दीड तासात १५ पदार्थ ? नैवेद्याच्या स्वयंपाकाचे मॅनेजमेंट, भरपूर टिप्स सह । Time management with tips

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • नैवेद्यासाठी संपूर्ण स्वयंपाक करायचा असेल, तर गोंधळ होतोच. कमी वेळेत भरपूर पदार्थ करायचे असतात, त्यामुळे वेळेचे मॅनेजमेंट हे करावेच लागते.
    असाच नैवेद्याचा संपूर्ण स्वयंपाक कसा करायचा आणि तो करताना वेळेचे मॅनेजमेंट कसे करावे, हे ह्या व्हिडिओ मध्ये दाखवले आहे. शिवाय नेहमीप्रमाणे, भरपूर टिप्स सुद्धा ह्या व्हिडिओ मध्ये दिलेल्या आहे.
    असा हा नैवेद्याचा स्वयंपाक तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
    धन्यवाद.
    Ingredients:-
    शेवयाची खीर / Vemicelli kheer:-
    - Ghee (तूप) :- 1 tbsp
    - Vermicelli (शेवया)
    - Milk (दूध)
    - Sugar (साखर) :- 1 tsp
    - Cardamom powder (वेलदोडा पूड)
    साधं वरण / Normal daal:-
    - Asafoetida (हिंगं) :- Quarter tsp
    - Turmeric powder (हळद)
    - Salt (मीठ) :- As per taste
    - Sugar (साखर) :- As per taste
    - Cooked toor daal (शिजवलेली तूर डाळ)
    पालकाची भाजी / Spinach sabji:-
    - Oil (तेल)
    - Mustard seeds (मोहरी)
    - Asafoetida (हिंगं)
    - Turmeric powder (हळद)
    - Chopped chilli (चिरलेली मिरची)
    - Soaked chickpea & peanuts (भिजवलेले हरभरे आणि शेंगदाणे)
    - Washed & chopped spinach leaves
    - (धुतलेला आणि चिरलेला पालक)
    - Water (पाणी) :- 1-1.5 katori
    - Salt (मीठ) :- As per taste
    - Tamarind extract (चिंचेचं पाणी) :- 2 tsp
    - Red chilli powder (तिखट)
    - Cumin seeds (जिरे)
    - Jaggery (गूळ) :- As per taste
    पंचामृत / Panchamrut:-
    - Oil (तेल) :- 1-1.5 tsp
    - Mustard seeds (मोहरी)
    - Chopped chillis (चिरलेली मिरची)
    - Curry leaves (कडीपत्ता)
    - Fenugreek seeds (मेथीचे दाणे) :- Half tsp
    - Turmeric powder (हळद)
    - Asafoetida (हिंगं)
    - Chilli powder (तिखट) :- 1 tsp
    - Water (पाणी) :- 3/4 katori
    - Soaked coconut slices & peanuts (भिजवलेले खोबर्‍याचे काप आणि शेंगदाणे)
    - Coriander seeds powder (धणेपूड) :- Half tsp
    - Cumin seeds powder (जिरेपूड) :- Quarter tsp
    - Tamarind extract (चिंचेचं पाणी) :- Half katori
    - Crushed peanuts (दाण्याचा कूट) :- 1 tsp
    - Crushed Sesame seeds (तिळाचा कूट) :- 1 tsp
    - Jaggery (गूळ) :- 1-1.5 tsp
    बटाट्याची भाजी / Potato Sabji:-
    - Oil (तेल)
    - Mustard seeds (मोहरी)
    - Cumin seeds (जिरे)
    - Curry leaves (कडीपत्ता)
    - Chopped chillis (चिरलेल्या मिरच्या)
    - Coriander leaves (कोथिंबीर)
    - Asafoetida (हिंगं)
    - Grated ginger (किसलेलं आलं) :- Quarter tsp
    - Turmeric powder (हळद)
    - Salt (मीठ) :- As per taste
    - Sugar (साखर) :- As per taste
    - Cooked potatos (उकडलेले बटाटे) :- 4
    कोथिंबीरीची चटणी / Coriander leaves chutney:-
    - Coriander leaves (कोथिंबीर) :- 1 katori
    - Chilies (मिरच्या) :- 6-7
    - Fresh grated coconut (किसलेलं खोबरं) :- 2 tbsp
    - Lemon & Ginger (लिंबू आणि आलं)
