धाकटी बहीण हा अरुण सरनाईक यांनी या चित्रपटात काम केले आहे.तरी धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना हे गाणे पहाण्यासाठी व ऐकण्यासाठी लवकरात लवकर दाखविण्यात यावा ही विनंती.
अशी गाणी पुन्हा होणे नाही, काय ते स्वर, संगीत आणि साधेपणा, कुठेच भंपकपणा नाही, आपणच आपली भाषा जपली पाहिजे. पुढच्या पिढीचा आपणच आदर्श आहोत. मी हे गाणं लहानपणी माझ्या बाबांच्या टप्रेकॉर्डर मधे एकायचो, अजूनही तेवढच बहारदार आहे. खुप खुप धन्यवाद आशाताई, सुधीर फडके.🙏🏻🙏🏻
जगदीश खेबुडकर, यांचे बोल, आशाताई आणि सुधीर फडकेंचा सुरेल आवाज , सुधीर फडके यांचेच सुमधुर संगीत. धाकटी बहीण (१९७०) या चित्रपटातील हे द्वंद्व गीत अजूनही कान तृप्त करते. हे गीत म्हणजे रसिकांसाठी एक सुरेल मेजवानीच आहे. मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे . ☺️
जुनं ते सोनं का म्हणतात ,तर ते हे आहे! कारण तेव्हा,गीतकार जेव्हडा ताकदीचा होता तेव्हढाच ताकदीचा संगीतकार होता आणि जेव्हडा ताकदीचा संगीतकार होता,तेव्हढ्याच ताकतीचा गायक होता म्हणून तर ते गाणं अजरामर व्हायचं!
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना.. शब्द रूप आले मुक्या भावनांना तुझ्या जीवनी नीतीची जाग आली... माळरानीया प्रितीची बाग आली... सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा... शब्द रूप आले मुक्या भावनांना... धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना.. तुझा शब्द की थेंब हा अमृताचा... तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा... उगा लाजण्याचा किती हा बहाणा.. शब्दरूप आले मुक्या भावनांना.. धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना.. चिरंजीव होई कथा मिलनाची... तृषा वाढते तृप्त हया लोचनाची... युगांचे मिळावे रूप या क्षणांना... शब्दरूप आले मुक्या भावनांना धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना...
जगदीश खेबूडकर यांनी गावरान मेवा या कार्यक्रमात या गाण्याची आठवण सांगताना म्हटले होते की... बाबूजीनी अगोदर चाल तयार केली व त्या वर मला गीत लिहण्यास सांगितले..... धन्य ते गीतकार धन्य ते संगीतकार... धन्य ते गायक..... व आम्ही...
आज ही माती ओली झाली की तोच सुगंध येतो की कुठे बदलला आहे आणि जिथे जिथे निसर्ग राहिलाय तो पण तर तसाच आहे हे सांगते आहे मी त्या प्रमाणे हे गाणे लोकांच्या मनात अमर आहे ❤️
आज जवळ जवळ ४५ वर्षे झाली तरी अजून गाणे चीर तरुण आहे, आशा ताई व बाबूजी अप्रतिम आवाज, जगदीश खेबुडकर यांचे शब्द खूपच अप्रतिम असा त्रिवेणी संगम यावा लागतो तसेच आपले पण भाग्य आहे कि असे चांगले गाणे पाहता येतात
अजरामर राहणार हे गाणं.... खुप अर्थ पूर्ण सुंदर.... आशा ताई चा आणि सुधीर फडके सरांचा आवाजाने अजून बहारदार झालंय.... मराठी गाण्या मध्ये हे गाणं माझं फेव्हरेट...😍😍🥰🥰
गाणे परत परत ऐकावे असे वाटते ठिपकेची रांगोळी सिरीयल मध्ये हेच गाणे डाक्टर भास्कर. व बाबी आत्या ने अप्रतिम अभिनय करून ह्या गाण्यात जिव ओतुन काम करीत. जुने ते सोने याची प्रचिती दिली आहे.
हे गीत खूपच सुमधुर आहे प्रेमातील एक सुंदर वर्णन या गीतातून शिकायला मिळते व पुढील पिढीने सुद्धा हे तसेच टिकून ठेवावे आणि आशाताई व बाबुजी यांनी खूप अप्रतिम गायले आहे त्यांच्या आवाजात खूप मोठी जादू आहे 💑
मराठी चित्रपट संस्कृतीचा हा अनमोल ठेवा आहे अरूण सरनाईक हे मराठी चित्रपट सृष्टीतील अभिजांत कलाकार होते.शालीन सौदर्य,योग्य शब्दकळा, अमृततुल्य स्वरसाज, सौम्य पण उत्कट प्रणय,अप्रतिम लावण्य, आणि ओबडधोबड दगड धोंड्यानी सजलेल्या सह्याद्रीची साथसंगत यांचा सुवर्ण कांचन योग या गीतात साधला आहे. माझ्या मायमराठीची ही अनमोल संपत्ती आहे. टिकवून ठेवली पाहिजे.
Beautiful song, I used to listen to this song in my childhood in Udupi in the west coast of Karnataka. My mother would lean on the transistor every day at some particular time to listen to these classics (moslty aplya awad). This was entirely due to my family's connection with Bombay at an earlier time. I am familiar with all these Marathi beautiful songs due to this. Still so sweet to savour, and absolutely romantic.
मनात अशी हुरहूर दाटून येते की असले गायक-गायिका , अभिनेते- अभिनेत्री आता पाहायला मिळायला मिळणार नाहीत. आमचे भाग्य एवढे थोर की असे उत्तुंग कलाकार व त्यांची अदाकारी आम्ही पाहिली. आभार कुणाचे मानावे,यांचे की परमेश्वराचे ?
