कीर्तन गुरूवर्य सुरेश महाराज जाधव. अभंग-रोडगा वाहीन तुला भवानी आई........ सातारा (रहिमतपुर परतवडी)
HTML-код
- Опубликовано: 7 янв 2025
- कीर्तन गुरूवर्य सुरेश महाराज जाधव
गायन -एकनाथ महाराज जाधव
प्रदीप महाराज जाधव
पखवाज-संदीप महाराज जाधव
उत्तम महाराज सुतार
ठिकाण-मौजे परतवडी रहीमतपुर सातारा..
अभंग-सत्वर पाव ग मला भवानी आई
रोडगा वाहीन तुला
सासरा माझा गावी गेला
तिकडेच खपवी त्याला
भवानी आई, रोडगा वाहीन तुला
सासू माझी जाच करिते
लवकर न्येई ग तिला
भवानी आई, रोडगा वाहीन तुला
जाऊ माझी फडाफडा बोलते
बोडकी कर ग तिला
भवानी आई, रोडगा वाहीन तुला
नणंदेचं कार्टं किरकिर करतं
खरूज येऊ दे त्याला
भवानी आई, रोडगा वाहीन तुला
दादला मारून आहुति देईन
मोकळी कर ग मला
भवानी आई, रोडगा वाहीन तुला
एका जनार्दनी सगळेच जाऊ दे
एकटीच राहू दे मला
भवानी आई, रोडगा वाहीन तुला
ब्रह्मनाद पखवाज क्लास नवी मुंबई
गुरुवर्य श्री संदीप जाधव सर
95 94 90 98 34