प्राध्यापकाचे मनोज जरांगे पाटील यांना पत्र Letter to Manoj Jarange Patil @janshikshan24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июл 2024
  • प्रिय मनोज जरांगे पाटील यांस पत्र
    दि. १९/१०/२०२३
    प्रिय मनोज जरांगे पाटील
    मु. पो. अंतरवाली सराटी
    स. न. वि. वि.
    पत्र लिहिण्यास कारण की तुमची समाजाबद्दलची तळमळ आणि कळकळ पाहून मी अतिशय भारावून गेलो आहे. महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधव-भगिनी आपल्याकडे आशेचा किरण म्हणून पहात आहेत. आपण जो या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एल्गार पुकारला आहे त्याने संपूर्ण समाज ढवळून निघाला आहे. आपल्या या प्रामाणिक कार्याला माझा सलाम. आज जेव्हा मी या समाजाकडे तटस्थ भूमिकेतून पाहतो तेव्हा मला अनेक आश्चर्यकारक गोष्टींचा खुलासा होतो. एकेकाळी संपूर्ण देशाची राजसत्ता आणि अर्थसत्ता ज्यांनी चालवली त्या समाजाची इतकी दयनीय अवस्था कशी झाली? आजही माझा कुणबी शेतकरी स्वतःच्या भाकरीतील अर्धी भाकर बांधावर येणाऱ्या कोणालाही देतो. तो कनवाळू आहे. दयाळू आहे. परंतु त्याचबरोबर तो अतिशय कणखर देखील आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून तो अन्याय सहन करत आहे. परंतु आता या समाजातील तरुण-तरुणींना हा अन्याय दूर झाला पाहिजे असे प्राकर्षाने वाटत आहे. आणि म्हणूनच हा समाज तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. प्रिय मनोज जरांगे पाटील यानिमित्ताने मी तुम्हाला एक विनंती करणार आहे. तुम्ही या पिचलेल्या, अभावग्रस्त समाजाला आरक्षण तर मिळवून द्याच. तो त्यांचा हक्क आहे. पण त्याबरोबरच त्यांच्या ह्या दुरावस्थेची कारणे देखील सांगा.
    महाराष्ट्रातील मराठा समाज हा प्रथम कुणबी आहे व नंतर तो मराठा आहे. हे आता सिद्ध झालेलं आहे. परंतु हा समाज आजही अनेक अनिष्ट चालीरीती व प्रथा परंपरांमध्ये अडकून पडलेला आहे. तुम्ही एवढे मात्र नक्की करा की या समाजाला मिथ्या अभिमानातून बाहेर काढा. पाटीलकी व देशमुखीचा थाट भिरकावून द्यायला सांगा. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची साथ करायला सांगा. आणि त्याचबरोबर हेही सांगा की शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नसून सर्वांगीण विकासासाठी, उत्थानासाठी आहे. वरचेवर हे शासन खाजगीकरण-कंत्राटीकरणाकडे वळत आहे. या तरुणांना किती शासकीय नोकऱ्या मिळतील हा मोठा प्रश्न आहे. तेव्हा पुढील आंदोलन हे खाजगी क्षेत्रात आरक्षण मिळवण्यासाठी करावे लागणार याचीही जाणीव त्यांना करून द्या. आज तुम्ही या प्रचंड जनसमुदायाचा बुलंद आवाज झाले आहात. या तुमच्या बुलंद आवाजाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगे महाराज व डॉ. बाबासाहेब यांचा शिक्षणाचा मंत्र ह्या पोरापोरींना द्या. वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांना द्या. बहुजनांच्या पोरांनी कोणाच्याही चिथावणीला बळी पडून भांडणे, मारामाऱ्या किंवा दंगे करू नका असेही त्यांना सांगा. एकूणच मारामाऱ्या व दंग्यांमध्ये बहुजनांचीच डोकी फुटत असतात. हे वास्तव त्यांना पटवून द्या. आंदोलनात आणि एकूणच बहुजन समाजात फूट पाडण्यासाठी हे प्रस्थापित धेंडं कोणत्याही थराला जाऊ शकतात. म्हणून त्यांना तुमच्यासारखे शांत व संयमी राहण्यास सांगा. वेळीच जागे राहण्यास सांगा. कोणत्याही बुवा-बाबाच्या नादी लागून आपली शक्ती, वेळ व पैसा वाया घालवू नका असेही त्यांना आवर्जून सांगा.