अप्रतिम खऱ्या प्रेमाचा अनुभव देणारी आणि प्रेम किती सुंदर असू शकते याची अनुभूती देणारे गाणे सुंदर सुंदर अतिशय सुंदर प्रेम ओरबाडून जबरदस्तीने कधीच मिळवायचे नसते,त्यात असा च हळूवरपणा हवा तरच त्याची गोडी टिकून राहते ,खरे ना?
या सगळ्या जुन्या गाण्यांची एक खासियत होती, इथे सगळे दिग्गज कलाकार एकत्र झालेले होते....काळ पुढे गेला....मग दृष्ट लागावी तसे सारे त्या अटळ मार्गाने निघून गेले आणि आम्ही दुसरी कडे आज ही गाणी ऐकत भिजल्या पापण्या टिपत बसतोय....!! आजच्या या बाजारात तर हे फार जाणवते ....!!
मनाला अतिशय भावणारं हे गीत ऐकून व पाहून समाधान वाटते. सतत ऐकतच व गुणगुणत राहावे असे हे गीत बाबूजींच्या भारदस्त आवाजात व आशाताईंचा मधुर आवाजात ऐकणारा तृप्त होतो. व तृप्षा वाढते , या लोचनांची. अतिशय सुंदर.
भावविश्वात अतिशय अनन्यसाधारण स्थान निर्माण केलेलं गाणं...जुनी गाणी आजकाल फार ऐकली जात नाहीत पण पुढच्या पिढीला देखील ही गाणी ऐकवायला हवीत...हे गाणं ऐकत की कुठे तरी हरवल्या सारखं वाटतं...आजकालच्या गाण्यात ओढ नाहीये
अजरामर कलाकृती .. किती ही टेंशन असले तरी ते कुठल्या कुठे निघून जाते हे कळतच नाही आताच्या विव्हळणाऱ्या गाण्यांपेक्षा हे जुने सुगम गीत आणि संगीत लाखो पटीने भारी आहे.
प्रत्येक जण कधीतरी प्रेमात पडतोच,कधी ते व्यक्त होता येते, तर,कधी ते मनातच दडपले जाते. अशा प्रत्येक व्यक्तीला हे गाणे आपलेच आहे,असे भासते. अजरामर गाण्यांपैकी एक सदाबहार हे गाणे.
अतिशय सुंदर, मधुर गाणं! शब्दांचा मनमुराद वापर केलाय गाण्यात,अशी शब्द संपत्ती लाभलेली मराठी भाषा आपली. शुद्ध प्रेम भावना किती हळुवारपणे मांडलीय, त्या प्रेमात पाझरत जातेय असं वाटतं ऐकताना.मराठीतील सर्वात आवडतं गाणं माझं.♥️♥️♥️
महान गीत, महान संगीत, महान गायक ! इंग्लिश माध्यमाच्या भ्रामक आकर्षणामुळे आपण आपल्याच पुढच्या पिढीला या गीतातील शब्दांच्या विलक्षण जादूपासून वंचित ठेवले आहे ! नव्या पिढीला "कोंबडी पळालीआणि तंगडी" असलीच भंगार गाणी म्हणजे मराठी गाणी असं वाटलं तर त्याला जबाबदार आपणच आहोत !! "युगांचे मिळावे रूप या क्षणाला" याचा अर्थ कसा कळणार यांना ??
You are very right sir. It is important to have schooling in mother tongue. Unfortunately the quality of Marathi has deteriorated completely in Marathi schools. If you don't know your mother tongue you will not be able to master other foreign languages. And yes we are responsible for this degradation and deterioration. I feel after 25 years most of the Indian languages will fade out due to invasion of English and at the same time English also will not be perfect. I am writing this reply in English because of the key board on my laptop.
agree with you I am 25 years old and understand each and every word of this song.nirmal pream visay vasana nahi ani mulat prem kay ahe kahil ketaki ne khup sunder sangitlae ahe
मी सद्ध्या 80त प्रवास करत आहे.जुनी मराठी व हिंदी गाणी न चुकता ऐकत आलो आहे.बीपी ,डायाबेटीस ईश्वर ( श्री स्वामी समर्थ) कृपेने आतापर्यंत दूर आहेत.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!
मराठी चित्रपट संस्कृतीचा हा एक अनमोल ठेवा आहे. तो जतन करून ठेवणं आणि पुढच्या पिढीला त्याचा परिचय करून देणं प्रत्येक मराठी जनाचे कर्तव्य आहे. अप्रतिम लावण्य ,सौम्यसा मादक शृंगार, अचूक शब्दकळा, आंणि अत्यंत प्रासादिक संगीत यांना जोड स्वर्गीय बाबुजी आणि आशाताईचा अमृततुल्य स्वरसाज असा अनोखा मेळ या चित्रीकरणात जमला आहे. त्याचा स्वाद न घेणारा मराठी अभागी कोण असेल बरे?
पहिल्या दोन ओळीत पाच शब्द व नंतरच्या दोन ओळीत सहा शब्द यायला हवेत असे दिग्दर्शकांनी सांगितले त्यावर जगदीश खेबुडकरांनी हे सुंदर गीत रचले. धुंदी कळ्यांना (५ शब्द), धुंदी फुलांना (५ शब्द). शब्दरुप आले (६ शब्द) मुक्या भावनांना (६ शब्द). धन्य!
