घनदाट अभयारण्यात असलेला | किल्ले वासोटा | Vasota Fort | Jungle Trek | Vasota Fort History In Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024
  • घनदाट अभयारण्यात असलेला | किल्ले वासोटा | Vasota Fort | Jungle Trek | Vasota Fort History In Marathi
    जंगल ट्रेक आणि निसर्गाच्या कुशीत एक दिवस घालवायचा असेल तर नक्की इथे भेट द्या..
    जाण्याचा मार्ग - गुगल मॅप वर सहज भेटतो
    सातारा - कास - बामणोली (मुक्काम )-बोटीतून वासोटा किल्ला
    आम्ही जे राहिलो ते ठिकाण -
    यशवंत हॉटेल
    शेम्बडी मठ बामणोली मध्ये आल्यावर शेम्बडी गावाकडे जाण्याच्या वाटेवर आहे ..राहण्याची खाण्याची शिवाय गड दर्शन करून देखील देतात..
    राहाण्याची सोय :
    वासोटा - नागेश्वर ही दोनही ठिकाणे कोयना अभयरण्यात असल्यामुळे रात्री राहाण्यास परवानगी नाही. तरी आणिबाणीच्या वेळेला खालील ठिकाणी मुक्काम करता येईल.
    १) वासोट्यावरील महादेवाच्या मंदिरात २ ते ३ जणांची राहण्याची सोय होते.
    २) वासोट्यावर जोड टाक्यांच्या शेजारील पठारावरही राहता येते.
    ३) नागेश्वराची गुहा ही राहण्यासाठी उत्तम जागा आहे. येथे २० ते २५ जण आरामात राहू शकतात.
    जेवणाची सोय :
    जेवणाची सोय आपण स्वत: च करावी. अभयारण्य क्षेत्र असल्याने आग पेटवण्यास परवानगी नाही.
    पाण्याची सोय :
    वासोट्या वरील जोड टाक्यातील पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे.
    वासोट्याहून नागेश्वराच्या गुहेकडे जातांना, गुहेच्या अलिकडे (जिथे चोरवण्याहून येणारी वाट मिळते तेथे) उजवीकडून जंगलात जाणारी वाट नागेश्वर कुंडापाशी घेऊन जाते. या कुंडात वर्षभर पाणी असते.
    जाण्यासाठी लागणारा वेळ :
    मेट इंदवली मार्गे २ ते २.३० तास लागतात. कुसापूर मार्गे ४ तास लागतात , चोरवणे मार्गे ७ तास लागतात.
    सूचना :
    १) बामणोली येथून मेट इंदवलीला जाण्यासाठी बोटी मिळतात. एका बोटीत १२ माणसे घेतात. १ माणुस असो की १२ माणस असोत, एका बोटीचा दर रुपये 3700/- (2021 साली) आहे.
    २) बामणोली - मेट इंदवली - वासोटा - नागेश्वर - मेट इंदवली हा ट्रेक करणार असल्यास सूर्य मावळण्यापूर्वी बामणोलीला पोहोचणे आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी. सूर्य मावळल्या नंतर पोहोचल्यास बामणोली येथे वनखात्याकडून कारवाई केली जाते. (पंचनामा केला जातो व माणशी रुपये १००/- दंड आकारला जातो.) तसेच अंधार पडल्यावर बोट चालवणारे अडवणूक करतात त्यांनाही जास्तीचे पैसे द्यावे लागतात.
    ३) वासोटा - नागेश्वर परीसर कोयना अभयारण्यात गेल्यामुळे तेथे राहाण्याची परवानगी नाही.
    ४) चिपळूणहून चोरवणे मार्गे नागेश्वर - वासोट्याला जाताना वाटेत पाण्याची कुठेही सोय नाही, तेव्हा पाण्याचा पुरेसा साठा जवळ बाळगणे आवश्यक आहे.
    ५) वासोट्याला पावसाळ्यात जळवांचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो, तेव्हा आवश्यक ती काळजी घ्यावी.

Комментарии • 22

  • @Maulitraderskarad
    @Maulitraderskarad 2 года назад +1

    खूप छान व्हिडिओ झाला आहे. संकेत ने चांगली माहिती दिली. सह्याद्री किती अभेद्य आहे हे व्हिडिओ मध्ये समजते. आप्पा न चा अनुभव खूप म्हणजे खूच च दांडगा आहे. सोबत चे सहकारी नशीबवान म्हणावे लागतील आप्पा न च्या सोबत इतका छान प्रवास करायला मिळाला आणि इतिहास समजून घ्यायला मिळाला.

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  2 года назад

      👏👏👏 🚩🚩🚩🚩 जय शिवराय

  • @shashikantkalolikar1129
    @shashikantkalolikar1129 2 года назад

    निसर्गाने परिपूर्ण, अद्भूत, रोमांचक असा व्लाॅग....👌🏻

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  2 года назад

      खूप खूप आभारी आहे ...🙏🙏🙏🚩

  • @gajananbhokare5498
    @gajananbhokare5498 2 года назад

    Khup chan

  • @hydraulicpart7409
    @hydraulicpart7409 2 года назад

    खूप छान माहिती

  • @kirankamble7175
    @kirankamble7175 2 года назад

    Zakkas bhai

  • @sachin_gadekar_5
    @sachin_gadekar_5 2 года назад

    Nicely explored Ritesh ❤️

  • @poonamshinde2609
    @poonamshinde2609 2 года назад

    असं अविस्मरणीय किल्लेही या व्हिडिओ द् वारे पाहता येतात. खुप मस्त वाटलं असं वाटतंय एकदा तरी भेट नकी दिली पाहिजेल ..... 👍👌☺️

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  2 года назад

      Hoy khup bhari ahe.. ..family sathi pn 1 number ahe.. Kadhi janyacha planing zal tr sanga..

  • @anandpawaradp4469
    @anandpawaradp4469 2 года назад

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад

    Apratim. Nisarg. Soundarya

  • @swapnilkumbhar712
    @swapnilkumbhar712 2 года назад

    Mast re ritesh bhiyya 🤗

  • @nilsuryavanshi2897
    @nilsuryavanshi2897 2 года назад

    खूप छान आहे रितेश आम्हाला पण सांगा कधी ही आम्ही पण येऊ.....

    • @RiteshTravelVlogs
      @RiteshTravelVlogs  2 года назад

      होय नक्की.. पुढच्या वेळी जाऊ 🚩🚩