    - Salt & sugar (मीठ आणि साखर) :- As per taste
    - Cumin seeds (जिरे)
    - Lemon juice (लिंबाचा रस)
    आळू वडी / Aaloo vadi:-
    - Besan (बेसन) :- 2 katori
    - Salt (मीठ) :- As per taste
    - Coriander leaves (कोथिंबीर)
    - Tamarind extract (चिंचेचं पाणी)
    - Turmeric powder (हळद)
    - Chilli powder (तिखट) :- 2 tsp
    - Cumin seeds (जिरे)
    - Jaggery powder (गूळ) :- 2 tsp
    - Asafoetida (हिंगं)
    - Water (पाणी)
    - Oil (तेल) :- 1 tsp
    - Sesame seeds (तीळ)
    कटाची आमटी / Katachi aamti:-
    - Oil (तेल)
    - Dry sliced coconut (सुक्या खोबर्‍याचे काप)
    - Cinnamon powder (दालचीनी पूड)
    - Cloves (लवंगा) :- 4-5
    - Cardamom powder (वेलदोडा पूड)
    - Oil (तेल) :- 1 tsp
    - Mustard seeds (मोहरी)
    - Asafoetida (हिंगं)
    - Curry leaves (कडीपत्ता)
    - Turmeric powder (हळद)
    - Red chilli powder (तिखट)
    - Tamarind extract (चिंचेचं पाणी)
    - Kat & Pooran (कट आणि पूरण)
    - Salt (मीठ) :- As per taste
    - Prepared masala (तयार केलेला मसाला) :- 2 tsp
    - Jaggery (गूळ)
    पूरण / Pooran:-
    - Jaggery (गूळ)
    - Chickpea daal (हरभर्‍याची डाळ)
    घोसावळ्याची भजी / Sponge gourd Bhaji:-
    - Oil (तेल)
    - Slices of Sponge gourd (घोसावळ्याचे काप)
    - Besan + Chilli powder + Salt + Boiling hot oil + Coriander seeds powder + Ajwain + Sesame seeds
    काकडीची कोशिंबीर / Cucumber Raita:-
    - Peeled, Chopped & squeezed cucumber (साल काढलेली, चिरलेली आणि पिळून घेतलेली काकडी)
    - Coriander leaves (कोथिंबीर)
    - Sugar (साखर) :- As per taste
    - Salt (मीठ) :- As per taste
    - Crushed peanuts (दाण्याचा कूट) :- 1 tsp
    - Prepared tadka (तयार केलेली फोडणी)
    - Lemon juice (लिंबाचा रस) :- As per taste
    मसालेभात / Masalebhaat:-
    - Mustard seeds (मोहरी)
    - Chopped chilli (चिरलेल्या मिरच्या)
    - Dry Coconut slices & curry leaves (सुक्या खोबर्‍याचे काप आणि कडीपत्ता)
    - Cardamom (वेलदोडा) :- 2
    - Cloves (लवंगा) :- 2-3
    - Bay leaves (तमालपत्र) :- 2
    - Green peas (मटार)
    - Turmeric powder (हळद)
    - Chilli powder (तिखट)
    - Coriander seeds powder (धणेपूड)
    - Coriander leaves (कोथिंबीर)
    - Cinnamon powder (दालचीनी पूड) :- 2 pinch
    - Salt (मीठ):- As per taste
    - kaala masala (काळा मसाला) :- Half tsp
    - Sugar (साखर) :- Half tsp
    - Cardamom powder (वेलदोडा पूड) :- 2 pinch
    - Cooked rice (शिजवलेला भात)
    - Ghee (तूप)
    #naivedyamrecipes #नैवेद्य #श्रावणी #शुक्रवार #स्वयंपाक #time #management #Sawan #mahina #month #cooking
    श्रावण महिन्यातील स्वयंपाक, श्रावणातील नैवेद्य, नैवेद्याचा स्वयंपाक, नैवेद्याचा स्वयंपाक कसा करावा, टाइम मॅनेजमेंट कसं करावं, किचन मॅनेजमेंट, shravan mahinyatil swayampaak, shravanatil navidya, naivedyacha swayampak kasa karava, naivedyacha swayampaak, sampoorn naivedya, shravani shukravar, naivedyamrecipes ,नैवेद्य ,श्रावणी ,शुक्रवार,time ,management, नैवेद्य ,श्रावणी ,शुक्रवार,time ,management