    प्रचंड मोठ्या प्रमाणात समाजातील तरुण-तरुणी बेरोजगार आहेत. केवळ नोकरीवर विसंबून न राहता उदरनिर्वाहासाठी कोणत्याही कामाची लाज न बाळगता ताठ मानेने त्यांना जगण्यास सांगा. भ्रष्टाचाराने आपल्या समाजाचे अतोनात नुकसान केले आहे. तेव्हा मराठा तरुण-तरुणींनी कधीही कोणताही भ्रष्टाचार करू नये असे त्यांना जरूर सांगा. संत तुकाराम महाराजांनी व्याज-बट्ट्याच्या व्यवहाराच्या नोंदी असलेल्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या. याचीही आठवण तुम्ही या आपल्या समाजाला करून द्या. लग्नात किंवा इतर समारंभात शेती गहाण ठेवून किंवा विकून कुवत नसताना खोट्या अभिमानासाठी वारेमाप खर्च करू नका असेही त्यांना सांगा. आपण सर्वजण वारकऱ्यांची लेकरं. तेव्हा आपल्या अख्या महाराष्ट्राचा एकच उभा देव तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग. तेव्हा एवढे त्यांना जरूर सांगा की इतर कोणाचीही भीती किंवा भक्ती बाळगू नका. पंढरीचा पांडुरंग आपल्या भक्तांना कधीही काहीही मागत नाही. तो उपवास व कर्मकांड करावयास सांगत नाही. पाटील तुम्ही हे आपल्या माता-भगिनींना कळकळीने जरूर सांगा की कठोर उपवास करून रक्तातील हिमोग्लोबिन कमी करून घेण्याची अजिबात गरज नाही. दैववाद सोडून कर्मवादावर विश्वास ठेवा. मराठा तरुणांनी कोणत्याही व्यसनाला शिवू नये असे मोठ्या भावाच्या नात्याने त्यांना दटावून सांगा.
    पाटील तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपल्या समाजाला कुणब्यांचं आरक्षण मिळालंच पाहिजे. आता तर आपण कुणबी असल्याचे हजारो पुरावे जमा करण्यात आलेले आहेत. एवढेच काय आपले राजेही कुळवाडी भूषण आहेत. तेव्हा आपण कायद्याच्या चौकटीत नक्कीच बसू. परंतु आपल्या समाजाचे हे सर्व प्रश्न आरक्षणाने सुटतील का याचाही विचार करण्यास जरूर सांगा. आरक्षण आपला अधिकार आहे. सामाजिक न्यायासाठी ते आवश्यक आहे. परंतु समाजातल्या मूळ प्रश्नांकडे देखील आपण पाहिले पाहिजे अशी जाणीव तुम्ही करून द्या. हे मात्र तुम्ही नक्की सांगा की आपआपसात द्वेष, मत्सर, आकस, खेकडा वृत्ती न ठेवता तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ ही वृत्ती वाढीस लावा. निराशेच्या गर्तेत चाललेल्या सुनील कावळे सारख्या मराठ्यांना आत्महत्या हा पर्याय होऊच शकत नाही हे मात्र आवर्जून सांगा. पाटील शेवटी मात्र एक नक्की सांगा तुमच्यासारखा प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, संयम, अभ्यासूवृत्ती, समाजासाठीची तळमळ ही प्रत्येक मराठा तरुण-तरुणींनी अंगीकृत करून स्वतःच्या समाजासाठीच नव्हे तर तमाम बहुजन समाजासाठी कार्य करावे. प्रत्येक मराठा तरुण-तरुणीने मनोज जरांगे पाटील व्हावे.

