इंदुरीकर महाराज थेट भाजपच्या स्टेजवर, मुख्यमंत्र्यांच्या शेजारी : केला BJP प्रवेश? Indurikar Maharaj

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2024
  • इंदुरीकर महाराज निवडणूक लढवण्याची चर्चा, थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना भिडणार?
    बघा इंदुरीकर महाराज भाजप प्रवेश केलाय का ? Indurikar Maharaj Latest News | Indorikar Kirtan | Indurikar Maharaj Comedy Kirtan | Devendra Fadnavis | BJP | Kirtan | Nivrutti Maharaj Indurikar | 2019
    अहमदनगर : प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Nivrutti Maharaj Indurikar) निवडणूक लढवण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. नगर जिल्ह्यात इंदुरीकर महाराजांची (Nivrutti Maharaj Indurikar) जोरदार चर्चा सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे इंदुरीकर महाराज थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध संगमनेरमधून निवडणूक लढवण्याची चर्चा आहे.
    भाजपची महाजनादेश यात्रा काल नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये होती. त्यावेळी व्यासपीठावर इंदुरीकर महाराज उपस्थित होते. तेव्हापासून या चर्चांना उधाण आलं आहे.
    इंदुरीकर महाराज यांनी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गुफ्तगू केली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाल्या.इंदुरीकर महाराजांशी संपर्क साधला असता, त्यांनी ही चर्चा खासगी असल्याचं सांगितलं.
    मुख्यमंत्र्यांनी हात जोडले
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संगमनेरमधील महाजनादेश यात्रेला उपस्थित राहून किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांचं योगदान दिलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हात जोडून इंदुरीकर महाराजांचे आभार मानले.
    नगर जिल्हयातील अकोले, संगमनेर आणि राहुरी येथे जाहीर सभा, तर महाजनादेश यात्रेच्या मार्गावरही ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
    संगमनेर विधानसभा मतदारसंघ - (Sangamner Vidhan sabha)
    संगमनेर मतदारसंघ हा माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पंचायत समिती, जि.प., नगरपालिका, अनेक ग्रामपंचायती आणि स्थानिक संस्थावर थोरातांचं वर्चस्व राहिलं आहे. आजवरच्या विधानसभा निवडणुकींमध्ये थोरातांपुढे अद्याप एकाही उमेदवाराला म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. ते 1982 पासून सलग 6 वेळा आमदार राहिले आहेत. विरोधकांचं एकमत नसल्याने थोरात नेहमीच आघाडीवर राहिले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही बाळासाहेब थोरात यांनी 1 लाख 03 हजार 564 एवढी मतं घेऊन शिवसेनेचे जनार्दन आहेर यांचा 60 हजारांच्या फरकाने पराभव केला.
    बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्मी लागली. तिकडे विखे पाटील भाजपवासी झाले. थोरात आणि विखे पाटील यांच्यातील संघर्ष पाहता विखे पाटील थोरातांसमोर मोठं आव्हान उभ करु पाहत आहे. राधाकृष्ण विखे पाटलांच्या संगमनेर वाऱ्या वाढल्या आहेत. थोरातांना शह देण्यासाठी ते अटोकाट प्रयत्न करत आहेत. विखे पाटील ज्या उमेदवाराला उभं करतील त्याच्यामागे पक्षासह विखेंची ताकद उभी राहणार आहे. त्यामुळे यावेळी थोरातांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. युतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला राहिला आहे. शिवसेनेकडून जनार्दन आहेर यांचं नाव यंदाही चर्चेत आहे. मात्र, विखे पाटील कोणाच्या झोळीत माप टाकणार हे पाहणं सध्या तरी महत्वाचं ठरणार आहे.
    Don't Forget to SUBSCRIBE to our RUclips Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► RUclips : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Комментарии •