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम एव्हडच आशा दी सुधीर दादा यांच्या बद्दल आणी त्यांनी हे अजरामर गाणे गायले आहे.अणि लिहिले आहे त्यांच्या साठी मनापासून शतश: धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏👍
अप्रतिम.......अप्रतिम.......अप्रतिम किती वेळा ऐकले तरी अवीट. हे गीत म्हणजे जणू प्रेमाची आरती, प्रेम किती सुंदर, किती तरल, किती सुखद असते हेच या गीत सांगते
अत्यंत सुमधुर आणि वेगळ्याच भावविश्वात घेऊन हे गीत. सुसंस्कृतपणा आणि प्रेम यांचा सुरेख संगम या गीतामध्ये व्यक्त झालेला आहे कोणताही आघळपणा,बिभित्स पणा शिवाय सादर केलेलं गे गीत आणि त्याला साजेस असा अभिनय ,वा तोड नाही. लहानपणी उशाला रेडिओ घेवुन हे गीत एकण्याची सवय,तोच आनंद आताही अनुभवतोय. वा अप्रतिम.. दिलीप भोईर. करावे,नेरूळ नवी मुंबई
खरंच खूप सुंदर गाणं आहे मराठी फिल्म लोकप्रिय गाणं मलाही खूप खूप आवडत गाणं आहे.आपण सुंदर काळं अनुभव आहे. रिलेशन अर्थ या गाणं कळत शब्द अर्थ खूप सुंदर आहेत असं संस्कार दर्शवतात प्रेमाचे
हे गीत, संगीत, गायक, संगीतकार होते नाहीत राहतीलच या विश्वात... यात शंकाच नाही . मनाच्या कप्प्यात जागा राहील. , ह्रृदयावर राज्य करतील. कान तृप्त होत राहतील गोडी अवीटच राहील. मनापासून मनाच्या शुध्द पवित्र निर्मळ प्रेमाचा मखमली स्पर्श करून हळुवार फुंकर मारून मन शांत होईल यात शंकाच नाही. किती कौतुकास्पद अफलातुन शब्द रचना..❤
Hi This is my all time favorite song A part from that my special child who is turn 14 he is Listening this song while slipping at least 10 time a day so you can imagine how much he love this song Also this song make him calm for coupla of hours
Situation is that husband comes out of alcohol addiction and wife is expressing her happiness as both of them are in immense love. Lyrics go with the situation very beautifully and very subtly. Its a masterpiece.
कर्णसुख अथवा स्वर्गसुख म्हणतात ते हेच असावे. बाबुजींचा संगीतसाज चढवलेले हे अविस्मरणीय गीत पन्नास वर्षे उलटून गेली तरीही रसिकप्रेक्षकांच्या मनात अजूनही घर करुन आहे. गीतामधिल शब्दांना आशाताईंने आणि स्वतः बाबुजींनी भावनांचे अप्रतिम कोंदण निर्माण करुन दिले आहे. सहकलाकारांचा अभिनय त्या दोघांमध्ये खरोखरच प्रेम आहे की काय, असे वाटण्याइतपत नैसर्गिक आहे. बाबुजी आणि अरुण सरनाईक हे दोघेही आता या जगात नाहीत, तर अनुपमाजी अनेक दशकांपासून अमेरिकेतील शिकागो येथे स्थायिक झाल्या आहेत!
संगीतकार बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांची ही एक अजोड कलाकृती आहे. या गीताची शब्द रचना करणारे गीतकार,कवी जगदीश खेबुडकर हे एक प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व होतं.
अशी गाणी ऐकली की मन भरून जाते आता मी 65 वर्षाचा आहे मनाला वेगळी उभारी येते आणि जुने दिवस आठवतात
He khara aahe
सहमत
अगदी बरोबर, मी 59 वर्षाचा आहे, नेहमी हे गाणं ऐकताना जुन्या आठवणीत रमून जातो🙏
धाकटी बहीण हा अरुण सरनाईक यांनी या चित्रपटात काम केले आहे.तरी धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना हे गाणे पहाण्यासाठी व ऐकण्यासाठी लवकरात लवकर दाखविण्यात यावा ही विनंती.
अशी गाणी पुन्हा होणे नाही, काय ते स्वर, संगीत आणि साधेपणा, कुठेच भंपकपणा नाही, आपणच आपली भाषा जपली पाहिजे. पुढच्या पिढीचा आपणच आदर्श आहोत. मी हे गाणं लहानपणी माझ्या बाबांच्या टप्रेकॉर्डर मधे एकायचो, अजूनही तेवढच बहारदार आहे. खुप खुप धन्यवाद आशाताई, सुधीर फडके.🙏🏻🙏🏻
अगदी खरे,छान, आवडले
जिवंत नैसर्गिक अभिनय असलेला मराठी अष्टपैलू अभिनेता फक्त एकच "अरुण सरनाईक" असा कलाकार पुन्हा होणे नाही.
माझे खास मित्र होते अरुण सरनाईक
@@surendraketkar1035abhinetri Anupama Kulkarni aahe
देखणं व्यक्तिमत्त्व आणि कमालीचा अभिनय. सिंहासन ह्या त्यांच्या सिनेमाला तोड नाही.
बॉलिवूड मधील जुनी गाणी जशी अजरामर आहेत त्या गाण्यांच्या तोडीस तोड असं हे मराठी तील अजरामर गीत आहे,सहमत असेल तर लाईक करा.
Bollywood बरोबर बोरोबरी का? उर्दू वर्ग मोठ आहे आणि उर्दू तील पिक्चर ही.. आपण आपली भाषा बघू.
शब्दात वर्णन असंभव.
Better written than any old or new Bollywood song.
त्यावेळी कॅमेरा आणी टेकनिकॅली मराठी सिनेमा खुप खुप धन्यवाद असेच आशीर्वाद राहू द्या सगळ्या मराठी चित्रपत सृष्टी वर
Man shant shant shant.
जगदीश खेबुडकर, यांचे बोल, आशाताई आणि सुधीर फडकेंचा सुरेल आवाज , सुधीर फडके यांचेच सुमधुर संगीत. धाकटी बहीण (१९७०) या चित्रपटातील हे द्वंद्व गीत अजूनही कान तृप्त करते. हे गीत म्हणजे रसिकांसाठी एक सुरेल मेजवानीच आहे. मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे . ☺️
।।
अरे भाऊ या ज्ञानेश्वरीतील माऊलीच्या ओव्या आहेत सिनेमाचं गाण नाही
@@pravinwaghmare3284😮😮😮
Chitra pata baddal mahiti dilya baddal khup khup danya vvad.