Комментарии • 506

  • @anaghagothoskar8337
    @anaghagothoskar8337 2 года назад +21

    अनुराधा ताई तुमचं व्यक्तिमत्व इतकं प्रसन्न आणि आनंदी आहे की तुमचं बोलणं ऐकत राहावंसं वाटतं. तुमचे 15 पदार्थ दिड तासात हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आणि प्रत्येक स्त्रीला ऊर्जा देणारं आहे. खूप खूप धन्यवाद!

  • @luizadias719
    @luizadias719 11 месяцев назад +3

    Madam Anuradha .
    Hi..Your explanation are so humble , just like a mother teaching her child .
    Thankyou so much.

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 2 года назад +41

    ताई,केवढा स्वंयपाक केला ! बारीकसारीक सूचना दिल्यामुळे खूप छान वाटलं.महानैवेद्य सांगितला धन्यवाद. शेवटी झालेले सर्व पदार्थ दाखवून सांगितले, वाटलं आम्ही त्यांची चव घेतली. आजचा व्हिडिओ सुपर डुपर हीट.

  • @kingrajarai
    @kingrajarai 2 года назад +24

    तुमच्या स्वयंपाकातील आणि तुमच्या स्वभावातील सात्विकता मला खूप आवडते 😍🙏

  • @rkrk1900
    @rkrk1900 2 года назад +2

    तुम्ही केलेला नैवद्या चा स्वंयपाक खूपच छान आहे मी नक्की हे सर्व पदार्थ करुन बघणार 😊👌👍

  • @nandinighoting1899
    @nandinighoting1899 2 года назад +2

    अनुराधाताई तुमचा झटपट शुक्रवारचा स्वयंपाक बघून फार अप्रूप वाटले.मला पण सणासुदीच्या दिवसात असे प्रकार करायला फार आवडतात.आता माझं वय पण झाले आणि आताच्या पिढीला असे पदार्थ फार आवडतं नाहीत.त्यांनां चमचमीत पदार्थ हवेत तरी पण मी बनवते.स्वयंपाक हा माझा आवडता छंद आहे.बाहेरचे पदार्थ ,मसाले लोणची पापड, चटण्या मी वर्षभराच्या मी घरी बनवते.मी नोकरी करत असताना असाच सर्व स्वयंपाक बनवुन कामावर घेवून जात असे.मला हे पाहून फार आनंद झाला.तुमचा श्रावण सोमवारचा नैवेद्य मला बघायचा आहे.खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन . धन्यवाद.

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 2 года назад +16

    Young generation la pan evdhya speed ne karayala nahi jamanar....hats off to you kaku... you are simply great 🙏🙏

  • @pooja-uk6xf
    @pooja-uk6xf 2 года назад +9

    वा काकू तुमचा स्वयंपाकचl व्हिडिओ बघून आम्हालाही खूप उत्साह वाटतो, खरचं तुम्हाला जशी अन्नपूर्णा प्रसन्न आहे, तशीच ती आमच्या वर पण प्रसन्न होवो असं या निमित्ताने म्हणावंसं वाटतं. खूप खूप धन्यवाद.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद तुम्हाला अन्न पूर्णा प्रस्सन होवो हीच देवी जवळ प्रार्थना 🙏

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 2 года назад +9

    🙏ताई खुपच योग्य नियोजन आणि तुम्हाला पहिले एकदम प्रसन्न वाटते तुम्ही किती सोज्वळ आहात आणि तुमची काम करण्याची पद्धत अतिशय खुप छान आहे व तुम्ही धार्मिक आहात व तुम्ही भरपूर मेहनती आहे तुम्हाला दीप अमावस्या च्या हार्दिक शुभेच्छा 👌👌👌🌹🌹🌹❤️❤️❤️

    • @pushpaprasad1452
      @pushpaprasad1452 2 года назад

      Kaki tumhi chaan sangta. Hats of to ur enthu at this age🙏

  • @sulbhaoak456
    @sulbhaoak456 11 месяцев назад

    अनूराधा ताई खूपच सुंदर रितीने आणि गोड आवाजात माहिती दिलीत. आमच्या घरी पण सवाष्ण बोलवतो तेव्हा असाच सर्व स्वयंपाक करावा लागतो. तुमची पध्दत बघून अजूनच उत्साह वाढला. धन्यवाद!

