पेरू खत व्यवस्थापन पेरूच्या झाडाविषयी माहिती पेरू लागवड कशी करावी ? पेरू लागवड विषयी माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • पेरू खत व्यवस्थापन पेरूच्या झाडाविषयी माहिती पेरू लागवड कशी करावी ? पेरू लागवड विषयी माहिती महाराष्ट्रात पेरू या (Guava Farming) पिकाची मोठया प्रमाणात लागवड होत आहे. भारतामध्ये २.६८ लाख हे. क्षेत्रावर या पिकाची लागवड करण्यात आली आहे. प्रामुख्याने उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या राज्यात या (Guava Farming) पिकाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात एकूण ४०,०ooहे. क्षेत्रावर पेरु लागवड केली जाते. लागवडीखालील क्षेत्रात उत्तरप्रदेशानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. सध्या महाराष्ट्रातील पेरू (Guava Farming) या पिकाची उत्पादकता अवघी ८.१ मे. टन प्रती ` हेक्टर इतकी आहे. या उलट उत्तरप्रदेश आणि बिहार `~ या राज्यात ती अनुक्रमे १३.४ आणि १२.५ मे. टन प्रती हेक्टर एवढी आहे. पेरु खत व्यवस्थापन Peru lagvad लागवड पद्धतप्रथम वर्षीदुसऱ्या वर्षीतिसऱ्या वर्षीचौथ्या वर्षीलागवडीनंतर दुसऱ्या व चौथ्या महिन्यानंतर (प्रती झाड )जून ते जानेवारी (प्रती झाड )जून ते जानेवारी (प्रती झाड )जून ते जानेवारी (प्रती झाड )घनबाग७५:३०:३० ग्रॅम नत्र ,स्फुरद व पालाश +५ ग्रॅम शेणखत +२५ ग्रॅम प्रत्येकी अ्झोटोबॅक्टर पीएसबी आणि ट्रायकोडर्मा१३०:७५:७५ ग्रॅम नत्र , स्फुरद व पालाश +५ ग्रॅम शेणखत +२५ ग्रॅम प्रत्येकी
    अझोटोबॅकटर पीएसबी आणि ट्रायकोडर्मा१३०:७५:७५ ग्रॅम नत्र , स्फुरद व पालाश +७ ग्रम शेणखत +५०ग्रम प्रत्येकी अझोटोबक्टर पीएसबी आणि ट्रायकोडर्मा२०५:११२:११२: ग्रम नत्र , स्फुरद व पालाश + १० ग्रम शेणखत + ५० ग्रम प्रत्येकी अझोटोबॅक्टर , पीएसबी आणि ट्रायकोडर्मापारंपारिक लागवड९०:३०:३० ग्रम नत्र , स्फुरद व पालाश + १० ग्रम शेणखत + २५ ग्रम प्रत्येकी अझोटोबॅक्टर ,पीएसबी आणि
    ट्रायकोडर्मा१८०:६०:६० ग्रॅम नत्र , स्फुरद व पालाश + २० ग्रॅम शेणखत + २५ ग्रॅम प्रत्येकी अझोटोबॅक्टर , पीएसबी आणि ट्रायकोडर्मा२७०:९०:९० ग्रॅम नत्र , स्फुरद व पालाश + ३० ग्रम शेणखत + ५० ग्रम प्रत्येकी अझोटोबॅक्टर पीएसबी आणि ट्रायकोडर्मा४५०:१५०:१५० ग्रम नत्र , स्फुरद व पालाश + ४० ग्रम शेणखत +५० ग्रम प्रत्येकी पीएसबी आणि ट्रायकोडर्मा पेरू लागवडीसाठी जात निवड नवीन पध्दतीने लागवड करताना १ मीटर खोल व १ मीटर रुंद, जमिनीच्या उताराला ५ मीटरच्या अंतरावर आडव्या चाऱ्या काढून, पूर्ण मातीने भरून व त्यावर ६ फूट रुंदीचे गादी वाफे तयार करून झाडाच्या दोन्ही बाजूने ठिबक लाइन टाकून लागवड केल्यास, झाडांची जलद गतीने वाढ होऊन फक्त १८ महिन्यात झाडांची वाढ पूर्ण होते. पारंपरिक पध्दतीने खड्डे काढल्यास झाडांची वाढ पूर्ण होण्यास ४-५ वर्षे लागतात. नवीन पध्दतीमध्ये मूळांची चुंबळ होत नसल्याने पेरूची बाग २० ते २५ वर्षे टिकून राहते. दुष्काळ सहन करते. उताराला आडव्या चाऱ्या मारून गादी वाफे केल्याने आपोआप जलयुक्त शिवार ह्या संकल्पनेची पूर्तता होते. त्यामुळे विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. दुष्काळात बागेला पाणी कमी पडत नाही. पानगळ करून छाटणी केल्यानंतर पहिले पाणी देताना फक्त शेणखत, सेंद्रिय खते व जैविक खताचा वापर करावा. पालवी फुटून फुले आल्यानंतर खालील प्रमाणे रासायनिक खतांचा वापर करावा. त्यानंतर ३ महिन्यात अमोनिअम सल्फेट ३०० किलो वापरावे.
    माती परीक्षणाच्या अहवालानुसार वरील खतांच्या मात्रामध्ये फरक करावा लागेल. अपेक्षित चांगले उत्पादन मिळण्यासाठी बेडवरील मातीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमीतकमी २ टक्के असले पाहिजे.
    पुढील बहार चांगला येण्यासाठी फळांची तोडणी झाल्यानंतर व बहार संपल्यानंतर वरीलप्रमाणे सर्व सेंद्रिय खते, समतोल रासायनिक खते व जैविक खतांचा वापर करावा. दीड ते दोन महिने बागेला व्यवस्थित पाणी द्यावे. दर १५ दिवसांनी १ ते २ फवारण्या करून बाग विश्रांतीसाठी सोडून द्यावी. असे केल्याने फळ धारणा होण्यास कोणतीही अडचण येत नाही. वरीलप्रमाणे योग्य व्यवस्थापन केल्यास भरघोस उत्पादन होऊन विषमुक्त फळे निर्माण करून फळ प्रक्रिया करण्याकरिता किंवा लोकल मार्केटमध्ये विक्री करून किमान रास्त दर मिळाल्यास एकरी लाखो रुपये मिळवता येतात. #ॲग्रोवन #फळबाग नियोजन ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
    📱मोबाईल ॲप्लिकेशन play.google.co...
    🌐 वेबसाइट - www.agrowone.com
    👍 फेसबुक - / agrowone
    📸 इंस्टाग्राम - / agrowone
     ट्विटर - / agrowone
    टेलेग्राम - t.me/Agrowone
    ------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone

Комментарии • 7

  • @panditkomte5798
    @panditkomte5798 Месяц назад

    पेरूफळाला किड लागते.उपाय

  • @vijaysawant4675
    @vijaysawant4675 3 года назад +1

    Peru piclyawar kide hotat tar upay suchawa.ani 1 yr zadachi kadhi karawi video kara hi vinanti.gavti peruchi cutting keli pan tyala futwe jast ale nahi upay sanga.

    • @abhishekmolwande6210
      @abhishekmolwande6210 3 года назад

      नारळ,लावने,आहे,कशी,मशागत,करावि,हे,सागा

  • @amitabagayatkar7403
    @amitabagayatkar7403 2 года назад

    खतांची नावे लिहून द्यावी.बोललेल कळत नाहि.मी टेरेसवर लखनवी पेरुचे झाड लावले आहे. त्याला बदामाच् आकाराएवढि फळे आली आहेत.मोठी होण्यासाठी काय करायला पाहिजे.रासायनिक जास्त नको.

  • @mahadeokalel3468
    @mahadeokalel3468 2 года назад

    पेरू साठी कमीत कमी रासायनिक खते
    व जास्तीत जास्त सेंद्रीय खतांचा वापर करावा जिवाणू खते निंबोळी पेंड
    तरच पेरूची चमक चांगली राहते

  • @narayannikam9796
    @narayannikam9796 3 года назад

    पेरू साठी कंपोस्ट खत व्यवस्थापन केले तर चालेल का सर

  • @ashishkolpe9153
    @ashishkolpe9153 3 года назад

    छान 👌