Комментарии • 183

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 13 дней назад +48

    सावंत साहेब बरोबर प्रबोधन करतआहात एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे.❤❤

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 13 дней назад +18

    फार सुंदर वर्णन फार. आभारी आहे

  • @ASHOKHAWLEHawle
    @ASHOKHAWLEHawle 13 дней назад +22

    कोटी कोटी हार्दिक अभिनंदन सावंत साहेब जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय भारत माता की जय 💐💐🙏🙏
    माजी सैनिक आसाराम आत्माराम हावळे मांडवखेलकर बीडकर आपल्या विचारांशी सहमत आहे. 9:58 9:58 ❤❤❤❤❤

  • @vijaypol3268
    @vijaypol3268 13 дней назад +13

    सलाम व जय शिवराय.आपले पत्र एकले,मनासं खूप आनंद व अभिमान वाटला. जरांगे दादाकडूनच आपण फारच उंच व गरजेच्या अपेक्षा ठेवल्या आहेत.पण सर्वच पाटलांनी करावे हे उचित नाही.त्यासाठी पाटला कडून पेरणा घेऊन आपल्या सारख्यानी पुढे येऊन काही कार्याची सर्वात स्वतः पुढाकार घेऊन करावी.आपल्या कृतीतील प्रामाणिक पणा व तळमळ दिसताच ,माणसं आपोआप जुळत जातील .गरजवंत मराठ्यांना मदत करणारे बहुत आहेत.त्यांना फक जरांगे पाटील सारख्या प्रामाणिक सच्या व्यक्तीची गरज आहे.तरी पण आपण पत्रात मांडलेले सद्य वास्तव अगदी खरेआहे.याचीही वेळ येईल कारण काळच सर्वांची उत्तरे अचूक देत असतो.

  • @chandrakantdighe6594
    @chandrakantdighe6594 13 дней назад +9

    सावंत सर आपण समाजाला आवश्यक त्या सुचेना, संदेशासहीत विषयाची सविस्तर अशी अप्रतिम मांडणी करून हे पत्र जरांगे पाटील यांनाच नाही तर समाजालाच पाठवले याबद्दल धन्यवाद सर.

  • @ashrubabhosale7943
    @ashrubabhosale7943 13 дней назад +9

    आपण सर्व मिळून खारीचा वाटा उचलू यात आपली तळमळ मनापासून आवडली धन्यवाद सर चला तर मग कामाला सुरुवात करूया

  • @govindravnadre
    @govindravnadre 12 дней назад +14

    प्राध्यापक सावंत सर तुमचे विचार एकदम समाजासाठी हितकारक आहे तुम्ही जे उपदेश केला तो अत्यंत समाजाच्या हिताचा आहे जय जिजाऊ जय शिवराय

    • @janshikshan24
      @janshikshan24  12 дней назад

      उपदेश वगैरे काही नाही. तेवढे मोठे आपण नाहीत. अनेक दिवसांपासून हे विचार मनात दबलेले होते त्यांना वाट करून दिली एवढेच. धन्यवाद

  • @shardaghuge3039
    @shardaghuge3039 13 дней назад +24

    वारे पट्ट्या शाब्बास याला म्हणतात संशोधन आणि खरी तळमळ

  • @tukarampatil9002
    @tukarampatil9002 12 дней назад +4

    सर तुमचे विचार फारच बोलके आणि समाज हिताचे आहेत. जरांगे पाटील साहेब निश्चित यावर विचार करतील आणि समाज प्रबोधनाची पेरणी करतील यात तिळमात्र शंका नाही. पत्र आवडलं. जय शिवराय.