जुनं ते सोनं का म्हणतात ,तर ते हे आहे!
कारण तेव्हा,गीतकार जेव्हडा ताकदीचा होता तेव्हढाच ताकदीचा संगीतकार होता आणि जेव्हडा ताकदीचा संगीतकार होता,तेव्हढ्याच ताकतीचा गायक होता म्हणून तर ते गाणं अजरामर व्हायचं!
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना..
शब्द रूप आले मुक्या भावनांना
तुझ्या जीवनी नीतीची जाग आली...
माळरानीया प्रितीची बाग आली...
सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा...
शब्द रूप आले मुक्या भावनांना...
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना..
तुझा शब्द की थेंब हा अमृताचा...
तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा...
उगा लाजण्याचा किती हा बहाणा..
शब्दरूप आले मुक्या भावनांना..
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना..
चिरंजीव होई कथा मिलनाची...
तृषा वाढते तृप्त हया लोचनाची...
युगांचे मिळावे रूप या क्षणांना...
शब्दरूप आले मुक्या भावनांना
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना...
Thanks for the lyrics.
Khupach sunder
This is what meditation speechless about all of them those who have been in song
Thanq very much for those beautiful lyrics. 😍
@@vasudhakamath3037 wc.. 🎶
जगदीश खेबूडकर यांनी गावरान मेवा या कार्यक्रमात या गाण्याची आठवण सांगताना म्हटले होते की... बाबूजीनी अगोदर चाल तयार केली व त्या वर मला गीत लिहण्यास सांगितले..... धन्य ते गीतकार धन्य ते संगीतकार... धन्य ते गायक..... व आम्ही...
निःशब्द 🙏
Very nice
@prachideshpanrealde9431
@@prachideshpande9431really great people! 🎉❤
Jagdish khebudkar wad most talented song writer! Superstar! No competition! 🎉🎉🎉❤❤ greatest!
अजरामर कलाकृती
पृथ्वीवर मराठी भाषेच अस्तित्व असे पर्यंत हे गाण ऐकल जाईल
प्रत्येक वेळी अस वाटत एकदम ताजं आहे
आज आणखी मागच्या पेक्षा कोर करकरीत तेवढंच मनाला भिडणारं
Mi at a time he gaan 10,12 aitech joprynt Maan bhart nahi toprynt 💞❤️😘
काळ बदलला तरीही मातीचा सुगंध आणि तो निसर्ग तोच आहे जसे हे गाणे अजूनही अमर आहे ❤️❤️
नाही गं ताई, माणूस निसर्ग ओरबाडत चालला आहे. विकासाच्या खोट्या कल्पने मागे धावत. आता , हाच recorded निसर्ग पहायचा
आताच काळ खूप बेकार आलाय
Nhi sarv change zal konkant pn amcha ata road mule jhad todlnai sarv kahich nhi rahil ata pahilya sarkh
😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😢
आज ही माती ओली झाली की तोच सुगंध येतो की कुठे बदलला आहे आणि जिथे जिथे निसर्ग राहिलाय तो पण तर तसाच आहे हे सांगते आहे मी त्या प्रमाणे हे गाणे लोकांच्या मनात अमर आहे ❤️
*माझं सध्या 22 वय आहे पण मला जुनी गाणी खूप आवडतात गाणं आयकल कि मन प्रसन्न होत*
24
24
एकच नंबर
Ale wa kitti mujja bala 😂😅
@@paragkulkarni5003 thank you आजोबा 😂😂
आज जवळ जवळ ४५ वर्षे झाली तरी अजून गाणे चीर तरुण आहे, आशा ताई व बाबूजी अप्रतिम आवाज, जगदीश खेबुडकर यांचे शब्द खूपच अप्रतिम असा त्रिवेणी संगम यावा लागतो तसेच आपले पण भाग्य आहे कि असे चांगले गाणे पाहता येतात
Sagle comment wachle,tasech mazya manat pan aale,tan man mohrun gele ,pahun aani aikun,
अशी सुमधुर गीते मराठी साहित्याचाही आत्मा आहे , मराठीचे वैभव आहे ,
26.03.24
आज 2020 मध्ये कोण ऐकत असेल हे गाणे तर लाईक करा.....😊
27 ऑगस्ट 2020
आठवडयातून एकदा तरी मी ऐकतो 😊🙏
Hoi adun madun
@@deeptishinde6711 शब्द रचना व संगीत मंत्र मुग्ध करतात 😊🙏
Mi akto old is gold💯👍
मोठ अविस्मरणीय गाणे.. हे शूटिंग आंबा घाटातील आहे.. इथून दोन्ही बाजुला दरी आहे....
सुमारे ५० वर्षांपुर्वी अनुपमा ह्या आमच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहण्या म्हणुन आल्याचे चांगले आठवते (एच ए हायस्कूल पिंपरी ) 👍👍👍👌
खूपच छान गाणं. माझं आवडतं गाणं, हे गाणंही म्हणते मी. प्रयत्न करते.डि पी राजाध्यक्षजी,मनःपूर्वक धन्यवाद हे छान गाणं अपलोड केल्याबद्दल.🎉 - सौ. मेघना लिमये.
आजही जुन्या गाण्याने मन भरून येते ,,जीवनभर हे स्वर कायमस्वरूपी स्पर्श करत राहील,हे गीत ऐकलय शिवाय एक दिवसही जात नाही,जीवन बदलून टाकणारे स्वर💐
दररोज एकदा तरी मी ऐकतेच हे गाण मला खूप आवडते
किती गोड आवाज, किती छान expression. अरुण सरनाईक जबरदस्त अभिनय
एक पिढी या भावगीतांवर जगली, त्यांच्या स्वप्नांना या गाण्यांनी पंख दिले.
