नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा देवीचा... | Navratri 2023 | Merak Events

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2023
  • बंध नात्यांचे...
    रंग ऋणानुबंधांचे…
    नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा देवीचा...
    ही देवी धन, आनंद, ऐश्वर्य, सौभाग्य आणि आरोग्य प्रदान करणारी आहे. तीचं रूप सौम्य असलं तरी ते दुर्गेचे रूप असल्याने ती वाघावर आरूढ आहे. तिच्या हातात विविध शस्त्र आहेत. अतिशय सुंदर अंगकांती असणाऱ्या या देवीने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले आहे..
    शिवाची आराधना करण्यासाठी देवी पार्वती जेव्हा घरातून बाहेर पडली तेव्हा तिच्या आईने, तुझ्या समवेत दोन सख्यांना घेऊन जा, म्हणजे आम्हाला तुझी काळजी राहणार नाही अशी विनंती केली. मैत्रिणींमधला हा विश्वास लाल रंग दर्शवतो. हा तेजाचा रंग... चैतन्याचा रंग... आपल्या शरीरातील सप्तचक्रांपैकी मुलाधार चक्राचा रंग हि लाल मानला जातो. तसचं प्रेमाचा, विश्वासाचा रंग ही लाल मानला जातो.
    म्हणूनच घट्ट मैत्रीण असल्यासारखं भाग्य नाही. मनाचा गोंधळ उडत असेल तर तिला विश्वासाने सांगावं. अडीअडचणीच्या वेळी जिला हक्काने हाक मारावी. खूप आनंदात असताना जिला घट्ट मिठी मारावी, अशी ही मैत्रीण..
    या मैत्रीचा कलश विश्वास, आपलेपणा, प्रेम, सचोटी या चौरंगावर शोभून दिसतो.
    नवरात्रीतला आजचा एक दिवस आपल्या घट्ट मैत्रिणीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी...
    तिसरं नातं : मैत्रीणी
    स्मिता उदय गवाणकर
    प्रिया प्रसाद साटेलकर
    मनश्री मंदार शहाडे
    संकल्पना / संयोजन :
    मेराक इव्हेंट्स
    मंजिरी हेटे, प्रसाद महाडकर, प्रिया साटेलकर
    लेखन : धनश्री लेले
    व्हाईस ओव्हर : मधुरा वेलणकर
    डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
    छायाचित्र : योगेश रावराणे
    रंगभूषा : आसावरी गोखले ,पॅशन - अंधेरी, पूर्व
    दागिने : श्रीकांत बाबुराव हरचेकर ज्वेलर्स ,विलेपार्ले -पुर्व
    डिझाईन : निर्मिती ग्राफिक्स
    फुलांची सजावट : श्याम पांडुरंग भगत,दादर
    रील डिझाईन : राजेंद्र कदम
    #NavlaiNavratrichi ....
    #MerakEvents
    #EventsByMerak #SmrutiGandhaMarathi
    #JeevanGaniEvents
    #NavratriSpecial #Navratri2023
    #Navratri #Marathi #MarathiStatus
    _________________________________

Комментарии •