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 13 дней назад +10

    अतिशय सुंदर

  • @user-cg2px1hc6v
    @user-cg2px1hc6v 5 дней назад +1

    अतिशय अभ्यासपूर्ण पत्र लेखन धन्यवाद

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 7 дней назад +2

    सर आपण खूप छान काम करत आहात आपल्या कामाला शतशः प्रणाम.

  • @devanandmohod8751
    @devanandmohod8751 13 дней назад +12

    सावंत सर अगदी योग्य आहे बरोबर

  • @user-se3nw8jv5k
    @user-se3nw8jv5k 13 дней назад +5

    जबरदस्त लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद अभिनंदन सर जी
    दिलीप थोरात लोहगाव मौ,

  • @user-xv8hm8vi5o
    @user-xv8hm8vi5o 11 дней назад +2

    सर तुमचे खूप खूप सर तुम्ही लिहिलेलं पत्र सर्वसामान्य माणसाच्या मनातल्या भावना अलगद पत्राच्या माध्यमातून सर्व समाज बांधवाच्या खरंच सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न केला पाहिजे हे पत्र नाही हृदयस्पर्श भावना आहे

    • @janshikshan24
      @janshikshan24  11 дней назад

      धन्यवाद तुमचा आभारी आहे. अनेक वर्षांपासून माझ्या मनात असलेल्या समाजाबद्दलच्या भावना मी या पत्रात व्यक्त केलेल्या आहेत.

  • @bhagwanjadhav252
    @bhagwanjadhav252 12 дней назад +4

    धन्यवाद सर खूपच मोलाचा विचार मांडला आहे.

  • @bhaskaringole2404
    @bhaskaringole2404 13 дней назад +6

    अभिनंदन सरजी

  • @rajivsavle8095
    @rajivsavle8095 4 дня назад +1

    सर खूप छान वाटलं तुमचं हे पत्र ऐकून मराठा समाजाच्या प्रत्येक तरुणाने तुमच्या पत्राचं अनुकरण केलं तर खूप काही बदल होईल आपल्या समाजामध्ये बदल करणे ही खूप गरज आहे तुमच्यासारखे असे काही समाजामध्ये असे असतील तर बदल व्हायला वेळ सुद्धा लागणार नाही धन्यवाद सरजी खूप छान वाटलं पत्र ऐकून

  • @sudhakarumbare3215
    @sudhakarumbare3215 11 дней назад +2

    सावंत साहेब आपण मराठा समाजाला खरोखरच योग्य मार्गदर्शन व जरांगे पाटील यांना देखील योग्य प्रभोदन केले आहे

    • @janshikshan24
      @janshikshan24  11 дней назад

      सर आपण एवढे मोठे नाहीत की जरांगे पाटलांना प्रबोधन करू... माझ्या मनातील अनेक वर्षांपासूनच्या भावना पत्रात व्यक्त केलेल्या आहेत. एवढेच. धन्यवाद आभारी आहे.

  • @Satish-ps2xt
    @Satish-ps2xt 11 дней назад +3

    एक नंबर पत्र लिहिले सर तुम्ही या पत्राचा मला अतिशय अभिमान आहे

  • @rameshsawant3416
    @rameshsawant3416 9 дней назад +2

    खूप छान संदेश सर

  • @dattatrayananaware5802
    @dattatrayananaware5802 12 дней назад +3

    खूपच छान सर

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 13 дней назад +9

    वा खरेच 100% है झालेच पाहिजे.है प्रत्येकाच्या मनातील बोलले.खूप खूप आवडले.पाटलांनी हे सर्व मराठ्यांना मंत्र द्यावा.समाज सुधारण्यासाठी तंतोतंत हे खरे आहे.