हे ऋण नाही फेडता येणार.
केवळ अवीट
हिंदीत जसे ' लग जा गले" फेमस आहे अगदी तसेच मराठी त" धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना" या गाण्याचे स्थान आहे 👌👌
अरुण. सरनाईक. अनुपमा .चांगलीच. जोङी.आहे.सुधीर.फङके.आशा.भोसले.आवाज. छानच. आहे.उतम.संगीत.
अजरामर राहणार हे गाणं.... खुप अर्थ पूर्ण सुंदर.... आशा ताई चा आणि सुधीर फडके सरांचा आवाजाने अजून बहारदार झालंय.... मराठी गाण्या मध्ये हे गाणं माझं फेव्हरेट...😍😍🥰🥰
१०० टक्के खर आहे.
Bap rey😂
Kharay
तृप्त.. शांती... आणि ते बालपण... आणि तो रेडियो. 🙏
Soo nice song & evergreen...💚 प्रत्येक वेळी ऐकताना नव्याने ऐकल्या सारखं वाटतं हीच त्या गाण्याची खासियत आहे...❤️😘 I love this song 😍
Love This Song
Thankyou bapu ji man premane trupti jhale
माझे सर्वात आवडते मराठी गाणे
अगदी खरं आहे हे 👌👌👌
Ase geet aaj hone nahi
मी.82.वर्षांचा.भा.रा.तांबे.ग.दि.माडगूळकर.पी.सावळाराम. यांची.गाणी.ऐकतच.मी.माझे.आयुष्य. आनंदात.घालवीत.आहे.त्या.साठी.मी.मराठी.हिंदी.कारवा.घेतला.
किती छान
यापेक्षा अवीट आनंद काय असू शकतो🎉😅
.. You will live 100 more years!
काय ही शब्द रचना मनाला स्तंध केली . मला अजून जीवनात देव दिसतो
💑तुझा शब्द की थेंब हा अमृताचा..........💏.तुझा स्पर्श की भास चांदण्याचा......जबरदस्त काव्य.....आशाताई आणि सुधीर फडके साहेबांना सलाम..👍👋👏
Aprtim
Euuuuuuuuu
Bhau jagdish khebudkar awasam geetkar
Exactly
चिंरंजीव होई कथा मिलनाची,
तृषा वाढते तृप्त या लोचनांची
काय शब्द आहेत ! अप्रतिम
गाणे परत परत ऐकावे असे वाटते ठिपकेची रांगोळी सिरीयल मध्ये हेच गाणे डाक्टर भास्कर. व बाबी आत्या ने अप्रतिम अभिनय करून ह्या गाण्यात जिव ओतुन काम करीत. जुने ते सोने याची प्रचिती दिली आहे.
गीतकार खेबुडकरांची शब्दकळा, संगीतकार मोघेंचे सुरेल संगीत. सुधीरजी व आशाजींचा स्वर्गीय सुस्वर. या त्रिवेणीसंगमामुळे हे गीत अभिजात आहे.
किती वेळा ऐकलीत ही गाणी कुणास ठाऊक. तरी धुंदी उतरत नाही......
खुपच अप्रतिम गाणं. .. कितीही ऐकलं तरी परत परत ऐकावंस वाटतं 👌👌
हे गीत खूपच सुमधुर आहे प्रेमातील एक सुंदर वर्णन
या गीतातून शिकायला मिळते व पुढील पिढीने सुद्धा हे तसेच टिकून ठेवावे आणि आशाताई व बाबुजी यांनी खूप अप्रतिम गायले आहे त्यांच्या आवाजात खूप मोठी जादू आहे 💑
Agdi barobar
Very true Sister!
तुम्ही शुक्ला असून पण हे मराठी गाणं ऐकता
@@deepakkhandare shukla maharashtrian pan aahet mazi nanand aahe shukla
@@deepakkhandare मी मराठी ब्राह्मण आहे
अति सुंदर गान. उत्तम तैसेच सहज अभिनय अनुपमा ❤अरुण सरनाईक या दिगज कलाकाराचा. आपनस तरूण करणरा
मराठी चित्रपट संस्कृतीचा हा अनमोल ठेवा आहे
अरूण सरनाईक हे मराठी चित्रपट सृष्टीतील अभिजांत कलाकार होते.शालीन सौदर्य,योग्य शब्दकळा, अमृततुल्य स्वरसाज, सौम्य पण उत्कट प्रणय,अप्रतिम लावण्य, आणि ओबडधोबड दगड धोंड्यानी सजलेल्या सह्याद्रीची साथसंगत यांचा सुवर्ण कांचन योग या गीतात साधला आहे. माझ्या मायमराठीची ही अनमोल संपत्ती आहे. टिकवून ठेवली पाहिजे.
५० वर्षे झाली पण गाणे आजून सुधा एेकून मनाला छान वाटते.😊
Ii 8
Iii
Iiuifu
K6
K6
Beautiful song, I used to listen to this song in my childhood in Udupi in the west coast of Karnataka. My mother would lean on the transistor every day at some particular time to listen to these classics (moslty aplya awad). This was entirely due to my family's connection with Bombay at an earlier time. I am familiar with all these Marathi beautiful songs due to this. Still so sweet to savour, and absolutely romantic.
Good ❤️ Marathi old songs are treasure !!!
Gone are those days now and now even Marathi songs have BollyWeed impressions in most of the songs !!!
Veery veeery sweet romantic old classic song i hope this was sung by Bapuji Sudhir phadke and female singer if am not mistaken is it Lata Didi?