  • @diptinagwankar5362
    @diptinagwankar5362 2 года назад +17

    येत्या शुक्रवारी मी सवाष्ण बोलावली आहे... तेंव्हा हाच मेनू करीन... मस्त मेनू.... 👍 खूप छान.. thank you 👍

    • @shubhangichougule9989
      @shubhangichougule9989 2 года назад

      मी तुम्हाला भेट पाठवली आहे बघा आणि मला पाठवा My new channel started cooking recipes

    • @RT-tn4rp
      @RT-tn4rp 2 года назад

      P alakachi bhaji direct cooker madhe keli tari chalel na

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Год назад

      खूप धन्यवाद

  • @shitalmanoj5608
    @shitalmanoj5608 2 года назад +8

    My god...I am speechless...काकू तुम्ही great great आहात... 💕💕💕

  • @abolikelkar5057
    @abolikelkar5057 2 года назад

    मी सूध्दा असाच स्वैपाक करणे. एकात एकतरी पण खूप छान वाटले टीप्स देता देता छान केला खूप सुंदर धन्यवाद

  • @kalpanachavan2786
    @kalpanachavan2786 2 года назад +3

    तुमचा साधेपणा आणि सोप्या शब्दात साग्रसंगीत स्वयंपाक खूप खूप आवडतो

  • @naina763
    @naina763 Год назад +5

    GODLY she is.....sooo pure...rare to find...thank u fr coming on yt🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Год назад

      खूप धन्यवाद

    • @veenajawale8435
      @veenajawale8435 Год назад

      खूप खूप आभार. समाधान झाले करण्याचा आनंदही लुटला

    • @shakuntalabanchhode6343
      @shakuntalabanchhode6343 Год назад

      😊😊

    • @vijayagunjal9910
      @vijayagunjal9910 Год назад

      ​@@AnuradhasChannel❤
      V6ppppppppQ¹😊😊😊qqqqqaaaaqq zez

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 2 года назад +3

    सुगरण आहे आमची ताई 🙏 माझ्या आजीची आठवण झाली.खुप धन्यवाद ताई 🙏

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 Месяц назад

    अनुराधा ताई, अगदी सुग्रास पानावरच बसवलत की......आत्मा तृप्त झाला .अन्नपूर्णा सुखी भव...🎉🎉🎉🎉🎉

  • @umagrampurohit5268
    @umagrampurohit5268 2 года назад

    किती छान बोलता तुम्हीं काकु आणि किती साधी आणि सोपी पद्धतीने सांगता .

  • @smitadeo8212
    @smitadeo8212 2 года назад +3

    काकु खुप खुप धन्यवाद! तुम्ही किती छान आणी सोपी पद्धत सांगता। मेनु पण खुप छान झाला।

  • @sujatagokhale9465
    @sujatagokhale9465 2 года назад +1

    तुमच्या उत्साहाला त्रिवार नमन. सगळे पदार्थ उत्तम. तुमच्या कुटुंबातील मंडळी खूप नशीबवान आहेत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @prernachalke9192
    @prernachalke9192 2 года назад

    ताई तुम्ही कमी वेळात एवढे पदार्थ दाखवलेत, पांच्यामृत माझी आई बनवायची मला ते खुप आवडते. मी कधी नाही केले कारण माझ्या सासरी नाही बनवत. पण मी आजच करून बघेन. खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार आणि धन्यवाद

  • @manjushagholap6467
    @manjushagholap6467 2 года назад +2

    खूपच छान नियोजन आणि सगळं किती छान सांगता तुम्ही काकू नेहमी 👍 तुम्हाला त्रिवार वंदन 🙏🙏🙏मी आज सबस्क्राईब केलं ❤️

  • @jyotitiwari2607
    @jyotitiwari2607 11 месяцев назад

    खूपच छान पध्दतीने पूर्ण नैवेद्यासाठी पदार्थ करून दाखवले आहे. खूप खूप धन्यवाद😘💕🙏🙏

  • @apurvabhagade7217
    @apurvabhagade7217 2 года назад

    khup छान पध्तशीरपणे तुम्ही नैवैद्य कसा करावा हे सांगितले आहे ताई
    टिप्स पण छान दिल्या आहेत
    Thank you so much

  • @rajashree8672
    @rajashree8672 2 года назад +1

    नमस्कार 🙏
    रेसिपी दाखवली खुप छान 👌
    समजुन सांगणे मला आवडले.
    बारीक बारीक सगळ्या गोष्टी खुप छान पद्धतीने सांगितले.व्हिडिओ बघितला खुप छान वाटल.खुप छान 🌹 खुप सुंदर 👌

  • @snehswapn
    @snehswapn 10 месяцев назад

    मस्त, छान टीपा आहेत स्वयंपाक वेळेवर आटपायच्या. कटाच्या आमटीचा मसाला आवडला, करून पाहते.‌

  • @kavitapalkar5678
    @kavitapalkar5678 2 года назад

    काकी तुम्ही खूप गोड आहात, आणि तुमचा प्रत्येक पदार्थ अगदी छान असतो . मग तो गोडाचा असो किंवा तिखट.. तुमच्या पाक कलेमध्ये खूप सात्विकता आहे. You Are Simply Great .