  • @marutikadam08
    @marutikadam08 12 дней назад +2

    सुपर सावंत अत्यंत प्रभावी . ... मराठा समाजाचे वर्तमानातील वास्तव सांगणारे हे पत्र आहे . हे पत्र नसून अंतरमनातील प्रत्यक्ष अनुभवलेल्या वेदना आहेत . अश्या विचारांची आजच्या अस्थिर व्यवस्थेला गरज आहे . प्रस्थापीत मराठयामुळेच विस्तापीत मराठयांची वाट लागल्याचा तुमचा उल्लेख अत्यंत प्रभावी आहे . मराठा समाजातील राजकारण्यानी स्वत: च्या राजकिय स्वार्था साठी विस्थापित मराठ्यांचा ७५ वर्षा पासून वापर करून घेतल्या मुळेच लढवया क्षेत्रिय अन्नदात्या गरजवंत व गरीब मराठ्यांची हि अवस्था झाली आहे ... असेच समाज प्रबोधनाचे विचार विस्थापीत समाजा पर्यंत पोंहचविण्याचे पवित्र कार्य आपल्या हातून सातत्याने व्हावे हिच अपेक्षा ! धन्यवाद ... मारुती कदम उमरगा धाराशिव 9422073866

  • @pavankumarpadwal8377
    @pavankumarpadwal8377 13 дней назад +4

    खुप छान सर

  • @mahadevkshinde583
    @mahadevkshinde583 12 дней назад +3

    सर तुम्ही थोडक्यात पण खुप छान मार्गदर्शन करत आहात धन्यवाद सर

  • @aniljagadale6907
    @aniljagadale6907 9 дней назад +2

    एक नंबर बरोबर आहे सर एक मराठा लाख मराठे

  • @anitasarode2863
    @anitasarode2863 12 дней назад +2

    खूप सुंदर 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 13 дней назад +4

    खूप छान संदेश सर .👏👏👍👍

  • @vasantkadam9899
    @vasantkadam9899 13 дней назад +5

    Very nice sir.

  • @subhashjadhav6325
    @subhashjadhav6325 12 дней назад +2

    बरेच काही या पत्रातून सांगितले आहे धन्यवाद सर

  • @matemanoj2349
    @matemanoj2349 11 дней назад +2

    सर आपले आभार,

  • @dilipkankal1311
    @dilipkankal1311 13 дней назад +7

    Very nice

  • @shamraobade5331
    @shamraobade5331 12 дней назад +5

    75 वर्षे सत्ता भोगून ही अव्यवस्था तर जे सत्तेत नाहीतर त्यांची अवस्था सावंत यांनी सांगितली पाहिजे ही विनंती

    • @janshikshan24
      @janshikshan24  12 дней назад

      सत्ता ज्यांनी भोगली त्यांना सत्तेवरून खाली खेचा.... हा संघर्ष प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा आहे....

    • @Investing-power
      @Investing-power 8 дней назад

      किती मराठा समाज बाकीच्या जातींना मतदान करतो एकदा 70 वर्षातील आकडेवारी चेक करा....
      राखीव जागेवर इतर समाजातील 4-2 जण निवडून​ येतात@@janshikshan24

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 13 дней назад +9

    Dhanyawad sir आसे झाले तर पूर्ण समाज सुधारेल.

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 12 дней назад +2

    ग्रेट सर अत्यंत योग्य विचार मांडले त्याबद्दल तुमचे अभिनंदन .

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 13 дней назад +4

    Great

  • @user-fi3zb2lz3c
    @user-fi3zb2lz3c 12 дней назад +2

    खूप खूप छान धन्यवाद एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @ajaykute6257
    @ajaykute6257 12 дней назад +2

    khup chan sir....

