सर्वात पवित्र स्थळांपैकी एक प्राचीन मंदिर ❤️| एक आधुनिक प्रथा ✨| PART-2|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • या भूमीवर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत पण या सर्व तीर्थक्षेत्रांत कर्नाटक राज्यात उत्तर कन्नड जिल्हयात अत्यंत पवित्र व प्रेक्षणीय समुद्र किनारी गोकर्ण हे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी 'महाबळेश्वर' नावाचे स्वयंभू शिवलिंग (आत्मलिंग) आहे. रावणाने घोर तपश्चर्या करून जे शिवाचे आत्मलिंग मिळविले त्याची श्रीगणेशाने या क्षेत्री स्थापना केली.
    आत्मलिंगाची उत्पत्ती कशी झाली ? कालाग्नीसारखा एक महाकाय पशु होता. त्या पशुला तीन शिंगे होती. एकदा ब्रम्हा-विष्णू-महेश शिकारीसाठी गेले होते. त्यांनी त्या पशूची शिकार केली. त्यांनी त्या पशूची तिन्ही शिंगे काढली. त्या प्रत्येक शिंगाखाली एकेक प्राणलिंग होते. ती तिन्ही लिंगे त्या तिघांनी घेतली. यातील आत्मलिंग हे शंकरांना मिळाले होते. जो या आत्मलिंगाची तीन वर्षे पूजा करील तो स्वतः ईश्वर होईल. हे आत्मलिंग ज्या स्थानी असेल ते स्थान कैलास होईल.
    रावणाने ते आत्मलिंग वर काढण्यासाठी जोर लावल्याने त्या आत्मलिंगाला पीळ बसला व ते गोकर्ण म्हणजे गाईच्या कानाच्या आकारासारखे झाले पण ते जमिनीच्या बाहेर आले नाही. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. स्वत भगवान सदाशिव, भगवान विष्णू, ब्रम्हदेव, कार्तिकेय, गणेश व सर्व देवादिकांनी या ठिकाणी वास्तव्य केले असे गुरुचरित्रात सांगण्यात आले आहे.
    गोकर्णक्षेत्रात असलेले भगवान शंकर त्यांचे केवळ स्मरण करताच सर्व पातकांचा नाश होतो. सूर्याशिवाय अंधाराचा नाश होत नाही त्याप्रमाणे गोकर्णक्षेत्री गेल्याशिवाय संपूर्ण पापनिष्कृती होत नाही. हजारो ब्रम्हहत्या केलेला मनुष्यही गोकर्णक्षेत्री जाताच पापमुक्त होतो. या क्षेत्राचे माहात्म्य इतके थोर आहे की, कार्यसिद्धीसाठी ब्रम्हदेवाने आणि विष्णूने येथे तप केले आहे. जो कोणी गोकर्णक्षेत्री जाऊन भगवान शिवाची पूजा करतो ब्रम्हपदाला जातो (संदर्भ- गुरुचरित्र अध्याय ७ वा व स्कंध पुराण)
    या गोकर्णक्षेत्रात कोटी कोटी शिवलिंगे आहेत. सत्ययुगात शिवलिंग श्वेत पाषाणाचे होते. त्रेतायुगात ते तांबूसवर्णाचे होते, द्वापारयुगात ते पीतवर्ण आणि कलियुगात ते कृष्णवर्णाचे होते, गोकर्ण महाबळेश्वराचा अधोभाग खूप गोल आहे. तो सप्तपाताळापर्यंत गेलेला आहे.
    परमपवित्र असे हे गोकर्णक्षेत्र पश्चिम समुद्राच्या काठावर आहे. तेथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते तसेच रविवारी, सोमवारी व बुधवारी जेव्हा अमावस्या येते तेव्हा गोकर्ण क्षेत्री केलेले समुद्रस्नान, शिवपूजन, पितृतर्पण, अन्नदान, होमहवन अनंत फळ देणारे आहे. या ठिकाणी श्री गणेशाचे सुद्धा मंदिर आहे तसेच गोकर्णापासून ३० कि मी अंतरावर मुरुडेश्वर हे अत्यंत प्रेक्षणीय स्थळ आहे. हे गोकर्णक्षेत्र पुण्यवान स्थान आहे, म्हणूनच श्रीपाद श्रीवल्लभ या पवित्र क्षेत्री ३ वर्षे वास्तव्यास होते.
    • Devotional Music No Co...
    royaltyfreebgm...
    #shiv #mahadev #shiva #mahakal #bholenath #harharmahadev #bhole #shivshakti #bholebaba #mahakaal #kedarnath #omnamahshivaya #lordshiva #om #india #shivshankar #ujjain #mahakaleshwar #har #mahadeva #hindu #aghori #jaimahakal #love #hinduism #shambhu #god #krishna #hanuman #shivbhakt #vlogging #vlogging #motovlogging #vlogginglife #vloggingcamera #vloggingyoutubers #travelvlogging #vloggingfamily #dailyvlogging #familyvlogging #vloggingcouple #motovloggingcommunity #vloggingmums #vloggingchannel #vloggingday #foodvlogging #vloggingsetup #vloggingmom #kidsvlogging #vloggingtips #ukvloggingmumsclub #vloggingcameravlogsquad #vloggingyoutuber #youtubevlogging #vloggingislife #instavlogging #motovloggingfamily #vloggingmama #vlogginglifestyle #vlogging101 #imvlogginghere

Комментарии • 7

  • @kunalbhoir4800
    @kunalbhoir4800 3 месяца назад +2

    Ekveera la pehele daaru piyachi non veg khayacha baand karyala lagel aplaya lokancha baghun bakiche non agri koli loka pn Ekveera la fakta daaru non veg and picnic spot mhanun enjoy karayla jatat
    Hyachi suruvat kuthetari apalya samaja kadun jhali pahije

    • @TanishaGaikarvlogs
      @TanishaGaikarvlogs  3 месяца назад +2

      नक्कीच 😇 … कोणी नाही जबरदस्ती करत की साड्याच नेसा करून पण निदान अंग भरून तरी कपडे घालावे दर्शनाला जाताना ऐवढच कारण आपला धर्म परंपरा आपणच जपू ☺️.. कारण मी एकविरेला जाऊन आली मागच्याच महिन्यात तुम्ही vlog बघितलाच असेल तिकडे मी बघितले भरपूर मुली ( माहित नाही आगरी कोळी होत्या की नाही) वेस्टर्न वियर करुन शॉर्ट कपडे घालून दर्शनाला उभ्या होत्या मला तेव्वाच आवडले नव्हते अजिबात .. वेस्टर्न वियर करा त्यात काही वाईट नाही पण देवस्थान च्या ठिकाणी अजिबात नाही 🙏🏻.. आणि उत्तर कर्नाटक मधला हा नियम बघून खरच खूप छान वाटलं 😊

    • @TanishaGaikarvlogs
      @TanishaGaikarvlogs  3 месяца назад +2

      आणि तुमचे म्म्हणणे ही अत्यंत बरोबर आहे 😇

  • @PranaliMhatre-g2e
    @PranaliMhatre-g2e 3 месяца назад

    ❤❤

  • @pradeepkoli2511
    @pradeepkoli2511 3 месяца назад

    Khup chaan video aahe ❤❤❤❤