  • @nilimasathe171
    @nilimasathe171 Год назад

    Khup chan सांगण्याची पद्धत तर मस्त तुमचे बोलणें मला फार आवडते mahnun tumhi फेवरेट आहे.

  • @simik4981
    @simik4981 2 года назад +1

    Tumcha swayampaak agdi bramhani paddhaticha amchya aai sarkha ahe kaku. Khoop refreshing ahe aajkaal chya oothsooth kanda-tomato garam masala chya typical recipes madhoon.

  • @diptibapat725
    @diptibapat725 2 года назад

    खूप छान 50 वर्षांपूर्वी आई करायची असा स्वैपाक ते आठवलं त्या वेळी खेडेगावात गॅस वै नव्हता।चुलीवर सर्व करायची पहाटे उठून अशीच तयारी करायची 11 वाजता सर्व तयार,आईच्या आठवणींना उजाळा मिळाला

  • @sukanyapatil9672
    @sukanyapatil9672 2 года назад

    खूप च छान आम्ही डोंबिवलीत लहान पणी श्रावणात शाळेतून घरी आलो की असाच बेत असायचा.आजीची आठवण झाली 🌹

  • @maltikolapkar6321
    @maltikolapkar6321 2 года назад

    खरंच खूप छान समजावून सांगण्याची उत्तम पद्धत!!! स्वयंपाकाचा कंटाळा करणार्याला सुद्धा स्वयंपाक करण्याची इच्छा होईल. मार्गदर्शन वाखाणण्याजोगेच आहे.खूप छान वाटलं.
    आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
    धन्यवाद.‌

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 2 года назад +2

    अतिशय सुरेख पद्धतीने स्वयंपाक दाखवला समजावून सांगण्याची पद्धत छान

  • @manasishukla4781
    @manasishukla4781 Год назад

    Kaku ...ya age madhe Tumi ewdh sagal energy ji ne kartat ...hats off to u..mast

  • @vaishalibhamare2455
    @vaishalibhamare2455 2 года назад

    धन्यवाद मॅडम खूपच सुटसुटीत आणि व्यवस्थितपणे समजून सांगितलेलं असतं सर्वांनाच फार आवडला

  • @prasadchitnis-xv9or
    @prasadchitnis-xv9or 8 месяцев назад

    Wow काकू केवढा उत्तम चविष्ट निगुतीनं केलेला स्वयंपाक खूपच भरभर प्रमाणात आणी न गडबड न चूक ग्रेट सुगरण आहात अतिशय आवडल मला तुमचं मेजवानी व्हेजवानी पुस्तकं हवंय मिळेल का कसं कुठे पैसे भरावे वगैरे सांगावे नमस्कार धन्यवाद तुम्हांला भेटायला पण आवडेल

  • @sanjivaniyogaclasses
    @sanjivaniyogaclasses 4 месяца назад

    खूप आवडले स्यपाकं छान माहिती मिळाली धन्यवाद❤

  • @manishakokate5263
    @manishakokate5263 2 года назад

    मला मनापासुन सांगायच आहे काकु की तुम्ही खरच "अन्नपूर्णा" आहात. आणि तुम्ही या गोड पध्दतीने जे मार्गदर्शन करता त्यासाठीचा खुप खुप धन्यवाद। श्रावणातील हे व्हिडिओ मला खुप मदत करणार आहेत. 🙏🌹😊

  • @rajashrijoshi823
    @rajashrijoshi823 2 года назад

    ताई खरच खूप कमी वेळात इतका स्वैपाक केलात खरच तुम्ही सुगरण आहात अगोदर तयारी असल्यामुळे हे सहज शक्य आहे मी पण प्रयत्न करीन

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      नक्की जमेल मला खात्री आहे

  • @vidyagundlekar985
    @vidyagundlekar985 2 года назад +17

    So enthusiastic at this age also, hats off

  • @reshmanagaonkar4784
    @reshmanagaonkar4784 2 года назад

    Great mavshi yevdya vayat suddha kiti padarth kele. tumcha ya vayat hi kiti stamina ahe . He
    Pahunch man bharun gele. 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @madhavinikte2373
    @madhavinikte2373 2 года назад +8

    मावशी, तुमचा उत्साह बघुनच अनेकांची परत किचनकडे पावल वळतील. thanks.. आपला स्वैपाक कसा बेस्ट आहे हे जाणवत.