  • @sandipsaste1312
    @sandipsaste1312 12 дней назад +2

    Khup chan❤❤
    Tumchya ya mesege tarun varg purn pane samaj sudharnyasati kankhar ubha rahil🎉🎉🎉🎉🎉🎉
    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 13 дней назад +4

    Chan

  • @prajwalchavan1056
    @prajwalchavan1056 5 дней назад +1

    खूप सुंदर लिहिला आहे. 🙏🙏

  • @yashvardhandhondge9700
    @yashvardhandhondge9700 12 дней назад +1

    सर अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाकडे आपल्या पत्रातून आपण नमूद केले आहे आपले धन्यवाद

  • @marutidhongade724
    @marutidhongade724 12 дней назад +3

    खूप छान संदेश आहे भावा

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 13 дней назад +3

    Sawant सर खूप chhan पत्र .खूप अभिमान vatato.jai जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.

  • @JyotiPawar-bp7lt
    @JyotiPawar-bp7lt 12 дней назад +2

    मी ह्या मताशी सहमत आहे

  • @pratikm9846
    @pratikm9846 12 дней назад +1

    चांगले विचार आहेत.
    शेती किफयातशीर होणे आवश्यक आहे
    सर्वात रोजगार निर्मिती शेतीत होऊ शकते. आपले अभिनंदन.

  • @subhashwankhede881
    @subhashwankhede881 8 дней назад +1

    विज्ञानवादी व मानवतावादी तसेच समता आणि बंधुताचा विचार मला भावला..!

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 12 дней назад +2

    दादा आणखी एक पत्र द्या तुतारी निवडून येईल सर्व मराठा समाज तुमच्या बरोबर आहे

  • @balasahebmunde229
    @balasahebmunde229 13 дней назад +3

    Ekdam Chan

  • @pdravsaheb6212
    @pdravsaheb6212 3 дня назад +1

    Khupach chan 🙏

  • @sudhakarbhise5398
    @sudhakarbhise5398 8 дней назад +1

    Dhanyad sir

  • @digambardhumal397
    @digambardhumal397 12 дней назад +1

    खुप छान संदेश दिला सर

  • @nilakhare1540
    @nilakhare1540 3 дня назад +1

    सगळ्या जनतेच्या मनातील प्रश्न,खदखद आपल्यापत्रातुन मांडलीत.धन्यवाद.

  • @Janardhan-ho5rh
    @Janardhan-ho5rh 11 дней назад +1

    छान सावत साहेब

  • @sambhajidhengle894
    @sambhajidhengle894 3 дня назад +1

    छान

  • @indrayanipawar955
    @indrayanipawar955 13 дней назад +3

    खुप छान नकीच मराठा समाजाला कसे जगावे ) वागावे हे अवगत होईल

  • @dnyaneshwarambhore3055
    @dnyaneshwarambhore3055 12 дней назад +1

    सर आभिनदंन....खुपच छान आहे....

  • @shrinivaspawar9044
    @shrinivaspawar9044 12 дней назад +1

    उत्कृष्ठ पत्र आहे.

  • @babasahebgadhave8572
    @babasahebgadhave8572 12 дней назад +1

    खूप छान

  • @sambhajisopanraodeshmukh6081
    @sambhajisopanraodeshmukh6081 9 дней назад +1

    बहुजन समाजातील शिक्षक आजही विना पगारी अथवा अल्पशा पगारीवर काम करतात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला तर बरं होईल...

    • @janshikshan24
      @janshikshan24  8 дней назад

      सर शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात समस्या आहेत आणि या समस्यांनी शिक्षकच नाही तर एकंदरीतच विद्यार्थी पालक हे सर्वच घेरलेले आहेत यामध्ये मोठ्या क्रांतीची आवश्यकता आहे त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे याही क्षेत्रात एखादा मनोज जरांगे पाटील उभा होणे आवश्यक आहे तरच हे दैन्य दूर होईल अन्यथा मोठ्या प्रमाणात या देशात वर्गवाद निर्माण होऊन या समाजामध्ये मोठी तरी तयार होईल.

  • @shivashankaringle8886
    @shivashankaringle8886 12 дней назад +2

    आता खरे मराठी लोकांनी आंबेडकरांना ओळखले असे वाटते.

