- Видео 39
- Просмотров 1 970
subhash s gawai
Добавлен 8 авг 2017
एक स्वप्न होते की संगीत क्षेत्रामध्ये खूप मोठे काम करायचे त्याला कारणही तसेच होते लहानपणापासून आमच्या घरात गाणे म्हणजे काय कुणाला माहितही नाही आणि अशा वातावरणात मला असलेली गाण्याची नैसर्गिक आवड त्यावेळी घरी एक रेडिओ असायचा आणि तो रेडिओ मी गळ्यामध्ये घालून फिरायचो शेतात तेव्हा कुठे फिरायला जरी गेलो तरी हा रेडिओ माझ्या गळ्यामध्ये असायचा आणि मग त्यामध्ये प्रसारित होणारे गाणे आणि सर्व कलाकारांच्या मुलाखती मी मन लावून ऐकायचे आणि त्या माध्यमातून आवडत असतील जुनी नवीन सर्व गाणी ती गाणी मी सहज म्हणायचं यामध्ये वर्ग पाचवी मध्ये पहिल्यांदाच गायलेलं गाणं आणि त्याकरिता मुख्याध्यापकांनी माझ्या पाठीवर ती दिलेली कौतुकाची थाप आजही मला आठवते याकरिता कुठलीही संगीत शिक्षण नाही पण जसे जसे मोठे होत गेलो जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि हा छंद मागे पडत गेला पण मित्रांनो यूट्यूब ने ही कला सादर करण्यासाठी एक खूप मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे आणि त्या माध्यमातून मी माझ्या हरवलेला सुरातुन काही गाणी गाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुमच्या पर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहे याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. ..