Shivjyot daud 2024 || शिवज्योत दौड़ || Gopalgad to aagarwadi @Varveli @guhagar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • जय शिवराय,
    आजचा विडिओ हा पूर्ण पणे शिवज्योत आपण कशी आणतो त्याला लागणारी मेहनत या बद्दल आहे तर चला मग पाहू शिवज्योत दौड गोपाळगड ते वरवेली आगरवाडी.
    रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामधील एक किल्ला. तो वसिष्ठी नदीच्या दक्षिण तीरावरील भूशिरावर वसलेला असून दोन भागांत विभागलेला आहे. खाडीजवळील पडकोट व भूशिरावरील बालेकिल्ला. अंजनवेल गावातून सड्यावर गेल्यावर उत्तरेकडे समुद्राच्या भूशिरावर अंजनवेल उर्फ गोपाळगडची दक्षिणेकडील भक्कम तटबंदी व बुरूज दिसतात. गडाचा फारच थोडा भाग हा आदिलशाहीत बांधला गेला. इ. स. १६६० पर्यंत किल्ला विजापूरकरांकडेच होता. छ. शिवाजी महाराजांनी कोकण मोहिमेमध्ये अंजनवेल घेतला असावा. पुढे छ. संभाजी महाराजांनी किल्ल्याची दुरुस्ती करून घेतली. छ. संभाजी महाराजांनंतर किल्ला १६९९ मध्ये सिद्दी खर्यातखान या हबशाकडे गेला. १७०८ मधे सिद्दी सुरूरखान याने पडकोट बांधला. पडकोटातील शिलालेखावरून ही माहिती मिळते. १७३३ च्या ऑगस्ट महिन्यात पेशवे व आंग्रे यांनी एकत्र येऊन गोवळकोट व गोपाळगड घेण्याचा मनसुबा आखला होता. परंतु १० एप्रिल १७३४ रोजी पेशव्यांचा अधिकारी जिवाजी चिटणीस अंजनवेलला आला. त्या वेळी गोपाळगड घेण्याची तयारी चालू होती. २० जानेवारी १७४५ रोजी छ. शाहू महाराजांनी इंग्रजांना पत्र पाठविले की, तुळाजी आंग्रे यांना अंजनवेल घेण्यासाठी मदत करावी. या पत्रानंतर २३ जानेवारी १७५५ रोजी तुळाजी आंग्रे यांनी अंजनवेलचा किल्ला सिद्दी याकूतखान याच्याकडून रात्री जिंकून घेतला व त्याचे नाव गोपाळगड ठेवले. १७५५ मध्ये गोपाळगड तुळाजी आंग्रेंकडून पेशव्यांकडे आला. पण परत तो आंग्र्यांनी जिंकून घेतला. अखेर पेशव्यांचे सेनापती रामाजी महादेव यांनी आंग्र्यांकडून २४ जानेवारी १७५६ रोजी गोपाळगड जिंकून घेतला.

Комментарии • 3

  • @vijayramane577
    @vijayramane577 4 месяца назад +1

    ताठ होतील माना, उंच होतील नजरा…🤩
    या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा.. 🚩शिवजयंतीच्या शुभेच्छा! 🚩🚩🚩🚩

  • @nikhilramchandra1491
    @nikhilramchandra1491 4 месяца назад +1

    जय शिवराय

  • @Agaresahil7
    @Agaresahil7 4 месяца назад +1

    🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 😍✨️🙏🚩🚩