It really carries my past days in the childhood we use watch this song in Doordarshan chitrageet
@@manishamre7911 आशा भोसले
Same to me my mother also used to be listen Apli awad
मनात अशी हुरहूर दाटून येते की असले गायक-गायिका , अभिनेते- अभिनेत्री आता पाहायला मिळायला मिळणार नाहीत. आमचे भाग्य एवढे थोर की असे उत्तुंग कलाकार व त्यांची अदाकारी आम्ही पाहिली. आभार कुणाचे मानावे,यांचे की परमेश्वराचे ?
हे गाणं ऐकलं की वेगळीच धुंदी आल्यासारखी वाटते आणि पुन्हा नव्याने प्रेमात पडल्याची भावना जागते
1.27 Am ला हे गाणं ऐकताना अंगावर रोमचं उभे राहिला....missing old days❤❤❤❤& missing someone....😒😒
अप्रतिम खऱ्या प्रेमाचा अनुभव देणारी आणि प्रेम किती सुंदर असू शकते याची अनुभूती देणारे गाणे सुंदर सुंदर अतिशय सुंदर प्रेम ओरबाडून जबरदस्तीने कधीच मिळवायचे नसते,त्यात असा च हळूवरपणा हवा तरच त्याची गोडी टिकून राहते ,खरे ना?
100% true
Ketaki Oak बरोबर बोललीस केतकी!
very true
t
Bilkul sahi!
Most Lovable Song Between Arun sarnaik & Anupamaji very nice expressions
Thank you for reminding Anupamaji
@@mandar655
. पर
अनुपमा looks stunning Beauty ! Arun सरनाईक looks typical south actor !!!
पचास साल पहले बना यह गाना अभी भी ऊतनाही फ्रेश है और ऊतना ही आनंद और प्रेशनेस देता है👍👌
खूपच गोड गीत " एकांत स्थळी रात्रीच्या धुंद चांदण्यात बसून ऐकावे वाटतात
खरं आहे ही गाणी अशा वातावरणात च ऐकाविशी वाटतात
या सगळ्या जुन्या गाण्यांची एक खासियत होती, इथे सगळे दिग्गज कलाकार एकत्र झालेले होते....काळ पुढे गेला....मग दृष्ट लागावी तसे सारे त्या अटळ मार्गाने निघून गेले आणि आम्ही दुसरी कडे आज ही गाणी ऐकत भिजल्या पापण्या टिपत बसतोय....!! आजच्या या बाजारात तर हे फार जाणवते ....!!
जगदीश खेबुडकर एक यशस्वी गितकार .... अप्रतिम रचना..... हृदयस्पर्शी असे हे गित.....❤❤
मनाला अतिशय भावणारं हे गीत ऐकून व पाहून समाधान वाटते. सतत ऐकतच व गुणगुणत राहावे असे हे गीत बाबूजींच्या भारदस्त आवाजात व आशाताईंचा मधुर आवाजात ऐकणारा तृप्त होतो. व तृप्षा वाढते , या लोचनांची. अतिशय सुंदर.
भावविश्वात अतिशय अनन्यसाधारण स्थान निर्माण केलेलं गाणं...जुनी गाणी आजकाल फार ऐकली जात नाहीत पण पुढच्या पिढीला देखील ही गाणी ऐकवायला हवीत...हे गाणं ऐकत की कुठे तरी हरवल्या सारखं वाटतं...आजकालच्या गाण्यात ओढ नाहीये
हो मी जुनी गाणी ऐकतोय...मला खुप आवडतात...खूप सुंदर आहेत.... अर्थ पूर्ण....
असली गाणी खूप दुर्मिळ आहेत...काही दिवसांनी ऐकायला मिळणार नाहीत...संग्रहित करून ठेवायला हवीत....
अगदी खर
अजरामर कलाकृती .. किती ही टेंशन असले तरी ते कुठल्या कुठे निघून जाते हे कळतच नाही आताच्या विव्हळणाऱ्या गाण्यांपेक्षा हे जुने सुगम गीत आणि संगीत लाखो पटीने भारी आहे.
प्रत्येक जण कधीतरी प्रेमात पडतोच,कधी ते व्यक्त होता येते, तर,कधी ते मनातच दडपले जाते.
अशा प्रत्येक व्यक्तीला हे गाणे आपलेच आहे,असे भासते.
अजरामर गाण्यांपैकी एक सदाबहार हे गाणे.
अतिशय सुंदर, मधुर गाणं! शब्दांचा मनमुराद वापर केलाय गाण्यात,अशी शब्द संपत्ती लाभलेली मराठी भाषा आपली. शुद्ध प्रेम भावना किती हळुवारपणे मांडलीय, त्या प्रेमात पाझरत जातेय असं वाटतं ऐकताना.मराठीतील सर्वात आवडतं गाणं माझं.♥️♥️♥️
असं वाटतं मध टपकतोय कानात ...😍😍 खरंच अप्रतिम....
Akhand... Apratim...
Ho kharch
मनाला शांत वाटतं अशी गाणी ऐकताना
खुप शांत , वाटतं हे गाणं ऐकून,,सगळ्या भावना ह्या किती साध्या शब्दात व्यक्त केल्या.. ❤️
आशाताईंचा सुमधुर आवाज व बाबूजींची साथ .यामुळे गाणे ईतके अप्रतिम झाले की कितीही वेळा ऐकले तरि छानच वाटते .👌👌👌👍👍💚💛💜💗
🌺👍🌺
अप्रतीम गाणे , अप्रतीम गीतकार संगीतकार आणि कलाकार
One of my favourite song ❤
अतिशय सुंदर.या गाण्याची जन्मकथा ऐकली आणि नंतर गाणं ऐकलं.
