नमूना सूक्ष्मपाठ चेतक बदल 2024-25 -प्रा. सुनंदा देशमुख
HTML-код
- Опубликовано: 29 окт 2024
- भास्करराव कर्वे अध्यापक विद्यालयडी. एल. एड. प्रथम वर्ष (2024 -25 )नमूना पाठ सूक्ष्मपाठ कौशल्य : चेतक बदल
भास्करराव कर्वे अध्यापक विद्यालय
पाठ शिक्षक :अध्यापकाचार्या : सौ. सुनंदा देशमुख
इयत्ता : तिसरी , विषय परिसर अभ्यास घटक :अबब किती प्रकारचे प्राणी उपघटक : प्राण्यांची वैशिष्ट्ये
चेतक’ म्हणजेच ‘स्टिम्यूलस’ म्हणजेच उत्तेजन देणारी गोष्ट- हे अध्ययनाचे प्रेरणास्थान मानले जाते.
मग ती वस्तू असेल, व्यक्ती असेल, आवाज असेल, शिकवण्याची पद्धतीही असेल किंवा शैक्षणिक साधनही असू शकेल.
आवाजातील चढ-उतार, शिक्षकाचा पेहराव, वृत्ती त्यानुसार आजूबाजूची एखादी वस्तू, प्राणी अशाप्रकारे सर्वकाही ‘चेतक’ या संकल्पनेत सामावू शकते. यांपैकी शिक्षक शिकवताना कशाचा, कोणत्या वस्तूची निवड करून कसा उपयोग करतो हा भाग महत्त्वाचा. त्यावरून अध्ययनाची सुरुवात होते.
म्हणजेच चेतक जर आकर्षक- लक्ष वेधून घेणारा, कृतीयुक्त असेल तर मुलाचे त्याकडे साहजिकच लक्ष, अवधान खेचले जाते. टिकून राहते. म्हणजेच चेतक हा लक्ष वेधून घेणारा असावा लागतो, हे आपल्या ध्यानात आले असेलच.
शैक्षणिक साधन चांगले असेल, मुलांमध्ये कुतूहल निर्माण करणारे असेल तर ते आपोआपच चुंबकाप्रमाणे मुलांचे लक्ष वेधून घेते. व त्यातूनच मुलांमध्ये आवड, कुतूहल निर्माण होते.