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 2 года назад

    खूप छान सात्विक अहार आणी वाणी पण गोड
    खूप धन्यवाद ताई शतशःनमन

  • @mukundbhale9236
    @mukundbhale9236 Год назад

    Aaji tumche bolne khup chhan aahe.tumche padarth changale astat.

  • @vrindaabhyankar6238
    @vrindaabhyankar6238 2 года назад +2

    काकूं,खूपच छान सोप्या छोटया टिप्स संगीतल्या,मसाले भात रेसिपी खूपच आवडली पट्कन होणारा एरवी पण रात्री कधी कर्ता येईल असा,धन्यवाद काकूं ,तुम्ही नेहमी प्रसन्न दिसता

  • @arunagatfane8493
    @arunagatfane8493 Год назад

    खूप सुंदर आपल्या पाक कृती छान असतात ताई कमी वेळात खूप सार
    नक्की करू आम्ही

  • @shailajashiradhonkar9420
    @shailajashiradhonkar9420 2 года назад

    काकू ,खूप छान व कमी वेळात सर्व पदार्थ तयार केले,

  • @modicaredemoswithrohini6751
    @modicaredemoswithrohini6751 2 года назад

    Khupach sunder sahaj soppe watel ase shikawale... Tensionch gele.. ewadha swayanpak itaka chan.. wa.. thanks tai. Khup chan watale.

  • @vaishaliatre6437
    @vaishaliatre6437 11 месяцев назад

    माझी आई आणि सासुबाई या दोघींचीही खुप आठवण आली.दोघीही शांतपणे असेच भरपुर चविष्ट,सात्विक पदार्थ पटापट करायच्या.

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 2 года назад +7

    तुम्हाला पाहिलं की मला माझी आजी आठवते ती ही अशीच सुगरण होती, तुमच्या सारखीच साधी, सोज्वळ, गोड आवाज असलेली 🥺

    • @reemadesai4766
      @reemadesai4766 2 года назад

      खूपच छान
      काकी तुम्ही अनुराधा नाहीतर अन्नपूर्णा आहात
      तुमच्याकडे सुगरणपणा बरोबर Time Management पण उत्तम आहे
      तुम्हाला माझे मनापासून नमन आणि धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Год назад

      मनापासून धन्यवाद

  • @pushkarkulkarni9922
    @pushkarkulkarni9922 2 года назад

    Aaji tumi kup Chan स्वयंपाक केला👍👍

  • @shamachhajed6534
    @shamachhajed6534 2 года назад

    तुमच्या चॅनेल बद्दल खूप ऐकलं होतं, आज पहिला हा व्हिडिओ, खूपच छान
    Subscribe केलं आहे

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      खूप धन्यवाद शमा ताई

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 2 года назад

    खरोखर आमच्या घरातल्याच आहात आता तुम्ही. तुमच्या एकूणएक videos आम्ही पहिले आहेत. मुली अणि सुना खुश आहेत. धन्यवाद

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      खूप धन्यवाद

    • @rashmipadwal6693
      @rashmipadwal6693 2 года назад

      खूप छान माहिती सांगितली.मला जेवण बरोबर येत नाही तरी पण तुमचं बघुन प्रयत्न करीन तुम्हाला खूप खूप धन्यवाद.🙏🙏

  • @mangeshnipunage9594
    @mangeshnipunage9594 4 месяца назад

    काकू जिवती आई आणि माता अन्नपुर्णा प्रसन्न तर आहेच तुमच्यावर पण एवढा स्वादिष्ट प्रसन्न मनाने केलेला नैवेद्य बघून खुश झाली असणार नक्कीच

  • @meenakadlak5158
    @meenakadlak5158 2 года назад

    बापरे खुपच छान ताई सलाम तुमच्यातील सुगरणीला आणी एनर्जिला

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 2 года назад +2

    एक नंबर मेनू! काकू तुम्हांला त्रिवार वंदन.काय हात चालतो तुमचा. मला माझ्या आईची आठवण झाली.ती ७६ वर्षांची आहे पण ती पण एकदम सुपरफास्ट.सध्या बिचारीचा हात गळ्यात आहे.मनगट fracture झालंय.मी तिला आणि आता तुम्हाला follow करते.एक गंमत सांगू? तुम्ही जशी ताटली डब्यावर ठेवली आणि बटाटे उकडले,अगदी तशी ताटली माझ्याकडे आहे मी पण असेच उकडते.tunning जमतं ते असं. मी पण यावर्षी हाच मेनू करणार नक्की. 👌👌🙏🙏