  • @mahadevvirka5389
    @mahadevvirka5389 3 дня назад +1

    तळागाळातील लोकांना आधर द्या जातीच्या बाहेर पडून खर्या गरीबांना आधार द्या ही ईच्छा.

  • @ambajiarekar3045
    @ambajiarekar3045 День назад

    Khup chan Agadi Barobar

  • @narayanbhanuse1770
    @narayanbhanuse1770 3 дня назад

    अभिनंदन सर.

  • @shitalsapkal1976
    @shitalsapkal1976 12 дней назад

    Dhanyavad sir khup chhan patr changle Kam Karnaras asch protsan dya namaste Jay shivray Jay savidhan

  • @sudhakarraojadhav397
    @sudhakarraojadhav397 День назад

    बरोबर आहे

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 4 дня назад

    Chan para aahe

  • @narayangarud298
    @narayangarud298 3 дня назад +1

    एक मराठा लाख मराठा.

  • @smitathopte1442
    @smitathopte1442 3 дня назад

    ❤❤❤

  • @kundlikrainirmale1435
    @kundlikrainirmale1435 10 дней назад

    👌👌👌👍🙏🌹🌹🌹

  • @subhashbirajdar2681
    @subhashbirajdar2681 12 дней назад +2

    महाराष्ट्रात नोकराचे सर्वे झाला तर मराठा नोकरदाराची भरती जास्त असले चे दिसून येईल

    • @janshikshan24
      @janshikshan24  9 дней назад

      करा की मग सर्वे

  • @user-oh9bz8em9g
    @user-oh9bz8em9g 13 дней назад +1

    चिंतनीय विचार

  • @sanjaymohite8327
    @sanjaymohite8327 3 дня назад

    👍🏻❤❤

  • @n.m.bhosle3445
    @n.m.bhosle3445 8 дней назад

  • @bkadu8861
    @bkadu8861 13 дней назад

    Very nice sir

  • @yogirajangale5263
    @yogirajangale5263 4 дня назад

    हे मुद्दे आपल्या पत्रात आले नाही ते येणे आवश्यक आहे. याची सुद्धा ज-+ज+ज+ ला जाण असायला पाहिजे.

  • @kailaspadole2814
    @kailaspadole2814 12 дней назад

    एकदम सुपर सर

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 13 дней назад +1

    Sakal Maratha samaj is one only There no difference among them. Poor and rich People are there in each samaj.

  • @vraysinteriorsshreesaicoun8610
    @vraysinteriorsshreesaicoun8610 12 дней назад

    छान सर

  • @user-ch4ht6oe3i
    @user-ch4ht6oe3i 12 дней назад

    सलाम सर तुम्हाला.

  • @mahadevaakde
    @mahadevaakde 5 дней назад

    Ek Maratha lakh

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 3 дня назад

    लढेगे जीतेग हाम सब जरांगे पाटील

  • @vedantmane2314
    @vedantmane2314 13 дней назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @anshiramgajmal7890
    @anshiramgajmal7890 11 дней назад

    धन्यवाद सर कुनबी मराठा एकच

  • @shivajirakhonde8187
    @shivajirakhonde8187 11 дней назад

    वास्तव व मराठा समाजाचे डोळे उघडणारे हे पत्र .खुपच सुंदर लेखन दत्तराव खुप आनंद झाला कारण एका दगडात अनेक पक्षी मारले

    • @janshikshan24
      @janshikshan24  11 дней назад

      धन्यवाद सर तुमचा आभारी आहे. अनेक वर्षांच्या मनात दडलेल्या भावना पत्राच्या रूपाने बाहेर आलेल्या आहेत.