महान गीत, महान संगीत, महान गायक ! इंग्लिश माध्यमाच्या भ्रामक आकर्षणामुळे आपण आपल्याच पुढच्या पिढीला या गीतातील शब्दांच्या विलक्षण जादूपासून वंचित ठेवले आहे ! नव्या पिढीला "कोंबडी पळालीआणि तंगडी" असलीच भंगार गाणी म्हणजे मराठी गाणी असं वाटलं तर त्याला जबाबदार आपणच आहोत !! "युगांचे मिळावे रूप या क्षणाला" याचा अर्थ कसा कळणार यांना ??
Harshavardhan Khare नेमकी टिप्पणी
Harshavardhan Khare , अगदी खरे बोलात
Tithe dagara
You are very right sir. It is important to have schooling in mother tongue. Unfortunately the quality of Marathi has deteriorated completely in Marathi schools. If you don't know your mother tongue you will not be able to master other foreign languages. And yes we are responsible for this degradation and deterioration. I feel after 25 years most of the Indian languages will fade out due to invasion of English and at the same time English also will not be perfect. I am writing this reply in English because of the key board on my laptop.
agree with you I am 25 years old and understand each and every word of this song.nirmal pream visay vasana nahi ani mulat prem kay ahe kahil ketaki ne khup sunder sangitlae ahe
भावस्पर्शी, सुमधुर आणि मनाला तृप्ती देणारे हळूवार गाणे. ब-याच वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटणारे अवीट गोडीचे गाणे.
बाबूजी फक्त बाबूजी ! विनम्र अभिवादन ! बाबूजी अनमोल ठेवा दिला आहे आम्हाला आणि तुम्ही या आवाजाच्या रूपाने आजही सतत इथेच आहात आणि कायम रहाल !
मी सद्ध्या 80त प्रवास करत आहे.जुनी मराठी व हिंदी गाणी न चुकता ऐकत आलो आहे.बीपी ,डायाबेटीस ईश्वर ( श्री स्वामी समर्थ) कृपेने आतापर्यंत दूर आहेत.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!
मराठी चित्रपट संस्कृतीचा हा एक अनमोल ठेवा आहे. तो जतन करून ठेवणं आणि पुढच्या पिढीला त्याचा परिचय करून देणं प्रत्येक मराठी जनाचे कर्तव्य आहे. अप्रतिम लावण्य ,सौम्यसा मादक शृंगार, अचूक शब्दकळा, आंणि अत्यंत प्रासादिक संगीत यांना जोड स्वर्गीय बाबुजी आणि आशाताईचा अमृततुल्य स्वरसाज असा अनोखा मेळ या चित्रीकरणात जमला आहे. त्याचा स्वाद न घेणारा मराठी अभागी कोण असेल बरे?
ही गाणी ऐकून जुन्या काळातील गोष्टींची आठवणी जाग्या झाल्या. बालपण डोळयासमोरून तरळून गेले. खूप छान गाणे आहे. 👌👍😍
true
❤
या गाण्याची कितीही तारीफ केली तरी ती कमीच आहे. गीतकार संगीतकार व गायक यांच्या अजोड मेहनतीचं हे फळ आहे.
चिरंजीव होई कथा मिलनाची,
तृषा वाढते तृप्त या लोचनांची ......
अप्रतिम शब्द !!!
मराठी सिनेसृष्टीतील अतिशय अती लोभस व निरागस चेहरा .मनाला भावणारा अभिनय .हे गीत नेहमी ऐकतो.फारच आवडतं .
Arun Sarnaik.... excellent
Mazya Avadichya Gany Paiki Apteim Gane . Khebudkar sir Sudhir Phadke sir Sadar Pranam😊
पहिल्या दोन ओळीत पाच शब्द व नंतरच्या दोन ओळीत सहा शब्द यायला हवेत असे दिग्दर्शकांनी सांगितले त्यावर जगदीश खेबुडकरांनी हे सुंदर गीत रचले. धुंदी कळ्यांना (५ शब्द), धुंदी फुलांना (५ शब्द). शब्दरुप आले (६ शब्द) मुक्या भावनांना (६ शब्द). धन्य!
Super song
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम एव्हडच आशा दी सुधीर दादा यांच्या बद्दल आणी त्यांनी हे अजरामर गाणे गायले आहे.अणि लिहिले आहे त्यांच्या साठी मनापासून शतश: धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏👍
अप्रतिम.......अप्रतिम.......अप्रतिम किती वेळा ऐकले तरी अवीट. हे गीत म्हणजे जणू प्रेमाची आरती, प्रेम किती सुंदर, किती तरल, किती सुखद असते हेच या गीत सांगते
आमचया लग्नाचं cd मध्ये आहे
सर्व गानी खुप अप्रतिम आह्रेत.
अशी गनि आइकुन मन प्रफ्फुलित आन्नंदी होते.
अप्रतिम् ❤❤❤
मराठी अतिशय उत्तम संगीत आहे . गाणं अर्थ एक स्त्री बद्दल सुंदर वर्णन प्रेम खरं ❤😊
आजच्या काळात अशे गाणे बनतं नाहीत.
पण जेव्हा केव्हा हे अशे जुने गाणे ऐकले की मन अगदी प्रसन्न होते 👌🏻❤️
अत्यंत सुमधुर आणि वेगळ्याच भावविश्वात घेऊन हे गीत.
सुसंस्कृतपणा आणि प्रेम यांचा सुरेख संगम या गीतामध्ये व्यक्त झालेला आहे
कोणताही आघळपणा,बिभित्स पणा शिवाय सादर केलेलं गे गीत आणि त्याला
साजेस असा अभिनय ,वा तोड नाही.
लहानपणी उशाला रेडिओ घेवुन हे गीत एकण्याची सवय,तोच आनंद आताही
अनुभवतोय. वा अप्रतिम..
दिलीप भोईर.
करावे,नेरूळ नवी मुंबई
मी रोज ऐकतो ..राग यमन वर आधारित हे गाणं .आयुष्याची सुखाची सोबत
एक सुंदर मनोहर असे अजरामर गीत
दीवस भरात एकदा तरी हे गीत मी ऐकतो
बर का इतके आवडते गीत आहे हे माज!