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      नक्की आणि मला फोटो पाठवावा

  • @rajashree8672
    @rajashree8672 2 года назад

    रेसिपी बनवताना त्यात काय लागणार हे पण डिसक्रेपशन मधे लिहिले खुप छान 👍👌👌

  • @jyotiparab6791
    @jyotiparab6791 Год назад

    ग्रेट काकू, मी बघूनच दमले एका पेक्षा एक पदार्थ अगदी झटपट केलेत management अफलातून

  • @snehaljoshi5307
    @snehaljoshi5307 2 года назад

    काकू खूप छान टाइम मॅनेजमेंट व पदार्थ सुद्धा

  • @rajshriawasthi3621
    @rajshriawasthi3621 11 месяцев назад

    Tai you are looking so.... Beautiful 😘🤗 स्वयंपाक ek number zale आणि चवदार आत्मा bghun trupt zale गोड वाणी मधुर 🤗😍या वयात इतका ऊस्साः 👏👏🙏🙏I have no word's to appreciate 👍👍👍👍

  • @vibhashinde7878
    @vibhashinde7878 Год назад

    खुप झटपट व खुप पदार्थ छान नैवेद्य🙏👌🤗👍

  • @gawadechaitanya
    @gawadechaitanya 2 года назад

    Khup chan mahanaivedya
    Mahit nhavtya kahi goshti
    Tya tumhi kiti ezyly sangitlya
    Thanks dear
    God bless you

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      खूप धन्यवाद मंजिरी ताई

  • @חגי-ד6ר
    @חגי-ד6ר 25 дней назад

    Maachi yaad aali she was also like you so humble and use to make tasty food like you thanks for uploading.

  • @ashwinipandharikar1238
    @ashwinipandharikar1238 2 года назад +1

    अतिशय छान पद्धतीने स्वयंपाक

  • @sshubhangipalkar837
    @sshubhangipalkar837 2 года назад

    Khupach chan kaku video baghun khupach chan aani utsahi vatat, sojjaval chehra aani bolan suddha tevdhch sojjval 😘🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @madhuriwaghamode9880
    @madhuriwaghamode9880 2 года назад +2

    खूप छान आहे recipes 😋

  • @sheelasarnaik4691
    @sheelasarnaik4691 2 года назад

    खूप छान स्वयंपाक आहे.बघूनच मन तृप्त झाले.

    • @alkapathak5619
      @alkapathak5619 2 года назад

      Time management करून झटपट स्वयंपाक कसा करावा हे खूप छान सांगितले आहे .धन्यवाद ताई .तसेच तुम्हाला भेटून पण खूप खूप आनंद झाला.

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 2 года назад

    खूपच छान, माझ्या सासूबाईंची आठवण झाली पहाटे काकड आरती ला त्या पंचपक्वान्न चा नेवेद्य घेऊन जायच्या

  • @vijayasali7658
    @vijayasali7658 Год назад

    Khoop chaan

  • @smitakurtkoti7780
    @smitakurtkoti7780 2 года назад +1

    खूप सोपी पध्दत वेळ वाचवणारी क्रुती सांगितले छान सांगतात

  • @sandhyasurti6833
    @sandhyasurti6833 2 года назад

    Khupach chhan mala mazya aai chi aathawani yetat ani tumhi bolta pan ticha sarkhe mala tumache padartha khup aawadtat

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 2 года назад

    काकू साडी खूप खूप छान दिसतेय तुम्हाला 👌👌👍♥️♥️ तुम्ही सर्व पदार्थ छान समजून सांगता... काकू तुमचा आवाज गोड आहे...ऐकतच रहावेसे वाटते...मी सर्व सणांची माहिती असलेले Vlog बघते... खूप सुंदर माहिती काकूंनी सांगितली आहे... खूप खूप धन्यवाद काकू...💐💐

  • @sashaaaaaaa.01
    @sashaaaaaaa.01 2 года назад

    छान स्वयंपाक, भारी मला खूप आवडला ,मी माझ्या आईला सांगेल बनवायला 👌👍

  • @vijayajoshi5631
    @vijayajoshi5631 Год назад

    Khupacha chhan, tumacha vidio mala khupcha aavadala .