  • @somnathghule8232
    @somnathghule8232 12 дней назад +1

    तुम्ही पाटलांना पत्रातून काही ठिकाणी समर्थन देताय तर काही ठिकाणी अक्कल शिकवायचा प्रयत्न करतायेत ते चुक वाटतय.
    पाटलांनी समाजासाठी खूप त्याग केला आहे त्यामुळे त्यांनी जे आंदोलन उभ केलय त्याला डोळे झाकून पाठिंबा देण्यातच आपला फायदा आहे.
    शालजोड्यातून मारण्याचां प्रयत्न जर पत्रातून करत असाल तर एक नक्की सांगतो की तुमच्या सारखे आमच्याकडे फुटा फुटावर PHD होल्डर पडलेले आहेत ते पण खूप काही लिहू शकतात. जर आरक्षणातून काहीच हाताला लागत नाही अस तुमचं म्हणणं आहे तर जे विरोध करतायेत त्यांना ते सांगा आम्हाला नको.

  • @varpesiromsairam3444
    @varpesiromsairam3444 13 дней назад +1

    🚩🚩🚩🚩🚩

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 12 дней назад

    धन्यवाद सर आरक्षणावीना खचला मराठा पिचला मराठा

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 13 дней назад

    Ek maratha lakh maratha ❤

  • @madan0484
    @madan0484 11 дней назад

    Ok

  • @subhashpatil4526
    @subhashpatil4526 12 дней назад

    सावंत सर तुमच्यासारखे मराठा समाजातल्या उच्च शिक्षितानी मनोजदादाच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
    आणि दादाचे शिक्षण झालेले नाही असे संगणाऱ्याला तुम्ही दाखवून दिले पाहिजे की दादा बोलतो तो तुमच्यासारखे उच्च शिक्षित दादा सोबत आहेत.
    .

    • @janshikshan24
      @janshikshan24  12 дней назад

      निश्चितच मी मनोज दादांच्या बरोबरच आहे.... त्यांची मी जाऊन स्वतः भेट घेतली त्याचबरोबर त्या दिवशी संपूर्ण दिवस हिंगोलीतील रॅलीमध्ये त्यांच्या सोबतच होतो.

  • @MarutiBhaguvale-x3m
    @MarutiBhaguvale-x3m 13 дней назад

    🙏🤝🙏

  • @arjundeshmukh9986
    @arjundeshmukh9986 13 дней назад

    आम्ही 1976 77ला इयत्ता 11-12ला बोर्डिंगमध्ये रहात होतो आमच्या बरोबर एक चाम्हार जातीचा मित्र होता तो आम्हाला हिनावयाचा तुम्ही लोक आमच खाता कारण आम्ही कधी कधी त्यांना मिळणार दुध अर्थात दुध पावडर चे भाकरी बरोबर खाण्यासाठी आणायचा

    • @arjundeshmukh9986
      @arjundeshmukh9986 13 дней назад

      आम्ही पण गरीबच होतो

  • @ShridharNathram
    @ShridharNathram 2 дня назад

    खूप छान हे मराठा भावानी डोक्यात घेतल पाहेजे

  • @balkrushnabarhe5832
    @balkrushnabarhe5832 13 дней назад +2

    फारच छान विचार मांडले सर आपण.आपले सुंदर विचार मी अनेक लोकांना पाठवत आहे.नमस्कार सर

  • @divakarubale4194
    @divakarubale4194 13 дней назад +3

    मराठी समाज भारत स्वतंत्र झाल्यापासून सत्ता उपभोगत आहे. आणी सत्ते मधील मराठी राज्य कर्त्या नी सरकारी तिजोरीचा वापर करुन स्वतच्या कंपन्या साखर कारखाने महाविद्यालये उभे केले

  • @lucypawar1749
    @lucypawar1749 5 дней назад

    शालुत्न जोडे

  • @somnathmate2650
    @somnathmate2650 12 дней назад

    ❤😊😊

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 13 дней назад +1

    Don't mix up SC, ST(constitutional) and obc (statutory) reservation.