छान वाटले.
👍🙏
Khup chan episode. Please जुळून येती रेशीमगाठी team la bolva.
करिष्मा, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून धन्यवाद !!!! जुळून येती रेशीमगाठी मालिकेच्या कलाकारांच्या आणि तंत्रज्ञांच्या तारखा घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
खर तर आताही ही मालिका hit होऊ शकते. परत सुरु karana pl.
प्रभातजी, अगदी खरंय !!!
When I was learning to write Marathi, i wrote this song's lyrics first.
What a cute memory you shared !
V true it's popularity fame n following was unparallel
💯
Manoj joshi far sundar disayche, very very handsome
दिसायचे? अजूनही दिसतात,नाही का? कसा वाटला हा गप्पांचा एपिसोड?आमचे इतरही असेच गप्पांचे एपिसोड चॅनलवर जाऊन नक्की पाहा !!!!
Aaj hi मराठीतील एक् number chi serial ashi serial va asetitle song परत् honar naai va kalakaron pn adbhut maaji savrath aavadti मालिका
स्वातीजी, खरंय....ही सर्वांचीच all time favourite मालिका आहे.
Khup chan.. kharch 8 wajata gharagharatun awaj yaycha especially jevha amhi gavala jaycho tevha amchi purn family basun hi serial baghaycho ani tevha kharch gharagharatun awaj yayche te sagal aaj athavala... khup chan feeling ahe hi
आभाळमाया मालिकेच्या या गप्पांच्या एपिसोडच्या निमित्ताने आपल्या आठवणी ताज्या झाल्या हे वाचून आम्हाला खूप आनंद झाला आहे. भेटूया येत्या शनिवारी सकाळी 10 वाजता, एका नव्या एपिसोडसह
Jo bhi host hai, unko bohot wishes, ekdum seedha genuine aur organic hosting karte ho aap. kya aapka naam hume samjhega? very nice.
Sushil ji, anchor's name is Prasad Bharde.
Thank you so much for your valuable comment will surely keep the momentum 😊
Junya malika parat lava saglya aathvani aahet aabhari rahu aamhi
यासाठी वाहिनीला विनंती करावी लागेल.
शरद जोशि काका ईज रा ईठ आपल्यात कपालाचि सुरुवात होते तिथे कुकु डोक्यावर सिदुर नव्हे व आभुषणाच आवडबर नाहि बोजा नाहि टोचल कमिग ट्रन्सफर हिन्दी 💯 💶 % I LOVE ❤️ AND LAIK ❤️ ♥️ YOU शरद काका
विलासजी, प्रतिक्रियेबद्दल आभार !!!
खरोखरच अतिशय सुंदर अशी कलाकृती तुम्हा सर्वांमुळे पाहायला मिळाली. शीर्षकगीत तर आजही तेवढेच ताजेतवाने वाटते...❤❤ सगळ्यांचे मनापासून आभार..
🙏🙏🙏
आपण मनापासून प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आभार !
आभाळमाया आणि वादळवाट नेहमीच आवडीच्या आणि आम्ही या सर्व परिवार मिळून रात्री बघायचं लहानपणीच्या आठवणी आहेत त्या पण आता त्या आठवणीत एक आठवण म्हणजे म्हणजे आमची आई या जगात नाही कितना तर खूपच आवडायच्या
खूप भावूक प्रतिक्रिया दिलीत तुम्ही !!