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 2 года назад

    खूप छान स्वयपाक करता व झटपट तयारी पण जोरदार धन्यवाद ताई🙏🙏👌👍

  • @rajeshreebarad1451
    @rajeshreebarad1451 2 года назад +1

    🙏💐🙏आईची आठवण झाली काकू मला खूप छान

  • @suchitawadekar379
    @suchitawadekar379 2 года назад

    खुपचं छान कमी वेळात बरेच पदार्थ केलात

  • @varshakadam812
    @varshakadam812 2 года назад

    खूप छान 👌आम्हां नवीन पिढीला असलेला स्वयंपाक करण्याचा कंटाळा अशा विडिओ ने पळून जातो 😊🙏

  • @madhavierande9638
    @madhavierande9638 2 года назад

    काकु मला तुम्ही फार आवडता...मस्त menu

  • @anjalijagdishwala6547
    @anjalijagdishwala6547 2 года назад +1

    Khoopach chan tumhala baghun khoop Utsah wateto 🙏🙏

  • @manjirijoshi675
    @manjirijoshi675 Месяц назад

    ताई किती छान सांगितले

  • @Avi13031
    @Avi13031 2 года назад

    Aaji tu kiti godey gaaaaa
    ❤️❤️❤️❤️❤️
    Ml mjhya ahi chi athvan yete. She taught me the same thing.
    Tumchyakadna khup shikayla bhetla

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад +1

      खूप धन्यवाद असच प्रेम असू द्यावे

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 2 года назад

    Khup chhan swayampak zala video khup chhan

  • @sangitajoshi4549
    @sangitajoshi4549 2 года назад

    खूप छान काकू तुम्हाला पाहुन उत्साह येतो

  • @vaishalimahurkar9438
    @vaishalimahurkar9438 2 года назад

    Tai khupcha chan wa zatpat swaympak kela tehi awdhe padartha.

  • @Microbiology52
    @Microbiology52 2 года назад

    ताई, छान मेनु, तयारी मस्त, छान नैवेद्य.

  • @pavankumarmahamulkar950
    @pavankumarmahamulkar950 2 года назад +1

    नेहमीप्रमाणे अतिउत्तम मेनू,

  • @vanitashripat2518
    @vanitashripat2518 2 года назад

    Kaku khup khup danyawad yewada swayam kami velet khup sopya padhatine samjun sangitala

  • @madhavideo778
    @madhavideo778 2 года назад

    Kaku me fakta itakach mhanen hats of to you , you are great

  • @thelegend-latajee3939
    @thelegend-latajee3939 2 года назад +4

    Salute to your flawlessness

  • @user-qj7jt6kr6s
    @user-qj7jt6kr6s 6 месяцев назад

    आई सारखे बोलता खूप प्रेमळ ❤

  • @pallavihadmode2150
    @pallavihadmode2150 2 года назад

    Khupch chan 👌👌👌kmi velet jasst kse padharth krta yetil he chan sangitlt.🙏🙏

  • @shrikanthamine4234
    @shrikanthamine4234 2 года назад

    Wah! Manle Madam tumhala! Itkya kami velat itke sare padarth! Khup chaan

  • @shubhadakode9638
    @shubhadakode9638 2 года назад

    Wa wah tai khoop chan mastch great ahet thumi 🙏🙏❤proud of you 👍👌

  • @trimbaklale6211
    @trimbaklale6211 2 года назад

    मावशी तुम्ही मला दिलेली बाळंतीण मुलीला आहार कसा द्यायचा ह्या बद्दल दिलेली माहिती मला खूप ऊपयोगी ठरली तुम्ही मला फोन वर एवढा वेळ दिला खूप आभारी आहे मी तुमची दोन दिवस झाले मी मुलीला घेऊन माझ्या घरी आले

  • @namratadeshmukh9297
    @namratadeshmukh9297 2 года назад

    Khupch chan kaku

  • @sayalinar5173
    @sayalinar5173 2 года назад +1

    Kaki tumhi great aahat 🌷😘

  • @arunagatfane8493
    @arunagatfane8493 Год назад

    आपल सोज्वळ रूप भावल मनाला
    आईची आठवण आली

  • @shakuntalaningurkar8887
    @shakuntalaningurkar8887 2 года назад

    🙏 in less time, with short tips khup Sundar swayampak kela 👍

  • @surekhadalvi7810
    @surekhadalvi7810 2 года назад

    खूप छान माहिती दिलीत काकू. तुम्हाला गणेशोत्सव निमित्त खूप खूप शुभेच्छा.🙏🙏