खरंच खूप सुंदर गाणं आहे मराठी फिल्म लोकप्रिय गाणं मलाही खूप खूप आवडत गाणं आहे.आपण सुंदर काळं अनुभव आहे. रिलेशन अर्थ या गाणं कळत शब्द अर्थ खूप सुंदर आहेत असं संस्कार दर्शवतात प्रेमाचे
मनाला प्रसन्न करणारं गाणं! आठवणी किती अनमोल व रमणीय असतात हे या गाण्यावरून कळते.
खरे सुपर स्टार अरुण सरनाईक आजही मनात आहेत
खरंच जुन्या गाण्यांचा काळ जागा होतोय मी स्वतः आपली आवड चा सांगली आकाशवाणी केंद्रा वरून हे गाणे नेहमी ऐकत होतो.
हे गीत, संगीत, गायक, संगीतकार होते नाहीत राहतीलच या विश्वात... यात शंकाच नाही . मनाच्या कप्प्यात जागा राहील. , ह्रृदयावर राज्य करतील. कान तृप्त होत राहतील गोडी अवीटच राहील. मनापासून मनाच्या शुध्द पवित्र निर्मळ प्रेमाचा मखमली स्पर्श करून हळुवार फुंकर मारून मन शांत होईल यात शंकाच नाही. किती कौतुकास्पद अफलातुन शब्द रचना..❤
खूपदा ऐकून ही पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते....
बाबूजीनचा आवाज ऐकत रहावा असे वाटते.
ruclips.net/video/HZ854FaW4kg/видео.html
Extremely melodious song... 👍 Those who do not understand Marathi can also feel the heart touching melody... Wah.. Wah...
बो सरस बात ❤️
These songs have so much feelings need not know language.
👌👌👌👌👌👌👌
उगालाजण्याचा कितिहा बहाणा
कधीच कंटाळा न येणारे गाण खूप छान आसे गीत पुन्हा होणार नाही
Hi
This is my all time favorite song
A part from that my special child who is turn 14 he is
Listening this song while slipping at least 10 time a day so you can imagine how much he love this song
Also this song make him calm for coupla of hours
Situation is that husband comes out of alcohol addiction and wife is expressing her happiness as both of them are in immense love. Lyrics go with the situation very beautifully and very subtly. Its a masterpiece.
प्रचंड गोड चाल, कुठेही कर्कश पणा नाही. मनाला शांत करणार गाणं
खूप छान आहे हे गीत आपलं जुन्या आठवणी जाग्या झाल्या खूप छान
गायक- सुधीर फडके...गीतकार- जगदीश खेबुडकर..
खूपच मनमोहक आणि विलोभनीय गीत..!!
दोघेही *कोल्हापूरचे सुवर्ण कलारत्न*!!
फारच सुंदर युगल गीत अप्रतिम आवाज बाबूजी आणि लताजी यांचा
ruclips.net/video/HZ854FaW4kg/видео.html
बाबूजी आणि आशाबाई
खुप सुंदर गाणे , ५० वर्षे झाली तरी आजही हे गाणे ऐकत रहावे असे वाटते .
माझ्या जीवनातील अतिशय मधुर,मंजुळ व प्रेमी युवा गीत.
कर्णसुख अथवा स्वर्गसुख म्हणतात ते हेच असावे. बाबुजींचा संगीतसाज चढवलेले हे अविस्मरणीय गीत पन्नास वर्षे उलटून गेली तरीही रसिकप्रेक्षकांच्या मनात अजूनही घर करुन आहे. गीतामधिल शब्दांना आशाताईंने आणि स्वतः बाबुजींनी भावनांचे अप्रतिम कोंदण निर्माण करुन दिले आहे. सहकलाकारांचा अभिनय त्या दोघांमध्ये खरोखरच प्रेम आहे की काय, असे वाटण्याइतपत नैसर्गिक आहे. बाबुजी आणि अरुण सरनाईक हे दोघेही आता या जगात नाहीत, तर अनुपमाजी अनेक दशकांपासून अमेरिकेतील शिकागो येथे स्थायिक झाल्या आहेत!
या गाण्याची धुंदी कधीच कमी होणार नाही
कित्ती सुंदर रचना आहे, गायकी अप्रतिम 👌🏻👍🏻
अरूण. सरनाईक. अनुपमा.चांगलीच. जोङी.आहे.सुधीर. फङके.आशा.भोसले.आवाज.सुदर.आहे.उतम.संगीत. उत्तम. दिग्दर्शक
I don't speak this language, but I absolutely love this song!
Great...... Really best song.
really, music has no boundaries
A true music does not need any boundryof lanaguage,
You can listen many other great duets by these two great marathi singers. Well, they are not only marathi, their fanbase is worldwide
खूप सुंदर गाणे मला फार आवडते
संगीतकार बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांची ही एक अजोड कलाकृती आहे. या गीताची शब्द रचना करणारे गीतकार,कवी जगदीश खेबुडकर हे एक प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व होतं.
गाणे अमुचे छान!!
अविट अप्रतिम सुरेख गुलाबी गायले आहे
शाम कुलकर्णी, अहमदनगर
वर्णनाला शब्द नाहीत. अजरामर गाणं. लाख वेळा ऐकलं तरी मनाचं समाधान होणार नाही.
Kharch aahe 👍
My all time favourite song. Really lovely for listening a lyric.
या गाण्यातचं एक धुंदी आहे, अप्रतिम 👌 👌👌😍😍😍😍
He gane aikun junya athvani jagya hotat
Khup God gane ahet
Love the song foreever❤🎉
अरूण दाते यांच्या आवाजाला कोणती ऊपमा ध्यानी. अप्रतिम, सोनेरी ,मधाळ ,मुलायम.❤❤❤❤