सरदार हिरोजी इंदलकर सारथी किल्ले संवर्धन उपक्रमाच्या प्रमाणपत्र बक्षिस वितरण कार्यक्रम | Sarthi Pune

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सरदार हिरोजी इंदलकर किल्ले संवर्धन उपक्रमांतर्गत १९ फेब्रुवारी २०२४ रोजी किल्ले व गड परिसर स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमात सहभागी संस्था व विद्यार्थी यांच्या माध्यमातून जवळपास १२ हजार प्लॅस्टिक च्या बाटल्या, ३५० काचेच्या बाटल्या, ४००० पेक्षा अधिक प्लॅस्टिक च्या पिशव्या जमा करून नगरपालिका, महानगरपालिका यांच्या सहयोगाने शास्त्रोक्त विघटन करून विल्हेवाट लावली.
    सरदार हिरोजी इंदलकर किल्ले संवर्धन उपक्रमांतर्गत किल्ले व गड परिसर स्वच्छता कार्यक्रमात सहभागी होवून उत्तम कार्य केल्यामुळे सहभागी संस्था व विद्यार्थी यांचा गुणगौरव, प्रमाणपत्र व बक्षिस वितरण समारंभाचे सारथी संस्थेच्या नूतन इमारतीतील सभागृहात आयोजन करण्यात आले होते.
    या कार्यक्रमामध्ये सारथी संस्थेचे अध्यक्ष मा. अजित निंबाळकर, संस्थेचे संचालक मा. मधुकर कोकाटे, मा. मधुकर कोकाटे, मा. उमाकांत दांगट, मा. डॉ. नवनाथ पासलकर, व्यवस्थापकीय संचालक श्री. अशोक काकडे, निबंधक श्री संजीव जाधीव यांच्यासह संस्थेच्या अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला.
    सारथी च्या वतीने आवाहन करण्यात येते की,
    छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, तसेच त्यांच्या कर्तुत्वाचा जिवंत वारसा असलेल्या गडकिल्ल्यांचे आपण सर्वांनी पावित्र्य जपले पाहिजे.
    गड किल्ले स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी असल्याने, महाराजांच्या किल्ल्यांना भेटी देताना सोबत नेलेल्या प्लास्टिकच्या सर्व बाटल्या, काचेच्या बाटल्या व इतर प्लास्टिकचे सर्व साहित्य, गड उतरताना सोबत घेऊन यावे. तसेच शिल्लक राहिलेले अन्न व जेवणासाठी वापरलेली सर्व प्लास्टिकच्या ताट, वाट्या, ग्लास इत्यादी व इतर सर्व साहित्य, गड उतरताना आपल्यासोबत खाली आणावे.
    त्यामुळे गडावर स्वच्छता राहील व प्रत्येक जण "गड स्वच्छता अभियानात" आपले योगदान देऊ शकतो.
    #सारथी #Sarthi #GovernmentScheme #Maharashtra #SardarHirojiIndalkar #Fort #ChhatrapatiShivajiMaharaj #Youth #YouthSchemes #SkillDevelopment
    मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी २५ जून २०१८ रोजी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथी संस्था कंपनी कायद्यानुसार स्थापन झाली. ११ फेब्रुवारी २०१८ पासून संस्थेने प्रत्यक्ष कामकाजाला सुरूवात केली. संस्थेबाबतची विविध माहिती आपण आमच्या चॅनेलद्वारे पाहू शकता.
    संकेतस्थळ - sarthi-maharas...
    युट्युब चॅनेल - / @sarthipune1789
    सारथी ॲप - play.google.co...

Комментарии •